❤️असेही एकदा व्हावे❤️
शांत मनाचे वादळ सुटावे
अबोल भावनांचे वारे वाहावे
अन् हळूच तु झुळूक देऊन जावे
❤️असेही एकदा व्हावे❤️
नजरेत तुझ्या मीच दिसावे
ओठी तुझ्या माझेच नाव असावे
ह्रुदयात तुझ्या मीच स्पंदन घ्यावे
❤️असेही एकदा व्हावे❤️
नदी मी किनारा तु व्हावे
त्या नितळ पाण्यासारखे
सख्या मीही तुझ्या प्रेमात वाहून जावे
❤️असेही एकदा व्हावे❤️
असंख्य ताऱ्यात फक्त तूच दिसावे
मी तुझ्या अन् तू माझ्या स्वप्नी असावे
अन् तुला बघता मी हळूच लाजून जावे
❤️असेही एकदा व्हावे❤️
तु प्रियकर मी प्रियसी व्हावे
मी तुझ्या,तू माझ्या प्रेमात पडावे
शेवटच्या क्षणी मी तुझ्या मिठीत विसावे
❤️असेही एकदा व्हावे❤️
– Ashwini Gajbhiye✍️(शब्दाश्विनी)
-