आठवणींनी जेव्हा माझे,
सारे आभाळ दाटून येते
शोधताना भास तुझे
हृदय व्याकूळ होऊन जाते-
आठवणी परी माझा श्वास आहेस
तू भास तरीही काही खास आहेस
नितळ भावनेतला ओलावा मनाचा
तू मौनातली हळवी सांजभूल आहेस-
तुझी आठवण म्हणजे गारवा
हळव्या मनाचा हळवा कोपरा
नितळ नित्य नव्या अनुभवासह
गोड चेह-यावरचा भाव हसरा-
किसी ने रुलाया, तो किसी ने हसाया हैl
किसी ने ठुकराया, तो किसी ने अपनाया हैl
शुकर है सदा के लिये...ऐ खुदा तेरे हम
किसी ने गिराया, तो किसी ने संभाला भी हैl-
माझं तुझ्यात हरवून जाण्याला तुझं
'माझं असणं' एवढंच कारण पुरेसं असतं
-काव्यामृत
-
एखाद्याच्या आयुष्यात आपण पुर्ण शून्य असतो... पण आपल्यासाठी मात्र ती व्यक्ती आपलं आयुष्य, आपलं जग बनलेली असते...
सावरता आलं तर सावरावं वेळीच...अश्या वेळी...-
अक्सर हम जिन्हे जिंदगी में कभी खोना नहीं चाहते वो ही हमसे बहुत दूर चला जाता है...l
-
नातं स्वीकारता आलं पाहिजे आपलेपणानं, त्यातल्या मायेच्या ओलाव्यानं, समर्पण आणि विश्वासासहित एकमेकांच्या ओढीतल्या जाणिवेने...
त्यातल्या निरंतर एकोप्याने, उल्हासाने अन् मनातल्या अनेक व्यथांच्या सोबतीने... तितकच अलवार, हळूवार...
-
आपल्यांच्याच वरवरच्या आपलेपणात वावरण्यापेक्षा एकटे राहणं कधीही चांगलच....
-