जुन्या ठेवणीतले दागिने पाहून,
जसे मन भूतकाळाच्या नभी गवसणी घाले l
माझे आजोळ विषय तसाच,
ऐकलं कि आठवणींचा कोपरा दरवळे l
उन्हाळ्याची सुट्टी लागताच,
आज्जीच्या घरी जायचा अट्टाहास l
दुरून दिसता ते घर, पेरू नि चिक्कूच्या बागा
वाटे कधी एकदा आत जाउनी घरभर पळणार!
आई सारखी माया करी मामा नि मावशी,
आज्जी अन् आजोबा जणू प्रेमाची सावली l
आजोबांची शिस्त, तर मावशी पुरवी लाड;
मामांसोबत मनसोक्त खेळ आणि जेवणात,
आज्जीची चिंच-गुळाची आमटी छान l
लहानाचे मोठे झालो तरी आजोळची ;
ओढ सरत नाही, जशी मुलाला आईची l
पहिल्यांदा खेळलो तेथे भातुकली,
तोच माझ्या हृदयाचा ठोका अजूनही l
तिथला कोपरा नि कोपरा दडलाय मनात!
जरी नेहमी जाणे शक्य नसे आता त्या घरां,
तरी फक्त स्मरणानेच मिळे ममतेचा ओलावा ll
-
📝शब्दांच्या विश्वात, इंद्रधनू भावनांचे💠
💠कवितेच्या कोंदणात, दर्पण मनाचे 📝
-
Once you set a standard for something, never wipe it out for any particular situation. Your toughness should always be your strength!
-
एक प्याला
शब्द गंधित होऊनी, पान असे दरवळावे
लफ़्ज़ोंकी जमापूँजी, हमे मशहूर कर दे।
ना माळला रवी, ना चांदण्यात न्हालो असे
बंद मुटठी में रेत, सोचना मजबूर कर दे।
बांधणीत घडवले जे, दागिने सोनेरी नात्यांचे
'हम' राह चलते चलते, 'मैं' अब-दूर कर दे।
काळोखात आज कसे, गीत एकांताचे विरले
जुगनू तो आसमाँ, आशा से भरपूर कर दे।
हाच का एक प्याला, मी सुखाला विचारावे
खुशनसीब जिंदगी, हस के मंजूर कर दे।-
मुद्दतें काफ़ी मिलेंगी,
दूसरों की राहें
परखने के लिये ।
बस इस दौरान,
खुद की मंज़िल
ना गुम हो जाए...!-
When thoughts become LOUDER, bag the one for which your heart BEATS and not the one which your mind RESETS.
-
Meanwhile; you are free to live in more of your small wishes. A sip of a strong yet soothing coffee; bright morning vibes; a chair to rely on with an old known, yet forgotten book to read!
-
रंग लेखणीचे
त्रिवेणी
पावसाच्या हळुवार सरींसोबत, सुगन्ध दरवळत होता मातीचा.
गाडी जाताच, फवारा उडाला साचलेल्या पाण्याचा.
एक चिमुरडा, हॉटेलच्या दवातल्या काचा पुसत होता.-
The diamond will never stop shining, though you stopped looking at it!
-
स्वातंत्र्यसूर्य हा,
असा तळपला!
चार तपांच्या,
वेदनाही लाजल्या l
असा वीर,
देशासाठी जन्मला!
जयोस्तुते गांनात,
दशदिशा निनादल्या l-