QUOTES ON #मराठीमुलगी

#मराठीमुलगी quotes

Trending | Latest
17 MAY 2021 AT 9:40

#सेल्फीकोट #
दोन ओळी स्वतःवर..



मनातले
डोळ्यात दिसावे..
मौनातले,
शब्दात लिहावे..

-


29 DEC 2019 AT 7:02

पण तू अजुन मला "मैत्रीण"च समजतोस
तर मीच का करावी विनाकारण घाई?
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

बाकीच्या पोरिंकडे बघताना वाटतं-
करावी तुला काटेकोरपणे मनाई
पण तू अजुन मला "मैत्रीण"च समजतोस
तर मीच का करावी विनाकारण घाई?

मनात तर खूप येत की विचारावं-
"कशा आहेत आमच्या सासूबाई?"
पण तू अजुन मला "मैत्रीण"च समजतोस
तर मीच का करावी विनाकारण घाई?

रोज सकाळी उठून म्हणायचंय
"अहो, आज उठायचंय की नाही?"
पण तू अजुन मला "मैत्रीण"च समजतोस
तर मीच का करावी विनाकारण घाई?

छान-छान स्वयंपाक बनवून
दाखवायची आहे तुला माझी चतुराई
पण तू अजुन मला "मैत्रीण"च समजतोस
तर मीच का करावी विनाकारण घाई?

मैत्रिणींच्या नवऱ्यांच कौतुक ऐकून वाटतं
मी पण करेन त्यात तुझी बढाई
पण तू अजुन मला "मैत्रीण"च समजतोस
तर मीच का करावी विनाकारण घाई?

-



कमाल दिसते ती साडीवर
अरे लाखो मरतात तिच्यावर
पण तिच लक्ष नसत कुणावर
तिला पाहताच दर्जा हा
शब्द येतो ओठावर ।

-


25 DEC 2019 AT 16:34

माझी लेक

लाडाची माझी लेक
लाखात शोभुन दिसे एक.
स्वतः अभ्यास करता "दिपल" ला ही घेते,
घरात जणू ती शिक्षिका बनते.
आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते,
वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.
अभ्यासा बरोबर घरातही लक्ष देते,
त्रास नको आईला म्हणून मदत ही करते.
ताठ होते मान,उर भरून येतो
शाळेत जेव्हा तिला मी स्टेज वर पाहतो
अभिमान वाटतो मला तिचा,छान वटवते प्रत्येक भूमिका,
काहीच चूक केली नाही आम्ही तिचे नाव ठेवून "गुणिका".

-


23 SEP 2020 AT 23:11

नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ
माझ्या चारोळी कडे....

' Like's 'तर येतीलच म्हणा..
माझे डोळे लागून बसले आहेत

तुझ्या एका'' comment '' कडे

-



.....



































-


9 FEB AT 0:29

जब लोग पूछते हैं कि हमारे बीच क्या हुआ, तो मैं इसे टाल देती हूँ और एक साधारण सा जवाब देती हूँ –
'हम बस साथ नहीं रह पाए। हम बड़े हुए और अलग हो गए।'
यह समझाने से आसान है कि
"कैसे एक दिन मैंने अपनी हथेलियों में पूरी दुनिया थामी हुई थी, और अगले ही दिन उसे अपनी उंगलियों के बीच जलते हुए देखा।"
हम बड़े हुए और अलग हो गए, और शायद अगर मैंने तुम्हें थोड़ा सा भी कम प्यार किया होता, तो मैं शब्द खोज पाती। लेकिन तुम्हें प्यार करना कभी आसान नहीं था, और तुम्हें खो देना वह कहानी है, जिसे मैं कभी बयां नहीं कर पाऊँगी।

-


17 SEP 2022 AT 20:01

साध बोलन आमचं आता,
जरा पलीकडे जाऊ लागलं.
मैत्रीच्या भावनांच रूपांतर,
आता प्रेमात होऊ लागलं.

आवडू लागलं मला,
आता तिची वाट बघणं.
बघुनी तिच्या डोळ्यात,
स्वतःला विसरून जान.

क्षणा क्षणाची ओढ,
वाढविते अंतर्मनी भावना.
केव्हा भेटायचं आता,
मी हे तिला विचारल्या शिवाय राहेना.

नासिका तिचे धारधार,
नयन तिचे जादूगार.
नयनांनी च करते ती वार,
तर सौंदर्याने करते घायाळ.

केस तिचे मखमली,
गालावर तिच्या लाली.
भासे मला अशी,
जशी अप्सरा इंद्र दरबारी.
(Shubham Deokar)

-


22 APR 2021 AT 17:32

गंधाळले श्वास अन्
वाढली स्पंदनांची धडधड..
विसवता मीठीत तुझ्या,
किती रे ह्रदयाची बडबड..

-


22 OCT 2020 AT 20:20

मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली,
हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली.
लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची,
हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची.
बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू,
म्हणे ही,अभ्यास माझा ओके राहील तू नको लक्ष देऊ.
करता करता मदत आज स्वयंपाक घर पाहते,
मम्मी कामावर असताना मला मॅगी करून देते.
स्वयंपाकाचे धडे मम्मी कडून चांगलेच घेतलेत,
आई ला मदत म्हणून कित्येकदा कुकर ही लावलेत.
हे झाले खाण्यापिण्याचे देवपूजे कडेही लक्ष दिले,
सकाळ संध्याकाळ दिवे लावून मन आमचे प्रसन्न केले.
खूप छान वाटते आता,मुलगी खूप समंजस वागते,
इतकी लहान असतानाही मला ती मोठी झाल्यासारखी वाटते.

-