QUOTES ON #माझ्या

#माझ्या quotes

Trending | Latest
4 JUL 2019 AT 11:19

माझा वाटेला आलेलं प्राक्तन,
हसत हसत स्विकारून,
सावरले मी...
नवी सुरुवात करायला.
नवीन स्वप्नांचे गाठोडे,
पाठीशी बांधून,
निघाले मी...
एका अर्थपूर्ण प्रवासाला.
आप्तांची चिंता,
दूर लोटून,
शिकले मी...
स्वतःसाठी जगायला.
मनावरचा क्षीण,
त्वेषाने दूर सारून,
पेटून उठले मी...
आयुष्य नव्याने घडवायला.




-


4 JUL 2019 AT 16:30


माझ्या वाटेला आलेलं दुःख
कधीच तुझ्या वाटे येऊ नये
जसं तू माझ्यासोबत केलं
तसं तुझ्यासोबत कोणी करू नये

तुला दोष देण्यात अर्थ नाही
ही तर प्रत्येकाची कहाणी आहे
भर भरून प्रेम केल्या नतंरही
शेवटी डोळ्यात पाणी आहे

सांझ वेळ आठवणींचा खेळ
तुला कधी कळणार नाही
ठाऊक आहे त्या पायवाटेवरी
तुझे पाय कधी वळणार नाही

माझ्या वाटेला आलेलं दुःख
माझं मलाच सोसावं लागेल
कितीही काही केलं तरीही
ते माझं मलाच भोगावं लागेल
-राकेश शिंदे
rakeshkavita.blogspot.in

-


5 FEB 2021 AT 15:58

शोधता सापडेना
हृदय माझं हरवलंय रे
प्रेमाची लपाछपी खेळताना
❤️कुणी माझ्या मनात लपलंय रे..!!❤️

नजरेला नजर भिडली
गाली खुद्कन हसतंय रे
हृदय चोरून माझंच
❤️कुणी माझ्या मनात लपलंय रे ..!!❤️

दरवळला गंध प्रीतीचा
मनास भुरळ पडली रे
भास करी मधहोश जणू
❤️कुणी माझ्या मनात लपलंय रे..!!❤️

– Ashwini Gajbhiye✍️(शब्दाश्विनी)




-


7 MAR 2019 AT 12:06

काल स्वप्नात माझ्या,
गेली मी अनोळखी गावा...
जिथे होता फक्त अन फक्त
प्रेमाचाच ओलावा....

फुलांचा सुगंध तिथे
मातीचा दरवळही
होता रंगीबेरंगी फुलपाखरांचा थवा
अन फुलांचा ताटवा....

संथ वाहणार पाणी होत
खोल खोल समुद्रही
लाटांचा निखळ खळखळाट होता
अन शांत गंभीर किनाराही...

रानावनात फिरली
फुलपाखरांसवे खेळली
मनसोक्त बागडली,

माझ्यातली मीच मला पुन्हा नव्याने गवसली,
कारण गेली होती मी अनोळखी गावा
काल स्वप्नांत माझ्या.....!

-


17 AUG 2020 AT 22:39

असावे जगात कुणीतरी माझी व्यथा समजणारे
न बोलता काहीही मला आपल्या मिठीत घेणारे,
नाही काळाच्या वेदना नाही प्रेमाचे पाश मानणारे
असावे कुणीतरी माझ्यासाठी मला नेहमी विशेष भासवणारे.

-


23 APR 2019 AT 19:40

मी आज फक्त एका मुलीच्या मनातील भावना रित्या करण्याचा एक छाेटासा प्रयत्न करणार आहे...

( खाली वाचावे )

-


27 SEP 2021 AT 15:36

कोणीतरी आपल्याला खुप आवडतं
त्याच्याशी बोलावं वाटतं, हितगुज करावं वाटतं
प्रत्येक फिलिंग शेअर करावी वाटते.
मग ती फिलिंग चिरकाल अबाधित राहील याचा
विचार करा ना ...
तो वाटणारा हवाहवासा सहवास किंवा बंध जपा ना त्याला नाव देण्यापेक्षा.....

काय पटतंय ना....???

-


23 APR 2019 AT 20:08

अशी काही पाने आहेत, की ती अस्ताव्यस्त पडलेली आहेत आणि ती पाने गोळा करून समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत आहे.....

-



(जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचे जवान स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले. त्यांच्या पत्नीच्या भावना माझ्या शब्दातून... (काल्पनिक कविता) ... 🙏🙏)

काल स्वप्नात माझ्या
निनाद येऊन गेले...
त्यांनी केलेल्या देशसेवेचा
महिमा सांगून गेले...

सोडायची नव्हती अर्धवट साथ
पण देशासाठी सोडून गेलो...
शरीराने गेलो वेडे पण तुझ्यासाठी
आत्मा तेथेच सोडून गेलो...

नकोस बसु तू दुःखात
तुला खंबीर व्हायला हवे...
आठवणींचे वादळ कितीही घोंघावले
तरी त्याला सामोरे जायला हवे...

माझ्या छोट्याशा परीला ही
तू शिकवून खूप मोठं कर...
आणि तिलाही माझ्यासारखंच
आर्मी मध्ये भरती कर...

बन आता तू कणखर
मी असेन सदैवच तुमच्यासोबत...
आकाशातील लुकलुकत्या
तार्यातून तुम्हालाच सदैव पाहत...

-


10 JAN 2020 AT 15:34

अनेक आली संकटे
या येवो दुःखे अनेक
तरी मी हसणं सोडणार नाही...

करेल प्रहार मी वाईट प्रवृत्तीवर
जीव जाइस्तोवर
गुलामगिरीच्या बेड्या
मी घालणार नाही......

दिली जातील अमिषे अनेक
फुटेल पाझर नयनांना
तरीही या वाळवंटात
मैत्रीचा सुगंध दरवळणार नाही...

केल्या सहन मी अनेक यातना
करेल सहन वेदना
तोडली गेली जरी लेखणी माझी
तरीही मी हरणार नाही...

दुःखाचे ढग जरी
अश्रू बनुनी आले
तरी त्यांची बंदिस्त मी होणार नाही....

मी हसत राहील.....
-निखिता डाखोरे

-