ओळखीची माणसे जेव्हा ओळखून
न ओळखल्यासारखी दाखवतात,
तेव्हा त्यांची ही नवीन ओळख
बरंच काही सांगून जाते.-
प्रेम, आपुलकी, स्नेह, या काही मोजता येण्यासारख्या गोष्टी आहेत का, त्या साठी काही मोजमाप किंवा एकक आहे का? तर नाही ना..।
त्या एकतर असतात नाही तर नसतात,
त्यात थोड किंवा जास्त प्रमाण अस काहिही नसत..।
फक्त ज्या आपल्या जवळच्या ,
कमावलेल्या आपल्या माणसां विषयी आपल्या मनात या चांगल्या भावना आहेत, त्या शेवटपर्यंत तशाच जपता आल्या पाहिजे अगदी शेवटपर्यंत..,तर मग किती ही गैरसमज झाले कुणी काहीही सांगितले..,
doesn't matter...|
-
दीप सुविचार धारा....✍️
🌼🌸💮🏵️🌺🌹💐
आपल्या माणसाकडून "अपेक्षा" जरूर बाळगावी,
पण,
नाती व माणसं तुटणार नाही,
याची फक्त काळजी घ्या.-
दीप सुविचार....✍️
🍁🌹🍁
आयुष्य आणि पुस्तकाचं व्याकरण सारखंच आहे.
शब्द निवड चुकली की, वाक्य बिघडत आणि माणसाची निवड चुकली की,आयुष्य बिघडत.-
माणसां सोबत म्हणे
पुर्वी रहात होती माणसे..!
काळ वेळ बदलली
तशी बदलत गेली माणसे..!
पावलागणिक बाजारी
फसवणारी भेटती माणसे..!
उपकारांस विसरणारी
भेटतात मतलबी माणसे..!
निस्वार्थ ज्ञान वाटणारी
स्मरणात राहिली माणसे..!
फसवून काही पळाले
शोधतो हरवलेली माणसे..!-
●●●बेकसुर माणसांन्नो●●●
माझ्या भीतर लपलेली
अनाथ झालेली
षंढत्वाची वहिवाट शोधयचीय मला
हा मी असा...बेकसुर असू शकतो काय?
कि मला कैद केले पाहिजे श्वापदांच्या कारागृहात
जेथे राहतात नरभक्षी माणसं
त्यांनाही असतात इंद्रिये
तेही करतात हस्तमैथुन
भोगतात गावेची-गावे
नाचतात ताला-सुरात
कर्म-धर्म मानतात तेही
भोंगळया बैराग्याने
देव-देवी नावाची रखेल फिरवावी दारा-दारावरून
मैला वहावा डोक्यावरून
अंघोळ करावी मूत्राने
मग मीही होईल माणुस
माणसा सारखं वागेल
अन थुंकेल तुमच्या कर्मठमेंदूवर.....!
- मिलिंद सुमन अशोक दामोदरे
-
गर्दीने राहणारी ही
एकेकटी माणसे
रहदारीत अडकलेली
दिशाहीन माणसे
छापाचा शिक्का बसलेली
बिना चेहऱ्याची माणसे
कशाला उगाच जन्मलेली
रस्त्यात पिचलेली माणसे
टीचभर खळगीत उभा जन्म घातलेली
टीचभर माणसे
आभाळाला भिडलेल्या नगराची
गाळात रुतलेली माणसे
मान मोडून कार्यालयात गंजलेली
कणाहीन माणसे
गणतीत कुणाच्याही नसलेली
नगण्य माणसे
कुठून उगवली कुठे चालली
मूळ हरवलेली माणसे
डोळ्यांत न मावणाऱ्या स्वप्नांच्या दुनियेतली
बेहोश मदमस्त माणसे
© संदीप राऊत बुलडाणा-
आपलीच आपल्यांना फसवतात माणसे
बोल खोटे बोलूनिया बनवतात माणसे
वेळ आहे, वेळ नाही खेळ त्यांनी खेळला
नात्यांना बाजारात बसवतात माणसे
प्रत्येकाचा डाव आहे प्रत्येकाला भाव आहे
आव खोटा दाखवूनी हसवतात माणसे
☆☆Ğàjåňáń☆☆-