Ashlesha Girnarkar   (Ashlesha)
1.3k Followers · 8 Following

read more
Joined 14 November 2019


read more
Joined 14 November 2019
11 OCT 2024 AT 13:24

नयनांतून वाहणाऱ्या आसवाला
मी जरा क्षणभर अडवून विचारले
का पळतोस तू बेधुंद ईतका ,जरा सावर रे
त्यावर तो मज म्हणे,
उत्तरात अडकू नकोस सखे
ह्रदयावर व्रण तीव्र आहे
बोचणारे शल्य तुझे नाही
हि व्यथा ह्रदयाची आहे
कल्पनेत अडकलेली मी ती कथा आहे
या शकुंतलेची हीच शोकांतिका आहे
त्याचे उत्तर माझे शब्द नाही
मी लेखणी पण तो कागद नाही
मी आरसा पण तो रूप नाही
मी अश्रू पण तो नयन नाही
मी सरिता पण तो सागर नाही
आणि या प्रीतीत बांधलेली मी
जिच्या कथेचा शेवट दुष्यंत नाही.

-


7 OCT 2024 AT 11:51

ना मैं वह सती हूँ प्रतिकार नहीं प्रतिशोध हूँ
ना तुम द्रोपदी हो आंसू नहीं अंगार हूँ
हर बार अग्निपरीक्षा दूं जो हर व्यूह भेदे
ना मैं वह जानकी हूँ । मैं स्वयं वो अस्त्र हूँ।
मोहन की बांसुरी सम मन का सुकून हूँ
गीता की गरिमा सी शक्ति का रुप हूँ
गंगा के जल सम ना कोई माया ना कोई बैर
अग्नि सी पवित्र हूँ। मैं वह आरंभ हूँ।
जीवन की संहिता हूँ कवि की कल्पना में
सृष्टि की रचयिता हूँ कभी ऊनकी कविता हूँ
वेदों की भाषा हूँ दायरों में जकड़ी फिर भी
धर्म की परिभाषा हूँ । त्याग का प्रमाण हूँ।

- Ashlesha

-


7 JUL 2024 AT 15:29

It's good to be surrounded by the people who really cares about you but it is always better to have your own company.
If you don't value yourself no one will ever. You have to value your time because it's a part of life you are giving to someone.
You should be the reason for your smile and happiness because no one will ever.

-


7 JUL 2024 AT 15:27

It's good to be surrounded by the people who really cares about you but it is always better to have your own company.
If you don't value yourself no one will ever. You have to value your time because it's a part of life you are giving to someone.
You should be the reason for your smile and happiness because no one will ever.

-


2 FEB 2024 AT 22:45

मी रचेल कोडे शब्दांचे
तू ते शब्द होऊन जा
सोडवता येईल रे सारे
तू फक्त तुझे नाव जोडून पाहा

मी लिहिल व्याख्या प्रेमाची
तू ते प्रेम होऊन जा
समजावता येईल रे सारी
तू फक्त डोळे मिटून पाहा

मी मांडेल सूत्रे गणिताची
तू ते गणित होऊन जा
सिद्ध करता येतील रे सारी
तू फक्त मला तुझ्यात शोधून पाहा

मी सांगेल व्यथा ह्रदयाची
तू ते ह्रदय होऊन जा
अंतरे होतील रे सारी
तू फक्त मला मिठीत घेऊन पाहा

मी बांधेल गाठ श्वासांची
तू तो श्वास होऊन जा
सावरता येतील रे सारी
तू फक्त माझी साद ऐकून पाहा

मी वेचेल अश्रू नभातील
तू ते नभ होऊन जा
कवेत सामावतील रे सारी
तू फक्त माझा होऊन जा.

-


28 DEC 2022 AT 11:54

आज फिर एक नई शुरुआत करनी है
उगते सुरज के साथ नई मुस्कान पानी है
बिती जो कल रात गम की
आसूंओं में ढली उसकी कहानी है
आज फिर एक नई शुरुआत करनी है
जकड़ा जो इन यादों ने कल है
तो मुस्कुराकर इन्हें खुद में महफूज़ करना है
बिखरा जो हर एक पल लगे तुझे
तो खुद को ढूंढने की कोशिश करनी है
छुटा जो आज यह मुकाम तुझसे है
तू जिंदगी से यूँ मायूस ना बन
माना रात की तनहाई जरा गहरी है
पर सवेरे से यूँ महरुम ना रह
पता है के सफ़र मुश्किल बड़ा है
माना के मंजर जरा दूर खड़ा है
हां जुबां इस टुटे दिल को रहीं है
ख्वाब जरा फिलहाल धुंधले लग रहे है
पर याद रख तू भी उस कश्ती का सवारी है
जिसे अपना किनारा ढूँढना बेशक मुमकिन है।


-


24 DEC 2022 AT 21:53

आंखों में नमी थी जरा सी
पर कम्बख़्त सब कुछ बयां कर गई
वो सामने ठहरे थे हमारे
पर जनाब पाबंदियां कुछ यूँ नजर आ गई।
रोक रखा था मुश्किल से दिल को इस बार
पर कोई जंजीर उसे कैद ना कर सकीं
जुबां खामोश थी पलकें झुकी हुई
दिल के हुए तुकडे हजार मैं सिमटती रह गई।
हालात से वाकिफ कहाँ थे हम अपने
यूँ तो ये आंसू आज नजर आने लगे
संभले हम उनकी मुस्कुराहट पे नहीं थे
खैर आज उनसे आखिरी मुलाकात हुई है।
सब कुछ तो गवा चुके है अपना पर
चलो ये सज़ा भी हम ने अपने नाम कर ली
बिखरी यादों के साथ उनकी
आज फिर हमारी मोहब्बत बदनाम हो गई ।

-


30 NOV 2022 AT 22:07

मांडते तुला मी माझ्या विचारातून
कारण इतरांसाठी तू वेगळा असशील
मला शब्द बनून भेटलेला
कोणासाठी कवी असशील

शोधते तुला मी जरा तुझ्यात
कारण इतरांना तू ज्ञात असशील
मला सारांश म्हणून भेटलेला
कोणासाठी गाभा असशील

जपते तुला मी जरासा माझ्यात
कारण इतरांसाठी तू सबंध असशील
मला अर्थ बनून भेटलेला
कोणासाठी उत्तर असशील

रेखाटते तुला मी माझ्या नजरेतून
कारण इतरांचा तू सोबती असशील
मला सावली होऊन भेटलेला
कोणासाठी काया असशील

साठवते तुला जरा माझ्या रूपातून
कारण इतरांसाठी तू श्रृंगार असशील
मला दर्पण म्हणून भेटलेला
कोणासाठी रूप असशील

-


16 OCT 2022 AT 22:15

रात्र जी सरत नाही, दिवस जो ढळत नाही
आठवण अशी तुझी जी संपता संपत नाही
भावना माझ्या मनातील तुला सांगू शकत नाही
कळूनही तुला, माझ्या हातील रीतेपण जाणार नाही
स्वप्न नाही, भास नाही, रंग नाही, रूप नाही
भान आहे स्वतः चे मला का एवढे पुरेसे नाही
ह्रदयातच जपते तुला माझ्या भाग्यातील तू तो तारा नाहीस
वेडेपणा किती हा पण माझा, समजूनही ऐकत नाही
कल्पनेच्या डोहात विरंगुळले मी जिथे कोणाचेही वर्चस्व नाही
अस्तित्वाच्या खोलात तू तो अथांग सागर ज्याचा साधा
एक अश्रू ही माझा नाही.

-


15 OCT 2022 AT 19:25

तुझे ते निखळ हसणे
ज्याने मला वेडे करावे
जसे श्रावण सरींनी कोसळून
चातकाला बेधुंद करावे

तुझे ते बोलके डोळे
ज्यांनी मला निरखून पाहावे
जसे त्या शुभ्र चंद्राने आपल्यात
या रजनीला सामावून घ्यावे

तुझे ते मधुर बोलणे
ज्याने माझे भान हरवावे
जसे शब्दांनी एकमेकांत गुंतून
भाषेचे रूप पालटावे

तुझे ते निरपेक्ष मन
ज्याने मला ह्रदयात जपावे
जसे शिंपल्यात लपलेल्या मोत्याला
सागराने आपल्या कवेत घ्यावे

-


Fetching Ashlesha Girnarkar Quotes