जुन्या शर्यतीत, तो धावत राही.
पुन्हा हरतो आणि, पुन्हा भाग घेई.
कधी धाव घेता, भरून येते छाती
कधी खाली पडतो, नी तोंडात माती.
जिथे गर्दी तूडवून जाते सामोरी,
तिथे नक्षत्रांशी करी तो मुजोरी.
पुरे झाले आता मला होत नाही...
कधी तो कुणाला म्हणालाचं नाही...
जरी केला यत्न आणि होम, यज्ञ
आणि आहूतीला अर्पण स्वप्न.
त्यागूनी घर, भूक, सन आणि झोप.
मारूनी मन, प्रेम, इच्छा अन मित्र.
आलिप्त झाला जगाच्या सूखातून,
तरी हिन दर्जा जगाच्या मुखातून.
निघे रक्त, पायात चप्पलही नाही.
कधी तो कुणाला म्हणालाचं नाही.-
#lyricist 📃
#Storywriter 📚
#Actor 🎬
Professional writer and lyricist i... read more
तूने मू मोड लिया, मैने रूख नहीं बदला,
तूने बस छोड दिया, मैने इंतजार किया।
तेरे जानेसे कुछ इस कदर अकेला हूवा,
के तेरे आनेसे खूशी है भी और नहीं भी रही।
ये झूट है के मुझे तूझसे मोहोब्बत ना रही,
बस तेरे साथ की ए दोस्त अब ख्वाइश ना रही।-
कधी वाटते चालत चालत
निघून जावे बरेच दूर.
कधी वाटतो बरा एकांत,
बरा वाटतो एकच सूर.
कधी करावे जवळ आरण्य
सोडून द्यावे गाव,
कधी जगावे जरा अनामिक
पुसून स्वतः चे नाव.-
Your Lack of
Dedication
is an Insult to
Those
Who Believe in
You!-
Your Lack of
Dedication
is an Insult to
Those
Who Believe in
You!-
पाऊस पडला! हे छानचं झाल. नवी पालवी, नव विश्व..
शेतकरी कामाला लागला. काही फिरायलाही निघालेत..
व्हाट्सएप, इंस्टा ला चहा व भजी ची स्टेटस चमकू लागली आहेत..
पण!..
पण इथे गावात चार दिवस झाले लाईट नाही, टावर बंद पडली आहेत.
दर पावसाळ्या प्रमाणे रस्ता वाहून गेलाय या ही वर्षी आणि म्हणून फसायच्या भितीने बस येत नाही आता गावात.
घराला नेमकी भोक किती ते पावसाळ्यात समजत आम्हाला.
गळनारा पाऊस ते नेमक सांगून जातो.
पहील्या पाण्यातच घरात पाणवठा झाला की कवल बदलून घेतो आम्ही.
जिथ तेही शक्य नाही तिथ ताडपत्रीच ठिगळ लावावचं लागत नाईलाजाने..
ओल असल्यावर घराला घुशी लागतात.
माय बाप थकलेत त्या छिद्रांमद्धे दगडधोंडे भरून भरून.
वाऱ्यावावधानात पडणार कुड तरी कितीदा म्हणून लिपायच?
मुळात आम्ही रहातो त्याला घर म्हणायचं का? हा प्रश्न दर पावसाळ्यात पडतो माझ्याच सारख्या कित्येकांना.
हंगाम सरस्तोवर चार पाच साप तरी पाहूणे म्हणून येतातच भेटायला.
खर म्हणजे एकिकडे अल्हाददायक आणि रम्य वाटणारा पाऊस दूसरीकडे तितकाच कठोर आणि त्रासदायक भासत असतो..
वास्तव हेच की,
तूमचा आणि माझा पाऊस वेगळा आहे बाबांनो....-
शुभ्र नक्षत्रांच्या खाली गाढ झोप येते जेंव्हा
वाटते की मज कुशीत धरणीमाय घेत आहे.
स्वच्छ श्वास ज्या कपारी ज्या कड्यावर मिळतो मजला,
तो तिचाच घाम आहे, जो सुगंध देत आहे.
श्रावणात हिरवा शालू पांघरून तिच येते.
या ढगांनवर स्वार होऊन तिच सौदामिनी होते.
तिच कुरवाळत बसते झाड, फुले, झरे सारे.
माझे सारे पाप, शाप तिच पदरात घेते.
अन पुन्हा देते नव्याने जे जे मागु स्वार्थ भावे.
माय ती मोठ्या मनाने देत फक्त देत आहे.
शुभ्र नक्षत्रांच्या खाली गाढ झोप येते जेंव्हा
वाटते की मज कुशीत धरणीमाय घेत आहे.
मी तिचाच लेक तरी तिला बेईमान झालो,
जाळला शालू तिचा, विकुनी संम्मान आलो.
मीच घाव घातले, मी पाजले विष रोज तीला.
नाक तिचे दाबले अन भाजलेही काळजाला.
माफी मागावी तूला तर ती कशी मागावी आई.
पण खरे मी सांगतो की बदलू मी पहात आहे.
शुभ्र नक्षत्रांच्या खाली गाढ झोप येते जेंव्हा
वाटते की मज कुशीत धरणीमाय घेत आहे.-
मला तू वाचते आणि तूला मी सूचतो भरपूर,
कविते तू माझ्या कपाळावर नाचते भरपूर.-
#मानसिकता
सवर्ण तर सोडाच पण बहुतांश बहूजन समाज सुद्धा अंबेडकरांना हव्या त्या प्रमाणात आपलं करु पाहत नाही. बऱ्याचशा लोकांच्या मनात तर बाबासाहेबांबद्दल तिटकारा असल्याच जानवत.
मुळात भारतात कुठल्याही कोपऱ्यात जन्माला येणारा कोणताही व्यक्ती दिवसाचे २४ तास बाबासाहेबांनी करून ठेवलेल्या कुठल्या ना कुठल्या तरी तरतूदीचा/ ऊपाययोजनेचा कळत नकळत लाभ घेतच असतो.
असे असून सुद्धा अंबेडकरांप्रती कृतघ्न होणे म्हणजे बाप नको म्हणत त्याच्या इस्टेटीवर हक्क सांगण्यासारखे आहे.-
हम तहजीब से रहते है रूहदार, हा मगर,
तमन्ना कीसी गुस्ताख से कम नाही रखते।-