🌺 श्री गणेशा 🌺
(अभंगपुष्प)
अर्पू दुर्वा फुले
करूनी आरती।
वंदू गणपती
श्री गणेशा।।
भाद्रपद शुक्ल
चतुर्थी तिथीस।
महिमा हा खास
विनायका।।
वक्रतुंड रूप
तुझे मनोहर।
तू वेदांचा सार
एकदंता।।
अष्टविनायका
रिद्धी सिद्धी नाथा।
किती वर्णू गाथा
गौरी सुता।।
Madhuri P. Warwatkar...✍️
-
राहिले ना अप्रूप आता या पैश्याचे
स्थिती आज साऱ्यांची सारखीच झाली आहे...
कुठे कुठे शोधता श्वास आता
माणसाने माणुसकीचा तळ गाठला आहे....
कुठे ठेऊ आशा माणुसकीची नक्की
जिथे तिथे भावनांचा समुद्र गोठला आहे....
राहीले नाही जुने काही इथे आता
फक्त मुठीत माझ्या थोडा श्वास उरला आहे...
नावाला बदनाम झालाय कोरोना
खरा वैरी तर माणसाचा माणूस बनला आहे....
श्वास ही थांबेल का हो या गर्दीत माझा
जीवाला घोर हा साऱ्यांच्या लागला आहे..
उजेडाकडे लक्ष जाईल कसे आता
आयुष्यात फक्त अंधार साचला आहे...
शोधात आहेत सगळे प्राणवायू च्या आता
जीवाचा इथे खेळ मांडला आहे...
शोधू नको आता देव माणसात
जिकडे तिकडे आता रावण बसला आहे...-
राजसाहेब ठाकरे
याच्या पुढं नाही चाले कोणाची
याला बघताच फाटे लोकाची
याचा रुबाबचं एवढा तलवारी
सगळ्यांवर पडे हा भारी...
शिवाजीचा आहे हा फॅन मोठा
याच्या पुढं चांगला चांगला नेता पडे खोटा
याच्या आवाजातच आहे खणखनात
दुश्मन पण पळे दणदणाट...
आपल्या महाराष्ट्राची आहे हा शान
वाढवतो किती हा आपला अभिमान
वाटते किती लोकांना याच्या बद्दल पिर्ती
कारण आहेच हा करण्यालायक कीर्ती...
याच नाव ऐकता दुश्मन म्हणतो बापरे
याचं नावचं आहे राजसाहेब ठाकरे...
💐🙏💐
-
सानपाऊली
एवढीशी तर होती माझी छकुली
कळलेच नाही कधी झाली माझी साऊली
आता तर कुठे धावत होती दुडूदुडू घरभर
बोलत होती मनभर दुःख विसरायला लावत होती क्षणभर
निखळ तिचं ते हसणं तिचं ते बोलणं लटकेच रुसणं
जसं हसरं चांदणं
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं ते घरात असणं
आता कळतय..बोचतय जेव्हा नसेल तिचं ते घरात नसणं
किती सुंदर दिसतेस आई तू असं तिचं ते म्हणणं
मग माझं त्यावर गोड हसणं
आणि मग दुःखातही वाटे हवहवसं जगणं
पण बघता बघता लाली आली गाली
इतक्या लवकर सासरी जाण्याची वेळ का आली?
काय तर म्हणे सगळ्यात मोठे कन्यादान
पण....पण हे तर जिवंतपणी आम्ही केलेलं अवयवदान
स्वार्थी मन मागे परत द्या हो हे दान
घराघरात दिसतील तुम्हाला आईवडिलांरुपी कर्ण
पण खरच कितीजण सांभाळून ठेवतात दानाचं हे पर्ण
प्रश्न एकदा विचाराच स्वतःला
विचार थोडा केल्यावर
उत्तर सापडेल नक्की तुम्हाला
मुलगी पाहिजे हो आम्हाला
मुलगी पाहिजे हो आम्हाला
- वंदना ताम्हाणे
-
कळले होते..
तू छळलेस तरी तुलाच प्रेम कळले होते
फाडली पत्रिका तरीही गुण जुळले होते
कित्येक आवाहनांना खुबीने टाळले होते
तू बोलविल्याविण पाय तुजकडे वळले होते
भेटलीस पहिल्यांदा,केश भाळावर रुळले होते
नव्हतीस चंद्र तरीही मन तुझ्यावर भाळले होते
चाललो किती वाट एकत्र,पाय तरी न चळले होते
कधी आनंदाचे पाट ,कधी आसु हाती गळले होते
राबलो चार हातांनी,कपडे अंगावर जरी मळले होते
गोड घासाचे गुपित,अंतरीच्या भुकेने कळले होते...-
अधीर होत मन हे , प्रयत्नागतीत यश शोधाया निघालं
हरले जिथे जिथे मग मी , मलाच गुन्हेगार ठरवू लागलं !!
शिखराच्या प्रेमागत पायाखालची जमीन ही , विनाकारण पाठीशी
नशिबानं चुकवला कधी तर , कधी तुझी इच्छाच नाही ती
मन हे चुकार हे , प्रत्येक गोष्टीत चुका शोधू लागलं
हरले जिथे जिथे मी , मलाच गुन्हेगार ठरवू लागलं !!
ध्येयामागे लागून किती क्षण गमावली , होते जे मी विसरून गेली
हाथी आता काही नाही तर आठवणी सुद्धा नाही ,
आपला दोष सर्वांवर देणार हृदय नशिबाला दोषी ठरवू लागलं
हरले जिथे जिथे मी , मलाच गुन्हेगार ठरवू लागलं !!
स्वतःला दोष देतांना मन खचले असं नाही
जे झालं ते झालंच पण माझ्यामुळेच झालं म्हणायला चुकले नाही
मेल्यागत गती स्वतःची केल्यावर मन स्वतःलाच सांत्वना देऊ लागलं
हरले जिथे जिथे मी , मलाच गुन्हेगार ठरवू लागलं !!
आली जीवावर उठून आता कारणं , मग मनच सखा होऊ लागलं
सारथी समजून त्या कृष्णाला , स्वतःशी स्वतःच लढू लागलं
फेटाळून लावले एवढे ही दोष , मी निरपराधी सिद्ध करून दाखवलं
जीवन खूप सुंदर आहे , आपण उगाच नष्ट झालेलं समजलं !!-
तुला भेटायचं आहे, खूप काही बोलायचही आहे
हृदयात तुझ्या सहवास करायचा आहे....
तू तिथे मी इथे, पण
तुझ्या श्वासात माझे प्राण अडकले आहे....
तुला मन भरून बघायचहीं आहे
तुझ्या घट्ट मिठीतही शिरायचं आहे....
तुझ्यासाठी वेडही व्हायचं आहे
पण हे फक्त स्वप्नातच शक्य आहे
कारण, तू फक्त माझ्या स्वप्नातला "हमसफर" आहेस...
– Ashwini Gajbhiye✍️(शब्दाश्विनी)-
जिथे प्रत्येक चुकीला माफी असते
जिथे निस्वार्थ प्रेमाची साठवण असते
जिथे कधीही न आटणारा मायेचा सागर असते
ते सुंदर जग म्हणजे 'आई' असते.....!
जीच्यापासनं कितीही लांब असलो तरी
आवाजावरून दुःख जाणून घेणारी व्यक्ती
प्रत्येक समस्येचं निराकरण करणारी युक्ती
आयुष्यात वाटाड्या म्हणून मार्ग दाखवणारी 'आई'
असते....!
आयुष्यभर लेकरासाठी घरात
कुठल्याही पगाराची अपेक्षा न ठेवता राबते
मुलांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी
रात्रंदिवस सतत झटते ती 'आई' असते....!
अथांग सागरासम आयुष्यातील
प्रत्येक सुखदुःख सामावून घेते
जिच्या रागवण्यातही प्रेम दडलेलं असते
ते सुंदर जग म्हणजे 'आई' असते....!
नऊ महिने त्रास सहन करून सुद्धा
ती कसलीही अपेक्षा बाळगत नसते
दुःखाचं दडपण असलं तरी चेहऱ्यावर स्मित हास्य असते
ते सुंदर जग म्हणजे 'आई'असते....!
- ✍️Ashwini Gajbhiye (शब्दाश्विनी)-
ये अशी प्रिये तू जवळी गं माझ्या....
वाहतो दशदिशांना हा धुंद वारा
मनाच्या त्या अधीर भावना
संगे पावसाच्या रोमांचकारी धारा
तुझा स्पर्श मुका भाळवी मनाला
साथ तुझी अधुऱ्या स्वप्नांना क्षणाक्षणांना
आधार घेतो मी रुक्ष तरुंचा
साद घालतो नद्या-दऱ्या पर्वतांना
चित्कार हा अवघा आसमंत गाजविणारा
मन माझे सुन्न विषण्ण करणारा
अंगिकारच जणू दुःख-विरहांचा
आर्जव माझा कळकळीचा
या नर्कयातना मज आता सहवेना
सहवास तुझा हवाहवासा
निद्रिस्त कल्पनांना जाणिवेचा
ये अशी प्रिये तू जवळी गं माझ्या....
- अमोल गडे.
-
प्रेमात पडलो मी तुझ्या,
माझे डोके आता शांत झाले !
समोर बघताच तुला जणू,
माझे डोळे का बंद झाले !!
लाजेने सावरत केस तिचे,
तिने कानामागे ती सावरले !
एका गालावरती मंद हसूनी,
तर दुसऱ्यावरती खळी मी पाहिले !!
सावरूनी मी माझ्या मनाला,
ती स्वतः मधे तल्लीन होती !
पुन्हा नजर भिडूनी तिने,
मला पुन्हा घायाळ केले !!
तिच्या हुंदक्यांचे स्मित हसू,
माझ्या हृदयावरती आदळले !
जसे येताच अंगावरती शहारे,
वातावरण ही ढगाळले !!-