तुझ्याविना त्याची गाडी थांबते
राब राब राबला तरी एकटा पडते
तो जरी असेल पोशिंदा जगाचा
पण त्याचे बळ तू आहेस सच्चा मित्र शेतकरी बापाचा...
कधी शिव्या घालत तो तुला राबवते
तर कधी मायेने तो तुला कुरवाळते
तो जरी कठोरपणे वागला तरी तू जीव आहेस त्याचा
त्याचा खंबीर आधार आहेस तू सच्चा मित्र शेतकरी बापाचा...
राबतोस तू उन्हात तर कधी पावसात
मात्र याची त्याला पुरेपूर जाणीव असते
अन् तुला काही झाले की काळीज त्याचे धडकी भरते
कारण त्याचा देवता आहेस तू सच्चा मित्र शेतकरी बापाचा...
सण येताच तुझा बैलपोळ्याचा
तुझ्या शृंगारासाठी धडपड तो करते
तुझ्या आरामाच्या दिवशी तुला नवरदेववानी नटवते
विनामूल्य राबणारा सखा आहेस तू सच्चा मित्र शेतकरी बापाचा...
या सणाच्या दिनी तुला सकाळी अंघोळ तो घालते
अंगावर गेरूने ठिपके, शिंगांना बेगड आणि डोक्याला बाशिंग बांधते
गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा अन् पायात चांदीचे तोडे घालून देते
नवी वेसण, नवा कासरा अन् अंगावर रेशमी झुल तो तुजला पांघरूण देते...
पुरण पोळीचा घास भरवून तुझं तोंड गोड करते
आयुष्यभर अशीच साथ दे हा आशीर्वाद तुला मागते
अशा या बैलपोळ्याचा शुभेच्छा देऊन तुझे आभार तो मानते
कितीही रागवला तुला तरी आहेस तू सच्चा मित्र माझ्या शेतकरी बापाचा...-
आला आला पोळा
सण हा मराठमोळा
पुरणपोळीचा नैवेद्य
सर्ज्याराजाला दावा
एक दिवस मायेचा
वर्षे कष्टात जायचा
आज आहे द्यायचा
गोड नैवेद्य खायचा
त्यांना नटवा मिरवा
शिंगे नाजूक सजवा
बाकदार पाठीवरती
झुल मखमली बसवा
गळ्यात घंटणी माळा
पायात घुंगराच्या वाळा
आज आहे सण पोळा
सर्ज्या राजाला ओवाळा
आला आला पोळा....-
पोशिंदा साऱ्या जगाचा ,
फिरतो अनवाणी पायानं ,
साथीला त्यांच्या दिसभर,
बैल मात्र नावानं ...
कष्टाची ती भाकर ,
मेहनतीचा तो घाम ,
काळ्यामातीला ही फुठला हा अश्रूंचा बांध ...
न कसली तक्रार , न कसली मौज ,
बळीराजाच्याची करतो पूर्ण तो हौस ...
आजकाल लोकांचा सुटत चाललाय हात ,
बळीराज्याला मात्र बैलचं देती साथ ...
अख्या जगाचा पोशिंदा शेतकरी ,
शेतकऱ्याचं मायबाप (बैल) तेवढं कष्टकरी,
कष्टाची ही सवय न्यारी ,
राब राब त्यानें राबाव ,
गोड मात्र भाकरी ,
सर्वाना लागावं ...
बळीराज्याच्या तो यार खास ,
आयुष्यभर झिजून ही त्याला लागली नाही आस....
-
नको लावु फास।। बळीराजा गळा।।
आज दिनी पोळा।। दे वचन।।
अायुष्यभर मी।। राबेल शेतात।।
तुझीया सोबत।। नेहमीच।।
नको गोड धोड।। राहो तु जिवंत।।
गोड ते गवत।। खाईन मी।।
जगाचा पोशिंदा।। रहावा अमर।।
असो सरकार।। कुणाचेही।।
-
तू रे वाहान शिवाच, कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे दारी चैतन्याची नांदी.
तूझी कवड्याची माळ त्याला घुंगराचा नाद,
तूझ्या हंबराला आहे बळीराजा चा आवाज.
तूझी झूल नक्शिदार जस भरल शिवार,
तूझ्या शिंगांचा रूबाब जनु कनिस डौलदार.
पिंजलेला जिव सारा कुणब्याची घुसमट,
तुझ्या असन्यान धिर तूझ्या असन्यान थाट.
तूझ्या साथीला नमन तुझ्या श्रमाला नमन,
तूस्या सवे रान सार राहो सदा आबादान.-
राबूनिया वर्षभर
करीतो एक दिवस आराम
माझ्या राजाचा सच्चा साथी
करीतो वंदना राजा आज त्याच्या दैवताची-
शेतामध्ये राबणारा आपला हा बळीराजा
बळीराजाला कायम साथ देणार्या या जोडीला
मानाचा मुजरा ❣️❣️✨✨✨✨-
पुन्हा ताजे झाले बालपण
तान्हा पोळ्याच्या आठवणीने..
साठवणीने नेले भूतकाळात
ताईने दिलेल्या सुंदर विषयाने..
सजवलेल्या पोवळ्यांच्या जोडीला
घेऊन फिरायचो आम्ही घरोघरी..
मागून त्याच्यासाठी दानापाणी
प्रस्थान मग असे शिवारावरी..
ठेवून दावणीच्या ठिकाणी
औक्षण सर्व जोडयाचे करायचो..
दाखवूनी नैवेद्य पुरणपोळीचा
मग सवंगडी सोबत खेळायचो..
असा हा आम्हा बालगोपाळाचा..
तान्हा पोळ्याचा खेळ रंगायचा..-
अभ्यास गडगडे शिंग फडफडे
जो तो जाये हो काँन्वेंटकडे
मराठी वाचतानी अडखडे
तरी त्याचं ध्यान इंग्रजीकडे
अगाऊ कामानं मास्तर होये वेडे
त्यायलेच पहा लागते खिचडीतले किडे
कोणत्याही कामात मास्तरलेच ओढे
बिना कामाच्या कामानं मोडे कंबरडे
बोला एक नमन गौरा पारबती हरबोला हर हर महादेव
सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..-