चल ना दूर कुठेतरी त्या क्षितिजापल्याड
छानसं छाेटसं घर वसवूया आपण त्या डाेंगराआड
मला ना ते तपकिरी रंगाचे काैलारू घर खूप आवडतात
आपण पण अगदी तसचं घर बांधूया... आवडेल ना रे तुला??
त्या घरासमोर ना एक नाजुकसा परस असेल... जास्त माेठा नाही हा...
मला गुलाब नाही आवडत हा...
आपण ते काेमल, मला माेहवून टाकणारे अबाेलीचे फूल लावूया ना..
रात्री त्या जाईच्या फुलाचा ताे गंधाळलेला सुवास अनुभवुया...
तिथे ना एक झाेपाळा असेल...
पण मी नाही हा बसणार... मला चक्कर येते ना मग..
त्याचं ते मागे पुढं गुणगुणत राहणं आपण फक्त एेकत राहूया
ताे रिमझिम हाेणार पाऊस अंगावर घेऊया
मस्त सारं दु:ख विसरून आपण आेलेचिंब भिजुन जाऊया
ती हिरवाई ती देखणी नवलाई डाेळ्यांत साठवुया
रात्र न् रात्र आपण आयुष्याच्या गप्पांच्या दुनियेत रमूया
अन् कायमचं आपण तिथं निजून जाऊया...
चल ना दूर कुठेतरी त्या क्षितिजापल्याड जाऊया...-
आठवणींचा रस्ता अलगद मावळतीला झुकला आहे
म्हणून तर माझ्या साैंदर्याचा रंग कधीच विरला आहे-
तुझ्या शब्दांची धार मनी सपकन वार करते
सांग तरी त्या शब्दांचा बाणा मी माेडू कसा
रित्या हाेत आहे आठवणींच्या कित्येक सऱ्या
सांग तरी तुझ्या आठवणींचा बांध अडवू कसा
तुला स्वप्नी बघताच स्पंदने वाढली ह्रदयाची
सांग तरी हवेत विरला श्वास माझा राेखू कसा
अरे वेड्या मनावर तुझचं सावट भिरभिरतयं
सांग तरी झाकाळलेला अंधार दूर करू कसा
संध्येला चढली तुझ्या रंगाची अनामिक लाली
सांग तरी त्या रंगात माझा चेहरा लपवू कसा
तुझ्या प्रेमात पडण्याच्या हजार चुका केल्या
सांग तरी चुकांचा अगणित पाढा गिरवू कसा
तुझ्या वेदनांचा हाहाकार भिनलाय माझ्या देही
सांग दरवळलेल्या संवेदनांचा परिमळ थांबवू कसा-
सावरून घे हळव्या मनाला जरासं
नाहीच केलं मी कधी प्रेम तुझ्यावर
कळत नाही तुझ्या शब्दांना काहीच
उगाच ते नात्याला बांधतात मनावर-