एखाद्या विस्कटल्या नात्याला
सावरत राहिलं तर...
बऱ्याचदा ते सावरलं जात नाही ,
.
अशावेळी आहे त्या परिस्थितीत ते
नातं सोडून पुढं निघायला हवं...
.
जर त्या नात्यामध्ये आपली किंमत
असेल तर ते कधीतरी नव्याने
आपल्याला मिळेल..
.
नाही तर समजून जावं की,
चुकीच्या व्यक्ती साठी आपण
आपल्या आयुष्याला वाईट ठरवत होतो..
.
"आयुष्य" बऱ्याच संधी आपल्या समोर आणून ठेवतात. पण एखाद्या माणसाच आयुष्यातून जाण्याची भीती, त्रास, कल्पना.. आपल्याला सुंदर आयुष्य दिसून देत नाही. जमलंच कधी तर एकेरी नात्यामधून बाहेर पडून बघावं एकदा स्वतःकडे, तेव्हाच वाटेल "आयुष्य सुंदर आहे"!
@man_mansi
-मानसी पवार
-
आयुष्यातील कविता..
मन💗 मानसी...
कधी-कधी आयुष्य इतकं
कठोर वाटू लागतं की...!
"मृत्यू" जरी समोर उभा राहिला,
तरी हसत जाऊन त्याला मिठी
मारण्याची तयारी असते.
@man_mansi
-मानसी पवार
-
मला माहित आहे...!
तुला शब्दात बांधणं...
योग्य नाही,
.
मला माहित आहे..
तुला वचनात बांधणं
योग्य नाही,
मला माहित आहे...
तुला - तुझी इच्छा नसताना
माझ्या आयुष्यात थांबवणं
योग्य नाही...!
.
म्हणून मुक्त केलंय तुला या
दुहेरी नात्यातून..
म्हणून मुक्त केलंय तुला
कधी नसलेल्या त्या खोट्या
"प्रेमातून"....!
@man_mansi
-मानसी पवार-
सोडावं तुझं गाव की..
सोडावं तुला सांग......?
की, तुझ्यावर लिहलेल्या कवितांना
आता जाळावं का ते सांग....?
.
भेटावं तुला एकदा शेवटचं की,
विसरून जावं तुला सांग..?
की, तुझ्यावर लिहलेल्या कवितांना
आता कायमचं जाळावं का ते सांग....?
.
सोडावं तुझं गाव की ...
विसरावं तुला सांग...?
.....
सांगशील नक्की..!
@man_mansi
-मानसी पवार-
रात्री-बेरात्री ....
चाळली जातात ,
त्या तुझ्यावर रचलेल्या
कवितांची पानं...
बस्स आजकाल
कारण "आठवणींचं" असतं..
ना की ....
तुला वाचून दाखवण्याचं!
@man_mansi
-मानसी पवार-
पुन्हा एकदा पर्व नवं...
पण स्वप्नं सारी जुनी आहेत..
पुन्हा एकदा वर्ष नवं...
पण ते "आयुष्य" सारं जुनचं आहे..
#goodbye2020
@man_mansi-
विचारू नकोस मला कधी....
तू काय कमावलंय तुझ्या आयुष्यात ...
माझ्या "सरणाशेवटी" तू असशीलचं
तर ....
जेवढी लोकं तुला दिसतील तेवढंच
कमवलं असेल मी... आजवरच्या आयुष्यात !
@man_mansi
-मानसी पवार
-
आज ही आम्ही एकमेकांना
भेटण्यासाठी ठरलेल्या
ठिकाणी पोहचतो,
पण..
आमची दोघांची वेळ वेगळी असते !
@man_mansi
-मानसी पवार-
मी लिहलेल्या कविता
तो कधी वाचत नाही,
आणि...
त्याने वाचलेल्या कविता
मला कधी सांगत नाही !
@man_mansi
-मानसी पवार-
"तुझ्यावर" लिहलेल्या प्रत्येक कविता
आज हसत आहे "माझ्यावर"...
म्हणे...
"तू ज्याच्यासाठी आम्हांला
कागदावर उतरवत आहे..
त्याने कधी तुझं नाव कोरलंच
नव्हतं मनावर" !
@man_mansi
-मानसी पवार-