मैं हरफन मौला और तू मेरी प्रीत प्रिये
हर साॅंस मेरी दिल की धड़कन तुझ में ही जिए
कहती हैं जी लूॅं तुझ में जिंदगी भी तरसती हैं तेरे लिए
कह तो दूॅं कुछ पर लफ्ज भी बैठे हैं होठ सिए
( संपूर्ण रचना कॅपशन में )
-
बी. ए.
शिक्षिका
छंद - वाचन, लेखन
कविता, लेख, निबंध, सदर, परीक्ष... read more
*सामना*
झुंज वादळाशी अन् कर सामना
कणा जाऊ दे प्रयत्नांचा आभाळाशी
विजिगीषु वृत्ती बाळग जरा उरात
विजयपताका लोळेल तुझ्या पायाशी
नकोच हारू अन् कच खाऊ
जिंकण्याची करून प्रतिज्ञा स्वत:शी
रक्तबंबाळ होऊनी घाव घे हृदयी
तुडवित जा काटे जवळिक नको फुलांशी
येतील खोटी प्रलोभने मार्गी अडथळे
ओळख डाव तयांचा विखारी जराशी
सत्याची कास धरुनी कर उध्वस्त असत्या
अनेकास होईल अंतरी ज्योत स्वंयप्रकाशी
पिऊन टाक समुद्र एक आचमनात
वारसदार तू नाते तुझे त्या अगस्तीशी
डोळ्यांत डोळे घालून भेकड संकटांच्या
हस्तांदोलन कोण करेल तुज वादळाशी
वीरपुरूषा भय कसले माहीत नाही
वीरश्रीची माळ गळ्या शोभे शौर्याशी
निर्माल्य न याचे कधी अथांग सागरी
कोण गिळेल अशा सहस्त्ररश्मी सूर्याशी
*-वंदना ताम्हाणे*
-
फक्त तुझ्याचसाठी सखया लिहिणं आहे
पहिल्या पावसात जणू माझं भिजणं आहे
वसंत फुलतो कवितेत आजही माझ्या
नाव तुझे ओठी घेता शब्दांचं लाजणं आहे
अबोल वाहते शब्दसरिता बांध सोडोनी
मारव्याचं तुझ्याचसाठी बघ झिजणं आहे
श्वास घेत आहेत शब्द कवितेत माझ्या
फक्त तुझ्याचसाठी शब्दांचं जगणं आहे
विरह छळतो गुलाबी आठवणींना अपुल्या
शब्द करतात सही अन् कवितेचं जन्म घेणं आहे-
शब्दांची रांगोळी कवितेच्या उंबरठ्यावरी
जणू मनांगणी शुभ्र तारका चमचम करी
उत्सव होतो कवितेचा सरस्वती मंदिरी
कृपा व्हावी शब्दांचे लोटांगण रेषे रेषेवरी
पुस्तकात सजते विश्व सारे जे मन्वतंरी
घाव सोसूनी टिपते अश्रू काळी शाई ओंजळीपरी
निथळत जाते रंग आपुले पाना पानावरी
पखरण करुनी रिती होत जाते रसिक अंतरी
अमर वरदान नाद दाही दिशा अंबरी
अमिट शब्द ओमकार उमटला वाणीवरी-
*लिहायला लागलाच आहे तर...*
*(संदीप खरेंच्या कवितेवरून विडंबनस्वरुप )*
*नुकतच पार पडलं बाळंतपण...*
होऊ लागल्या उलट्या
ओकायचे लागले डोहाळे
काय वर्णावे अहाहा! ते सोहळे
पतीराज बिचारे किती भोळे
चिंच आणली लोणचं आणलं
आंबट ढेकर काही जाईना
डोहाळजेवण घातले फोटो काढले छान
काय काय आणावे काही काही खाईना
(संपूर्ण रचना कॅपशनमधे)
-
आहे माझी लढाई स्वबळासी
कर्तृत्वाच्या वेदीवर उमलेल फूल
अंतरीचा लाव्हा उसळेल नभाशी
यज्ञकुंडात स्वाहा समिधा श्वासांच्या
घेतल्या मी हाती मशाली तर्पणासी
याचसाठी केला होता अट्टाहास
आयुष्या तुला उत्तर देईन हमखास
कातळ फोडून खळखळ निर्झर वाहे तळाशी
स्वप्न घेऊन एक उराशी नकोच बाधा प्रवाहाशी
भेटला एक महारथी गडगडले वासे तुझे जराशी
भिडते काळीज घेऊन वाघाचे बघ तुझ्याशी
आयुष्या खदाखदा तू कितीही हास
आवळीन गळ्याशी तुझाच फास
आयुष्या तुला उत्तर देईन हीच कास
तडतड लाह्या वाजती पेटून उठेल ज्वाला
अंगाराच्या निखाऱ्यावरती तमा न पावलाला
जितके तू देशील घाव तितका मज वाव
पुढेच जायचे मज ठाव वल्हवीत नाव
अन्यायाच्या छाताडावरती प्रयत्नांचा अख्खा गाव
टीचकीभर भूकंप उद्रेक करील काय राव
आयुष्या नकोच दाखवू संकटांचा भास
आयुष्या तुला उत्तर देईन हा एकच ध्यास
-
कणकण न्हाऊनी प्राशन मानससरोवर
सडा घातला तेजाने नेसुनी पिवळा पितांबर
अंत:पुरात चैतन्याचे छनछन वाजती नुपूर
अहं ब्रम्हास्मि गाभारी कैवल्य शब्दगोपूर
आयुष्याच्या कोरीव मन:पटलावर
सात्त्विक क्षणांची घडीव मोहर मोहर
कर्माचं कोरीव लेणं खडतर खडतर
कृष्णकमळ फुलता उलगडते सुगंधाचे अस्तर
वेदनेला फुटता अलवार पाझर
ओली सांजही होते कातर कातर
श्यामल श्यामल रंग उधळीत तनुवर
साद घाली आकाशाला संध्याछायेचा प्रहर
जलधारेला अडवून पहावे सागराचे उत्तर
तळ गाठता कळ सोसता गाज दिगंतर
कालिंदीचा डोह बुडवी विवर विवर
कदंब वनातून फिरतो एक तो अगोचर
जगी निनादतो प्रलयाचा ईश महेश्वर
कैलासाच्या रुद्राक्षाचा एकच निरव स्वर
या वादळांनो या खुशाल असेच निरंतर
बोधीवृक्षाच्या मुळाशी शांत बसले मौनाचे अत्तर
-वंदना ताम्हाणे-
प्रयत्नांचा वेलू गगनावरी
यशाने करावी ओवाळणी
स्वप्ननांनी कवेत यावे आपल्या
हीच प्रार्थना साईचरणी
अढळ ध्रुव तारा बनून
झळकत रहावा नभांगणी
शारदेचा वरदहस्त शिरी
तेजाने तळपत राहो लेखणी
हास्य सदा फुलावे ओठी
आनंदाची बाग फुलो जीवनी
ध्येयाची उंच पताका लहरावी
मंगल कामना हीच मनी
दृष्ट काढावी नक्षत्रांनी
फुले उधळावी तारकांनी
सुखाची आरास अंगणी
शब्द शुभेच्छा जन्मदिनी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनिल जी...🎂🍦🍧🍨🍫🍫🌹🌹🎉🎊आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो... सुख, समाधान, ऐश्वर्य नांदो... बाप्पा चरणी व साईचरणी मनोमन प्रार्थना... 🙏🌹🌹🙏-
आभाळाच्या कुशीतून सर येते धावून
वाट पाहे माय माझी भेट घेते जाऊन
हिरवी होते काया तिची मला पाहून
आठवण माझी अंगी अत्तर घेते भरून
स्वागतास माझ्या तरु मुजरा करती लवून
थुईथुई नाचे शिवार अन् माहेरचे अंगण
निरोप घेता सखयांचे मन येते भरुन
ओल्या होतात कडा दव जाते ओघळून
आठवणींची शिदोरी पदरी नेते बांधून
परतीचा प्रवास सागराच्या वाटेवरुन
-
उंच उंचच जावो तव स्वप्नांचा झोका
इंद्रधनुंनी सजवावी अवघी क्षितिजरेखा
फुलाव्यात जाई जुई मनांगणी तुझ्या
ताटवे बहरावे कवितेत सदा तुझ्या
ओठी हास्य फुलावे समाधानाचा पुरावा
जीवनी आनंदाचा ऋतू हिरवाच रहावा
नित्य भेटीस यावीत शब्दफुले आम्हा
ओंजळींतून सांडावा मोगरा पुन्हा पुन्हा
भेट द्यावी तू कवितेच्या हिरव्या गावा
पानापानावर हळूच फुलेल बहावा
जन्मदिन साजरा मैत्रबंध दरवळावा
शब्दांवर लोभ तुझा सदा असावा
मागणे कर जोडोनी वर हा फळावा
शारदेने शब्द शब्द तुझा ओवाळावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कविता
🎂🎉🎊🌹🌹🍫🍫🍧🍨🍦🧁🧁❤❤
-