या जगात कुणीही कुणाचही इतकं नुकसान केलेलं नसेल जितके अज्ञानाने अज्ञानी माणसाचे केले आहे..!
-
_माणूस_
सोशल डिस्टन्स तर फक्त निमित्त आहे
माणूस माणसा पासून कधीच दूर गेलेला आहे.-
स्वभावाच
कोडं
सुटल
की
माणूस
उलगडायला
सुरुवात
होते.
-JITU/G2/GG-THE MIND SEEKER.-
राजे,पुन्हा एकदा जन्म घ्याल का?
आजच्या स्वार्थी सूर्याला निस्वार्थी आशेची किरणं दाखवाल का?
माणुसकीचे धडे आजच्या स्वार्थी जगाला शिकवाल का?
नाव लावलेल्या शिवभक्तांना "खरा शिवाजी" कोण ते सांगाल का?
तुम्हीच निर्माण केलेल्या स्वराज्याला "सुराज्य" कराल का?
राजे,पुन्हा एकदा जन्म घ्याल का?
अहंकारी पुरुषाला संसाराचे ओझे उचलताना धीर द्याल का?
स्त्रियांच्या स्त्रीत्वाला खरे अस्तित्व द्याल का?
चूल-मूल याच्या पलीकडील जग तिला दाखवाल का?
भ्रष्टाचाराला आळा घालून तरुणाईला योग्य दिशा दाखवाल का?
सांगा ना राजे,
पुन्हा एकदा जन्म घ्याल का?
वनवन भटकणार्या पायांना, आसरा तुम्ही द्याल का?
ह्या गोरगरिबांचे मायबाप होऊन, तुमच्या कुशीत घ्याल का?
हे मृत्यूशी चाललेल राजकारण तुम्ही येऊन थांबवाल का?
हरवलेला माणुसकीचा धागा शोधून पुन्हा माणसात गुंफाल का?
सांगा ना राजे,
पुन्हा एकदा जन्म घ्याल का?
माणसातल्या माणसाला शोधून पुन्हा माणसात आणून बसवाल का?-
वा-याकडे वा-याने कान देऊ नये..
मान देणा-याची , मान छाटू नये..
प्रत्येकात दिसेल मग देव...
फक्त
माणसाला माणसांची भूक लागू नये...
©समीक्षा भुसारी✍-
माणूस...हरवतोय??
प्रेम मागावे माणसा
माणूस लाचार लाचार...
कासावीस होतो जीव
मन उदास होऊन
कुठं मिळणार माणूस
माणूसपण शोधता शोधता...
स्वार्थ आहे जणू त्यांचा
पाठराखण जन्मांतरीचा
इथल्या गर्दीत माणसांच्या
माणुसकी हरवलेला...
चार शब्द असावेत आशेचे
आधार होताना कुणाचा
सगळा गोतावळा माणसांचा
तरी माणूस एकटा एकटा...
जगताना आयुष्याच्या मैफिलीत
मनी आसवांच्या भाषा
-अश्विनी मोहिते-
मोगऱ्याच्या सुगंधाने
आसमंत धुंद झाला
माणसाच्या जन्माने
माणूस ' माणूस ' नाही झाला
माणसाने माणसाचा
आज मांडलाय खेळ
तक्रारी ऐकून
देव झालाय व्याकूळ
माणसास कंटाळूनी
देव जाई रानोवनी
निसर्गाने देवाला
धरीले कवटाळूनी
माणूस हुशार हुशार
त्याने दगडाचा देव केला
देव दगडाचा करीता
माणूसच दगड झाला-
समाजातील जातपात, हेवा दावा,
वर्णभेद, वंशवाद संपणार तरी केव्हा?
जगात 'मानवता' हाच 'धर्म' राहून,
'माणूस' म्हणून जगता येईल का रे देवा?
-
मोबाईल आल्यापासून माणसा माणसातला संवाद कमी होत चाललाय
हळूहळू माणुसकीला पण तडा पडत गेलाय
मदत मागणाऱ्याला मदत न करता भिकारी म्हणून जातात
आईवडील असूनही आजकाल मूल अनाथ होतात
प्रेम करता येत नाही तर प्राण्यांना घरी आणावे का?
त्या मुक्या जीवाला उगाचच मारता याला माणुसकी म्हणावे का?
-
तुझं वागणं तसं शिस्तबद्ध एकाच चाकोरीत असायचं
वेळेतच सारं काही निसर्गाचं चक्र ठरलेलं असायचं
आता मात्र सगळंच निराळं असं चित्र दिसतं तुझं
माणसांच्या सान्निध्यात राहून तू ही स्वतःला बदलंस वाटतं-