QUOTES ON #वाट

#वाट quotes

Trending | Latest
26 FEB 2021 AT 16:14

प्रेमाचे झंकार उठतच होते
तरी का?
तुझ्यासाठीच
तुझ्या होकाराची वाट पाहत होते .

-


7 JUL 2017 AT 17:34

वाटेवरील काचांपेक्षा जास्त आजकाल काही नजरा टोचतात...

-


19 JUL 2017 AT 14:22

वाटेवर वाकडे पाऊल एकदाच पडते,
पण पाय जन्मभरासाठी मुरगळतो...

-


19 APR 2021 AT 12:28

झोपमोड झाली माझी पाहताना जग स्वप्नांचे,
रडतात हात लिहीताना शब्द अनावर झालेल्या दुःखांचे,
मिटवून गेल्या सर्व आठवणी लिहिलेल्या शाईच्या लाटा,
शोधत राहिलो मी त्या हरवलेल्या स्वप्नांच्या वाटा...

-


25 FEB 2019 AT 15:23

आज ते दोघे पुन्हा एकदा
खूप भांडले होते
अन् त्यांचा विरह बघून
कोणा तिसऱ्यानेच शब्द मांडले होते
( तिसरा - जो मनातून तिच्यावर प्रेम करणारा पण कधी तिच्यासमोर व्यक्त न करणारा )

बोलायचं होतं त्यालाही काहीतरी तिला
की तोही प्रेमात पडला होता
त्याच्यासाठी मग तिने
मैत्रीचा डाव मोडला होता

दररोजचे येणारे फोन आणि मेसेज
आता तिचे बंद झाले होते
तिला नाही पण कळत होते त्याला
त्याच्यासाठीच त्याला टाळले जात होते

तरीही बघत होता तिची वाट
की येईल कधीतरी तिला माझी आठवण
मग नसेल तेव्हा मी ऐकायला
तुझ्या मनात भरलेल्या दुःखाची साठवण

-


22 DEC 2020 AT 17:19

🥀वाट🥀

परिस्थितीने गांजलेल्या दोन जीवास
पाश तोडून मुक्त भेटायचे असेल
जगत असतील दोघे ठेऊन अशी आस
की ती/तो पण माझी वाट पाहत असेल...!!🍁

तोडूनी समाजापरी धागे प्रेमाचे
आपापल्या वाटेस निघुन गेले असेल
रोज सकाळी वाटे बघुनी किरण आशेचे
की ती/तो पण माझी वाट पाहत असेल...!!🍁

तोडूनी बंध विरोधी असलेल्या जातीचे
पक्षी होऊनी खुप उंच उडायचे असेल
गुंग असतील विचार करत एकमेकांचे
की ती/तो पण माझी वाट पाहत असेल...!!🍁

निस्वार्थी प्रेमी वेदनेने विव्हळत असेल
जुन्या आठवणीत पुन्हा गुदमरले असेल
देत असतील हुंदके,जेव्हा भास होत असेल
की ती/तो पण माझी वाट पाहत असेल...!!🍁

– Ashwini Gajbhiye✍️ (शब्दाश्विनी)

-


10 JUN 2019 AT 11:26

निळ्या नभात शुभ्रता दाटते
जश्या समुद्र लाटा वाहते.
त्या भेटीने हे ह्रदय दिले तुला
आज वाट तुझी मी पाहते..

तू थांब ना रे जवळ माझ्या
का येते क्षणात जाते.
कंप वाढतो मनात माझ्या
नि अश्रू तरंग होते..

तू माझा असा झाला काही
जसे पाणी पाण्यात मिळते.
होते प्रेमवर्षाव नभी या
जेव्हा तुझे माझे नाव जुळते..

-


14 APR 2019 AT 0:05

दुर तिथे पलीकडे,
दिसते मला आजही ती.
भेटली होती जिथे मला,
पहिल्यांदा ती.
(पुर्ण कविता मथळ्यामध्ये वाचा)

-


5 JUN 2021 AT 12:04

तुझ्या नजरेत समुद्राची खट्याळ लाट आहे.
खर सांगू हीच तर माझ्या प्रेमाची वाट आहे.
रात्र उजाळली तरी ही अंधाराची साथ आहे
नेत्र उघडले तरच, नवचैतन्याची पहाट आहे.

-


25 AUG 2019 AT 22:09

....
























-