Padmakar Mhatre   (पसाम्हात्रे, अलिबाग)
631 Followers · 82 Following

Joined 19 July 2018


Joined 19 July 2018
31 JAN 2022 AT 8:58

दान देता देता आले
तुज देवाचे औदार्य
पाना फुलांनी सजले
छान निसर्ग सौंदर्य

तुझी प्रेमाची सावली
आणि हिरवट गंध
ओढ लागते मनाला
आणि तुटती निर्बंध

-


29 JAN 2022 AT 8:27

इथे होतो चंद्र सूर्योदय
दर्शन घडते जीवनाचे
शब्दांतून सजतो संसार
ऋणी आम्ही साहित्याचे

-


28 JAN 2022 AT 8:19

प्रेमास स्थान देऊ
द्वेषास लोटा दूर
मन गुंतले शब्दात
अजूनी बाकी धूर

-


27 JAN 2022 AT 9:29

चंद्र उगवता नभी
धुंद होते रातराणी
सडा पडता स्वप्नांचा
वारा सांगतो कहाणी

-


26 JAN 2022 AT 8:34

स्वातंत्र्याची पहाट मंगलमय
आली घेवून रम्य प्रजासत्ताक
त्याग, शांती, प्रगतीचा तिरंगा
फडकवून देवू उंच नभास हाक

-


25 JAN 2022 AT 10:18

हात रिकामे पाहिले अन
माणूसकीची जाणीव झाली
जोडत गेलो सर्वांना अन
नाही कशाची उणीव आली

-


24 JAN 2022 AT 9:21

देतो निसर्ग
सदा इशारा
थांबव आता
नव्या शहरा

किती समस्या
ते प्रदूषण
गढूळ झाले
सारे जीवन

हाव सुटता
भाव संपले
कशास बोला
ऋतू कोपले

-


23 JAN 2022 AT 8:46

फूल जाहले कळीचे
कळले मला न केव्हा
आरशात पाहिले अन
हासले गुलाब तेव्हा

-


22 JAN 2022 AT 9:04

माझेच तर आहेत सारे
परकेपणा का दाटतो
ह्या क्षणी सोडून वर्तुळ
मोकळं मनाला सोडतो

जा म्हणावं, परतून वेड्या
जेथे निसर्ग भेटतो
खेळ मांड पुन्हा नव्याने
जिथे फक्त आनंदच जिंकतो

-


21 JAN 2022 AT 8:34

रंगबेरंगी फुलांच्या विश्वात
आपणही रंगून जावं
रंगता रंगता असं रंगावं
या जन्माचं फूलच व्हावं

-


Fetching Padmakar Mhatre Quotes