जय हरी विठ्ठल
बोल तो बोलावा
कोरड्या देहातही
विठ्ठलच ओलावा.-
Sanjay Gurav
(© संजय स.गुरव. "सदासन")
691 Followers · 565 Following
"पुरेपूर...कोल्हापुर"
मराठी असे माझी मायबोली...
भारतीय मी हिंदी माझी सहेली..
मन माझे उतरते अक... read more
मराठी असे माझी मायबोली...
भारतीय मी हिंदी माझी सहेली..
मन माझे उतरते अक... read more
Joined 20 December 2018
3 JUL AT 21:11
न्याहाळणं संपूच नये
तुझं पावसाला ,माझं तुला
बाधेची परिसीमा अशी की
बोलू लागतोच अबोला..
-
30 APR AT 12:57
आयुष्य ही एक कथा आहे
अनपेक्षित वळणांनी भरलेली
अंदाज इथले बेभरवशाचे
कित्येक गणितं चुकतात आपली-
18 APR AT 10:57
एक कवडसा हक्काचा
आशेवरती नाव कोरतो
एक कवडसा एकांताचा
जागृतीचेही भान पेरतो..-
17 APR AT 10:51
फरक फक्त समजूतीचा
मांडाल ते ते व्यथा होते
मर्म जाणले अस्तित्वाचे
अक्षरही मग गाथा होते...-
16 APR AT 19:38
शेवटचा शब्द...
शेवटी,
सगळ्यांच्याच
कुठे नशिबात असतो.
हल्ली,
नात्याची सुरुवात
होण्याआधीच बरेचदा,
शेवट होतो.-
14 APR AT 21:09
चुकीचं आहे त्याचंच
स्तोम आहे माजलेलं
कुरघोडीच्या जगात..
सत्य मात्र लाजलेलं-