तलाशती है आँखे जिस बूँद को
वो आँखे है एक किसान की I
वो आँखे सुखे फसलो की
तू आईना हैं आसमा उनके बीच का l
तू जरिया हैं आसमा
उनकी तलाश का...-
🙏कारभारी🙏
नको नको रे कारभाऱ्या, आसवे अशी ढाहाळू
मायेनं वागविल्या भुईस, दुःखाने न्याहाळू
तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरू
आरे काय भ्या तुला वारा धूनाची, उभ्या आस्मताचं तू पाखरू
अन्नासाठी दशदिशा भटकतो, त्यांस तुझा उंबरठा आधार
भागवितो भूक तिन्ही लोकाची, लक्ष लक्ष तुझे आभार
कवळ्या मनाचा फौलदी देहाचा, आरे जिगर तुझा राजावानी
एका दुष्काळास निसर्गाच्या परचक्रास, का रे झाला अनवाणी
आरे जगाचा पोशिंदा तू, हारून कसं चालणार
असा कसा जीव संपवतोस, तुझ्या श्वासाचं मोल तुला न्हाय कळणार-
हाक ऐक ना माऊली
दे राजालाया सावली ।
भुकी लेकरा पोटी
माय पाण्यासाठी धावली ।
सार दुःख पोटी धरूनी
माय परासंग रोवली ।
अंग कष्ट करी बाप हा
दान सोण्यावानी दावली ।
बळीराजा जन्म घेऊन
अश्रु दाण्यासाठी गाळली ।
कमरेचे हात सोडूनी
लाव आभाळाला माऊली ।-
जन्मतो तो पृथ्वीवर अन्नदाता म्हणुनी..
त्या अन्नाच्या कणांसाठी मात्र तोच झटतो..
घेऊन डोक्यावर कर्ज ,त्याला कष्ट पेलावे लागते..
ऊन ,वारा ,पाऊस ,पाणी ,याचे त्याला भान नसते..
पिकाच्या प्रत्येक कणाला त्याला छातीस लावावे लागते..
येवढे करूनही त्याचा नशीबी काय येते??
येते ती फक्त आत्महत्या !!!
का तो शेतकरी आजही पारतंत्र्यात अडकलाय?
का तो शेतकरी अन्नदाता बनलाय?
का त्याच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेतलाय?
का सगळ्यांचे पुण्य घेणारा आज अपराधी बनलाय?
का देवा तू असा छळ करतोस,परिश्रम जो करतो त्याला मजबूर तू करतोस?
हाच तुझा न्याय असेल तर तो शेतकरी तरी काय करेल?
म तुझ्या या चिमुरड्यांच पोट कोण भरेल?-
एक साधा प्रश्न आहे माझा...
शेतकरी आम्ही म्हणुन आमच्या
आमदनीचा काही भरवसा नाही का...?
कसे ठरवायचे आम्ही अंदाजपञक
उत्पन्न आणि खर्चाचे
कपडा-लत्ता नि दवा-दारू
अंदाजपञक वर्षभऱ्याच्या बजेटचे
कारण उत्पन्न तर आमुचे निसर्गावर औलंबून
त्यात मालाची किंमत सरकारवर विसंबून
नको आम्हाला ती कर्जमाफी
नको पिटारा लोभस योजनांचा
हवा फक्त अधिकार आम्हाला
आमच्या मालाची किंमत ठरविण्याचा
खर्च पाणी वजा करून
आमच्या कष्टाचा मोबदला मिळविण्याचा
म्हणुन विचारावस वाटतं साधा एक प्रश्न
आमच्या शेतात पिकविलेल्या मालाची किंमत
ठरविण्याचा आमचा हक्क नाही का...?
लेकरा बाळांना आमच्या चांगले शिक्षण-पाणी
देण्याचा आमचा अधिकार नाही का...?
शेतकरी आम्ही म्हणून आमच्या
आमदनीचा काही भरवसा नाही का...?
~Madhuri P. Warwatkar
-
मैं तो किसान हूँ, यारों पल भर रूठूँगा।
बारीश गिरते ही, मैं तो झुमकर उठूँगा।-
बी मातीत रुजलं
आणि तासाला लागलं...
आज पेरणी झाली
आणि जीव सुखावलं...
वर्षभराचं पेरणीचं तासं
पावसानही अमदा दिला साथ..
वेळेवर येऊन मेघराजाने
दिला समाधानाचा हात...
आता नजर ही आभाळाकडं
भिर-भिर आहे पाहत...
वरून देवता रुष्ट होऊ नको रे
मणी देवाला साकळं आहे घालत...
आधीच महागाचं रे बियानं
त्यात मुसळधार पाऊस येऊन
दबणार तर नाही ना बियाणं...
नजर ही काळजीची
झोपु देणार नाही आता सुखानं...
Madhuri P. Warwatkar-
काळ्या मातीत जन्मला
काळ्या मातीशीच नातं
घाम गाळून कष्टाचा
भरतो तुमचं आमचं पोटं
हाक मारीता तयाला
धावे कसा भरभरा
जगाचा पोशिंदा हा
त्याचा सन्मान करा
घास घेता अन्नाचा
विचार करा तयांचा
बैलपोळा सण आज
करा आनंदे साजरा-