जबाबदारीने वागलो की
बरेच प्रश्न सुटतात
एकमेकाची जबाबदारी घेणं
ह्यालाच तर प्रेम म्हणतात-
खांद्यावर जबाबदारीच ओझं असलं ना कि कधी कधी स्वतःचा हि विचार बाजूला सारावा लागतो ..
हो वाटते कि जगावं थोडं स्वतःच साठी..
पण त्याच क्षणी आठवते कि काही मन विश्वासाने माझ्या खांद्यावर डोके ठेऊन आहेत आणि मरता मरता मला अजून जगावं लागतं......😊-
स्वतःला विसरून जायला होतं
मनातलं गुपीत सांगायच रहातं
भरभरुन जगणं एक स्वप्न बनतं
तरी देखील हे मन तिथेच रमतं
कारणं ते नकळत आपल होतं
जबाबदारी हे ओझं नाही रहातं
जेंव्हा ते कर्तव्य म्हणून जाणवतं-
लादलं जात ते ओझं असत,
आणि स्विकारली जाते ती जबाबदारी असते,
जबाबदारीच जेव्हा ओझं वाटायला लागत,
तेव्हा स्विकारलं काय आणि लादलं काय याची
सांगड घालणं कठीण जात...-
जबाबदारी.....
कालचं उनाड वाऱ्यासंगे जगणं, आज हळुवार होऊ लागले,
रानात फिरणारी प्रत्येक पाखरे, आज जबाबदारीचं गाणं गाऊ लागले.
कधी गमतीने बाजाराला जाणं, आज भीतिदायक होऊ लागले,
कधी बापाचं बोटं धरणारी हातं, आज संकटांना दोन हात करू लागले.
दररोज कट्ट्यावर बसून प्रेमाची चहा हसत पिणारी कॉलेजची मित्र,आज त्याच कट्ट्यावर इस्त्रीच्या कपड्यात खांद्यावर भाविष्याचं ओझं घेऊन उभी होती.
कधी 'तेरी मेरी यारी' म्हणून प्याशन च्या जगात गोंगाट करणारी मंडळी, आज मात्र दिवस रात्र प्रोफेशनच्या शुभ्र वस्त्रांत जबाबदारीने जगभर वावरताना दिसत होती.
कधी आईच्या कुशीत दडणारी मुलं, दिवसागणिक आज मोठी झाली आहे,
तर कधी बापाचं धडपडणारं आयुष्य पाहणारी मुलं, आज हिंमतीने जगत आहे.
कधी वेळेचं भान नसणारे, आज प्रत्येक काटेरी वळणं पार करत आहे,
कालच्या भेभान मनांनी, मात्र आज आपसूकच जबाबदारी स्वीकारली आहे.
काल बडबड करणाऱ्या ओठांवर आज जिम्मेदारीचे कुलूप बसले आहे,
जबाबदारीचे खांदे, आज रुसणं व रागावणे अगदी कायमचे विसरले आहे.
कालचे निवांत क्षण, आज वेळोवेळी एकटेच जगभर धावते आहे,
आणि जबाबदारीचे ओझे फक्त, डोळे व आपली पाऊलच जाणते आहे......☺️☺️
#शोध मनाचा..... :-अमोल पाटील.....
-
दीप सुविचार धारा....✍️
🌺🌼🌸🌿🌾🍁🌹
"भावनांची" जाणीव असली की संकटात "जबाबदारी" पेलण्याची ताकद येते.-
जबाबदारीच्या ओझ्याखाली..
आज प्रत्येकजण दबत आहे
दिवसभर कष्ट करूनही
क्षणिक सुखासाठी धडपडत आहे.-
आता येणे झाले अवघड
या जबाबदारीच्या ओझ्यामुळे
नाहीतर तुला भेटायला आवडलं
असत देवा पण तसं होत नाही
रोज नवीन संकटांना सामोर जावं लागतं
कधी होईल भेट देवा तुझी माझी
की तुला ही वाटत देवा, अजून
जबाबदारीतुन माझी सुटका झाली नाही.-
// जबबदारी//
एक क्षण असा येतो, सर्व बालिशपणा घेउन जातो..
अचानक पैसे उधळणारा तो, पैसे कपाटात साठवायला लागतो..
फॅशन फ्रीक असलेली ती,सना - सुदिलाच कपडे घेऊ म्हणते..
फास्ट फूड साठी असलेले वेड, अचानक भाजी चपाती चा डबा घेते..
ऑफिस मधून येताच मित्रांमध्ये रमणारा तो, अचानक घरी बसुन गप्पा सुरु करतो..
अाणि जेवण बनवण्यातला 'ज' सुध्दा न येणारी ती, अचानक भात, डाळ ,भाजी..
आणि बरच काही शिकू लागते..
सर्व कस होत अचानकच!
कारण मात्र एकच,
जाणिव जबाबदारीची...!!
जाणिव जबाबदारीची...!!
- समिता सावंत.-
ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी असतात
ते क्षणिक सुखासाठी कधी लढत नसतात
-