QUOTES ON #पुन्हा

#पुन्हा quotes

Trending | Latest
30 AUG 2019 AT 10:01

जगून घे असं काही
आता पुन्हा जगणे नाही
गेलेले क्षण परतीचे
अनुभवणे पुन्हा नाही...

जगण्याच्या वाटेवरचे
आपण सारे प्रवासी
भरून घ्यावी ओंजळ
सुखदुःखाच्या फुलांनी...

मनातल्या स्वप्नांना सप्तरंगी
बहरलेली बाग द्यावी
मनमुराद जगताना आयुष्य
कटू-गोड अनुभवांची शिदोरी चाखावी...

जपून ठेवावी माणुसकी
नात्यांची ही वीण जपावी
नाही उरत काही सरतेशेवटी
प्रेमाची उधळण आयुष्यावर करावी...

जन्म एकदाच रे मानवा
नको असा घालवू वाया
झिजून चंदनापरी आयुष्याला
दरवळ गंधमय फुलांचा द्यावा...

-



जगून घे दिवस आजचा
तो कधी परत येणे नाही!
नको मरणाची वाट धरू
पुन्हा हे जगणे नाही!!

तारे नभातले मिटल्यावर डोळे
तमा शिवाय काहीच दिसणे नाही!
कर प्रत्येक क्षण हसरा तुझा
गेलेला क्षण परत येणे नाही!!

आलेल्या संधीचे सोने कर
तो सोनेरी क्षण पुन्हा येणे नाही!
नको जाऊ बुडून स्वार्थात
स्वार्थातून बाहेर कधी पडणे नाही!!

छोट्या छोट्या गोष्टीत हसायला शिक
रडताना कधी हसू ओठी येणे नाही!
नको मरणाची वाट धरू
पुन्हा हे जगणे नाही!!

-


30 AUG 2019 AT 19:17

Read in caption....

-


26 AUG 2019 AT 10:07

पुन्हा जगणे नाही
आयुष्य किती कोणाचे ते माहीत नाही
त्यामुळं येणारा प्रत्येक क्षण तू जगून घे
आत्ताच मोकळेपणानं पोटभर तू हसून घे..
चुकलं असेल कुणाचं काही तर माफ करून टाक
मनातला राग रुसवा काय असेल ते सार काढून टाक
आलेल्या संधीच तू सोन कर
यश मिळेल न मिळेल तू फक्त प्रयत्न कर
वाईट बोलून कुणाला कधी दुखवू नको
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी दुसऱ्याचे वाईट करू नको
मिळूनमिसळून रहा सर्वांशी तू प्रेमाने
तोडू नकोस कुणाची मन तू द्वेषाने
आयुष्याचा प्रत्येक क्षण शेवटचा समजून तू भरभरून जग
तुझ्या प्रेमळ या स्वभावानं साऱ्यांची मन जिंकून बघ..

-


26 AUG 2019 AT 12:25

दोन क्षणाचे आयुष्य आपण मनसोक्तपणे जगावे..
हे "पुन्हा जगणे नाही" स्वतःला निक्षून सांगावे..

सुख घेऊनी ओजळीत दुःखाला हसून पाहावे..
हसऱ्या क्षणाच्या सोबतीत अश्रूनाही अलगद झेलवे..

वाटेवर भेटणाऱ्या संकटाशी प्राणपणाने लढावे..
किती कणखर आहोत हे त्यालाही दाखवावे..

कडू,गोड आठवणींना हृदयात खोल साठवावे..
मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करून जीवन जगावे..

येईल अखेरचा दिवस हसऱ्या मुखाने सामोरे जावे..
प्रत्येकाच्या हृदयात राहून शेवटच्या श्वासातून मुक्त व्हावे..
🍁🍁🍁🍁🍂 🤗❤️🤗 🍂🍁🍁🍁🍁

-



वाट चालत रहाते, कुठे थांबणे नाही
वाटेत जगण्याच्या, मागे वळणे नाही

एकांत गूढ स्थळी, शोध तो स्वतःचा
सहज साध्य एवढे, कधी जमणे नाही

कसला अट्टाहास, सुखा शोधण्याचा
दु:खाची याचना, सहज मागणे नाही

भोवताली ठार, चक्राकार सुख दु:ख
फेऱ्यातून माघारी, योग्य पळणे नाही

भासती खुप सोपे, रम्य मरण सोहळे
जाता मरण पंथा, पुन्हा जगणे नाही

-


3 SEP 2019 AT 22:00

तुझ्या सोबत जगलेले ते क्षण आता पुन्हा जगणे नाही
प्रेम केल तुझ्यावर आता परत ते
दुसरे कोणावर होणार नाही
होतास मनात तु माझ्या अजूनही तुच आहेस
लांब जरी तुझ्यापासुन जात असले तरी
अजूनही माझे प्रेम तुझ्यावर आहे
Promise करते मि तुला, तुला मिळवण्याचा
प्रयत्न करेल मि पुन्हा
प्रेम केल तुझ्यावर अजुनही करते आहे
शरीरणे लांब जात असलो तरी
मनाने मात्र जवळच आहे
फक्त आता तुझ्यापासुन थोड लांब जावुन
जगण्याचा प्रयत्न करत आहे

-


14 JAN 2020 AT 20:21

पुन्हा पुन्हा दिसतेंस
प्रिये,तू माझ्या नजरेला ।
पुन्हा बहर येणार वाटते
आपल्या त्या प्रेमवृक्षाला।

-



देउ कशाला मी पुरावे उन्हाचे 
सावलीनेच पोळले होते मला 

-


1 OCT 2017 AT 12:23

प्रेमाच्या सुरवातीला खूप छान वाटायच्या
त्या खाणा-खुणा ,
येशील का रे तू माझ्या आयुष्यात पुन्हा ,
नाही तर जाऊ दे,
एकदाच तुझ्या प्रेमात पडून केलाय मी
खूप मोठ गुन्हा,
तू सुद्धा माझी आठवण काढुन रडशील
कधीतरी पुन्हा,
तुला ही समजेलच कधीतरी माझ्या
पासून दूर जाऊन तू केला आहेस एक गुन्हा,
परत एकदा आठवशील प्रेमाचा काळ जुना..
🙏

-