प्रतिकुल स्थितीतही तग धरून राहणे निवडुंग शिकवतो संघर्षात उगवणे.....
जरी काटे अंगभर तेच रक्षक ठरणे धैर्य,
नित्य संकटी, वेळोवेळी लढणे.......
साधे सरळ जीवन अल्प गोष्टीत जगणे मुलमंत्र मानवास नासधूस नाकारणे......
सहनशक्तीचा मार्गपदोपदी स्विकारणे हेळसांड होता कधी हात पाय न गाळणे......
आयुष्याची कष्टप्रद कथा स्वतःचं मांडणे निवडुंग सांगू पाहे वेदनांना गोंजारणे......-
पाने का ख्वाब है उनको मिल गए हमें तो
वाह क्या बात है..
ढूंढती हैं ये नजरें उनको पहचान गए हमें तो
वाह क्या बात है..
मन की शांति कही मिलती नहीं आसानी से मिल जाए तो वाह क्या बात है..
यादों के झरोखे से एक दिन सपना हकीकत बन जाए तो वाह क्या बात है..-
थोडं स्वतःला परत घे ना
स्वयंपाकाच्या गंधाऐवजी चहा हातात धर,
सकाळी तुझ्या मनाच्या ओल्या
कोपऱ्यात फेरफटका मार-
एक दिवस,
एक क्षण फक्त
तुझ्यासाठी असू दे...
थांब जरा, शांत हो, श्वास घे,.
आणि बघ किती सुंदर आहे..-
तुटक्या फुटक्या शब्दाच्या
तु रोज चार ओळी सांडते...
ती कलेची तुझ्या किंमत
तु रोज शब्दांशी भांडते...-
नव्हतो कधीच मी आठवणीत त्यांच्या,
मी मात्र सजवले त्यांना, कोपऱ्यात मनाच्या
गर्दीत दिलेला हात त्यांना त्यातुन बाहेर
झाल्यावर ओळख माझी पटलीच नाही....
शब्द शब्द अडले ओठी, नजरांच्या झाल्या ना भेटी मनातच राहिले प्रिया अन प्रीती प्रीतीचा वसंत कधी फुललाच नाही.....
रडता रडता हसले डोळे, करुनि साजरे दुःखांचे सोहळे. माझे सुख झाले लाजरे, परत जवळी कधी ते आलेच नाही....-
गुरु बाहेरही असतो, आणि अंतरमनातही... जो विचार करायला शिकवतो, तोच खरा गुरु.
गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!-
चेहऱ्यावर हसू रोजच असतं
पण आतून खूप काही तुटत असतं...
आजूबाजूला माणसं फिरत असतात
त्यांनाही काही समजत नसतं...
कधी बोलून दाखवलं नाही बस्...
प्रत्येक गोष्ट मौनातच दडवली...
आणि हे आंतरिक मौन खूप भारी असतं
कुणाला जरी दिसत नसलं तरी...
मनाला पार तोडून मोडुन टाकतं..-
असं वाटतं....
जवळ तु बसावं,
काय होतंय पूसावं,
न सांगता मिठीत घ्यावं,
केसातून हळुवार हात फिरवावं,
हातात हात घेऊन बोटांशी खेळावं,
आपलं मन रमावं म्हणून
तू खोडकर होऊन जावं,
डोळ्यात आलेलं पाणी अलगद पूसावं,
अन् त्याच भरलेल्या डोळ्यात बघून
"असेन कायम सोबत" हे सांगावं-