हृदयाचं स्वप्न वार्यासंग बोलत,
मनातलं पाखरु ऊनासंग खेळत.
पहाटे पहाटे डोळ्यातलं चांदणं,
दवबिंदू होऊन पानांवरती लोळत.-
आयुष्यही कधी कधी काही असे धडे शिकवतं
समोर असंख्य प्रश्नांची कोडीच मांडून ठेवतं,
त्या कोड्याला तिथंच सोडवावं लागतं
कारण ते अपुरं कोडं मनालाही कोडंच घालतं,
न सुटलेलं कोडं रिकामी जागा निर्माण करतं
मग ती जागा भरुन काढण्याच्या प्रवास सुरु होतो,
या प्रवासात माणूस अडकतो,भटकतो,भांबावतो
एक असा क्षण येतो जिथं तो स्वतःलाच विसरुन जातो,
न सुटणार्या कोड्यांच्या मागे धावता धावता
माणूस स्वतःलाच कोड्यात अडकवून बसतो,
अनोळखी कोड्यांचा शोध घेण्याचा लपंडाव
शेवटी स्वतःचा शोध घ्यायला भाग पाडतो,
मग एका वळणावर आल्यावर त्याला समजतं-
सगळीच कोडी सोडवत बसायची नसतात
काही सोडून दिली की आपोआप सुटतात,
मग सुरु होतो त्याचा स्वतःसाठी जगण्याचा प्रवास
आणि शेवटी मात्र एक गोष्ट त्याच्या प्रत्ययाला येते,
"आयुष्याच्या परीक्षेत उत्तरपत्रिका हरवली तरी चालेल
पण स्वतःला कधी हरवू द्यायचं नाही"
-ऋतू...
-
शब्दांनो ,
थोड़ी सलगी करा ना माझ्याशी
अव्यक्त भावनेला व्हायचे आहे व्यक्त
मनाच्या घुसमटतेतून थोडे मुक्त .-
माझ्या मनातलं वादळ -
तीच्या मनापर्यंत पोहचू दे.
कालिदासाच्या मेघदूता -
बस एवढे काम करून दे.
कळू दे तिलाही या वादळाने-
कसे उध्वस्त होते मन.
कसे सैरभैर होतात सगळे -
जीवनातले सारे क्षण.
घुसळून निघू दे तिचेही मन
उसळून येऊ दे प्रेमसागर
माझ्या मनातल्या वादळाला
तिच्या अधरातून फुटो पाझर-
आवरला असता क्षणिक मोह l
आटला नसता डोळ्यांतील डोह ll
©® Sanket-
डोंगर दर्यात वसले गाव,
गोड गुलाबी थंडी सकाळी;
लाजून घेई धुक्याचे नाव,
रवी किरणांशी खेळली बकुळी;
अंगणात रमला सड्यांचा डाव,
वेचली तिने फुले कोवळी;
अर्पिले विठ्ठलास मनातील भाव!-
मान नाही तिथे
ठाण कधी मांडू नये l
जाण नाही भावनांची तिथे
प्राण आपला कोंडू नये ll
©® Sanket-