श्रावण सरी
रिमझिम बरसती सरी
सरी गुलाबी श्रावणाच्या,
करून देती आठवण मज
त्या पहिल्या वहिल्या प्रेमाच्या...
मध्येच येतो इंद्रधनू
पाहण्या खेळ हे निसर्गाचे,
सात रंगानी सजवतो
जणू बिछाने आसमंताचे.
दिवसा ढवळ्या सुरू होतो
सूर्याशी लपंडाव सरींचा,
लपण्यासाठी घेई आडोसा
काळ्याकुट्ट त्या ढगांचा.
होतो चंद्र घायाळ श्रावणी
हरवतो प्रितीत निशाच्या,
रूसून बसती चांदण्या
जणू विरहात शरदेच्या.
-अमित भांडे.
-
Amit Bhande
385 Followers · 7 Following
काव्यसंग्रह-शब्दसुगंध
By Profession-Software Engineer
By Profession-Software Engineer
Joined 18 July 2017
31 JUL AT 2:17
29 JUL AT 1:16
फिर से वो बेफिक्री वालीं जिंदगी जीने का
एक बार.....फिर से वो चैन की निंद सोनें का...
रात भर एक हीं ख्वाब...-
10 FEB AT 11:49
या कलीयुगात कुणाचे
कुणावर फार काळ प्रेम जडलय का?
ज्याची त्याची शर्यत दररोज
अविरत आहे आयुष्याशी...
प्रेमाशिवाय सांगा ईथे
कुणाचे तरी आजवर अडलय का?
अडले असतेच प्रेमाशिवाय
तर बायोडाट्यांवर पॅकेज नसते,
सरते शेवटी कंसामध्ये
अपेक्षांचे ते भडीमार नसते...
-अमित भांडे
-
10 FEB AT 11:20
गेले द्यायचे राहूनी
मनाला मनासारखे,
भेटेल तेच वेचत गेलो
एखाद्या वेड्यासारखे...
आतातरी काहीतरी
देऊ म्हणतो मनाला,
फक्त पुन्हा एखादेे वादळ
नको आता धडकायला...
-अमित भांडे-