ती : काय रे असा मध्येच कुठे बरे हरवतोस तू ?
मी : तुझ्या प्रत्येक व्यक्त होण्यामध्ये माझी एक कविता लपलेली असते आणि प्रत्येक कवितेमध्ये तू. तेव्हा कधी कवितेला शोधत असतो तर कधी कवितेतल्या तुला.
-
जीव गुंतला ज्याच्यात,
तो कुणी अनोळखी आपलासा....
जरी ठरवले दूर जाण्याचे,
तरी पावलांना शोध त्याचा....!!!!-
यघपि उनके शोध को
नोबेल पुरस्कार नही दिया गया
परन्तु
तुलनात्मक इतिहास में
वे महान खगोलविद थे ...
उन्होंने शोध में कहा कि
ईश्वर पूरब में है
उधर .. पैर करके नही सोना
उनके इस शोध ने..
वर्षों पहले ...
ईश्वर की दिशा
और
मेरी पैरों की जगह कविता
निर्धारित कर दी .... ।-
कुछ किताबें तो तुमने पढ़ीं ही होंगीं
कुछ तो यक़ीनन मैंने पढ़ीं ही थीं
सोचा मैंने
हमारे मिलन से हो जाता
तुम्हारा और मेरा ज्ञान पूरा
..
मैं ग़लत थी।
..
तुमसे प्रेम करके मैंने जाना
ज्ञान केवल किताबों में निहित है ही नहीं
और मिलन ..
ज्ञान की सीमा नहीं
..
ज्ञान का शोध प्रेम से होकर स्वयं की प्राप्ति है।
-
समाधान शोधणे म्हणजे...?
जे आपणं आपल्या कर्तृत्वाने म्हणजे बुद्धीने, मेहनतीने आणि कलेने कमावलेले धन असेल, मान प्रतिष्ठा असेल. किंवा अगदी साधारण परिस्थिती ( गरिबी ) असेल. किंवा कोणत्याही गोष्टींतील
म्हणजेचं आपल्या गुणांकडे, गुणांवर, गुणांनी बघून मिळालेली
किंवा मिळवलेली कमाई असेल...
त्यात कोणतीही शंका किंवा कमीपणा न वाटू घेता जे आहे, जसे आहे, जिथे आहे त्याचा प्रामाणिकपणे, निर्मळ आणि वास्तवतेचे भान ठेऊन स्वीकार करून सुखी राहणे... आणि हे सुख फक्त बोलण्यातूनं नाही, तर मनापासून कृतीतून अनुभवणे आणि ते ही अगदी आनंदाने, निस्वार्थ भावनेने मान्य करून जगणे...
हेचं तर माझ्या लेखी आहे "समाधान"....👍-
मी कुठं हरवले आहे
काहीच कळेना मला...
अन् मी कुठं चुकत आहे
ते ही उमजेना मला...-
अबोल रात्र...खुप काही बोलते
गुज भाव मनाचे मनाला सांगते
पाहूनी चंद्रमा मुक नभी एकटा
त्याच्यातच मन स्वतःस शोधते-
ओळखीची मी अनोळखी वाटतं होते मला
माझ्या मनाच्या तळाशी शोधतं होते मला
हरवले होते मी आतल्या आत कुठेतरी
मुक्याने अंतःकरणात बोलतं होते मला
बाहेरच्या जगाला मी दिसायचे बागडताना
तोंड दाबून बुक्क्यांचा मार देतं होते मला
जाणिवेच्या वळणावर संवाद केला स्वतःशी
बंदिस्त पिंजऱ्यात कोंडत होते मला
जिवंत असूनही संपवून अस्तित्वाला
कुठल्या जगात मी जगवतं होते मला
-©शब्दपौर्णिमा...✍️-