एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात बघून दुःख वाटतं,
पण मग मित्राकडुन चुकून उघड्या राहिलेल्या पिंजऱ्याचे
दार मीच झटक्यात बंद करतो...
आणि मग माझं सर्वस्व पिंजऱ्यातच कैद होतं...
-
सुनाया नहीं आजतक किसीने मैं वो किस्सा हूँ।
कोण कश्याला हवे सोबती?
सोबत स्वतःची असताना..
हसत बसावे एकट्यानेही मग,
कुणीच भोवती नसताना...-
सबको पानी हैं यहाँ मंजिल खुदकी,
राह का साथीदार भी, भला कोई होता है क्या?
सब है मसरूफ यहाँ, अपनीही धूनमें,
खुदसे भी ज्यादा प्यार करे कोई किसीसे,
अरे छोडो... आजकल ऐसा भी भला कही होता हैं क्या?
-
रोशनी खामोश है,शहर मे मेरे,
जरूर अंधेरा कहीं शोर कर रहा होगा,
खुशनसीब हूँ मैं, यहाँ सांस भर रहा हूँ,
एक वो है, जो सांस दर सांस वहाँ मर रहा होगा...-
ऐ जिंदगी! तेरी खामोशी भी पसंद हो जिसे.
तेरे शोर करनेपर तो वो इतराता होगा...-
असावा तुझ्या सहवासाचा सुगंध भोवती,
दरवळावं मग मीही, तुझ्याचसारखं, तुझ्याचभोवती...-
... आणि आज पुन्हा एक मेसेज, ड्राफ्ट बॉक्स मध्ये येऊन पडला.. तसाच दुर्लक्षित राहण्यासाठी..
जेव्हा मनात असलेलं सांगायचं असूनही,
टाइप केलेल्या मेसेज साठी आपलं बोट सेंड बटन वर नाही जात ,
डोळ्यांत दाटून आलेलं असतं सारं प्रेम,
तरीही मग तो मेसेज डिलीट करण्याची हिंमतही जेव्हा हातात नाही रहात...
तेव्हा नकळत तो मेसेज जाऊन पडतो तो त्या बॉक्स मध्ये...
त्याच ड्राफ्ट बॉक्स मध्ये...-
पाखरांशी त्या अबोला का धरावा कुणी?
छाटलेत पंख आपले जर आपल्यांनीच...-
मौनात आज माझ्या का मी मौन आहे,
शब्दांत शब्द सारे,श्वासात श्वास आहे,
कोडयांत आज दुनिया,
का माझाच हा भास आहे.
मौनात आज का मी मौन आहे...
भासात आज दुःख ,
सुख ते उनाड वाटी,
अनवाणी माझ्या आज पायी,
काटयांचा गाव आहे....
मौनात आज का मी मौन आहे...
वेदनांनाही हीच फुंकर,
हाच गारवा इलाज आहे,
पांढऱ्या कापडात आज,
हरवली का ती लाज आहे,
मौनात का मी मौन आज आहे...
-
सुचतच नाही काही,
म्हणून का लिहिणं थांबवायचं असतं .?
उमटतील ना कधीतरी भावही मनातले ,
पण त्यापूर्वीच त्यांना संपवायचं नसतं...
म्हणून प्रयत्न करणं थांबवायचं नसतं...
एकदा का उमलले की तोडल्या जाणार , ठाऊक आहे,
म्हणून का कळीने उमलायचं नसतं?
टप्पा शेवटचा दूर असला तरी ,
कणखर हिंम्मतीनिशी खेळाडूने धावायचं असतं..
म्हणून प्रयत्न करणं थांबवायचं नसतं...
पाहतच नाही कधी कुणीही म्हणून ,
प्रयत्न करणं कधी थांबवायचं नसतं,
असू देत की मरण पुढ्यातही ,
बसून मरणाच्या मानगुटीवर,वेड्या मरणच लांबवायचं असतं..
आणि म्हणूनच प्रयत्न करणं थांबवायचं नसतं...-