आलो पांडुरंगाच्या भेटीला,
लख्ख सजली होती अलंकापुरी,
भुईला नमन केले अन्,
कळस दिसला डोहीवारी...
भीमा खळखळून वाहू लागली,
काठी लागला भक्तांचा मळा,
विठ्ठल भाव सजला मनी,
अन् मेघ दाटूनी आला सावळा...
विठ्ठलाच्या पायी ठेवला माथा,
रखुमाईस नमन केले,
आलो परतुनी घरी, वाटले काही विसरले,
का, कोण जाणे मन माझे पंढरपुरीच राहिले...-
वारी..
वारी... स्वार्थाकडून परमार्थाकडे जाणारी,
वारी.. देहासोबत देवाकडे नेणारी,
वारी.. अंतःकरणातून विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाणारी,
वारी.. अपेक्षासोडून स्वइच्छेने चालत राहणारी,
वारी.. विठ्ठल भक्तीतून दर्शनाच्या ओढ निर्माण करणारी,
वारी.. निसर्गाला साथ देत संकटाना तोंड देणारी,
वारी.. पावलोपावली विठ्ठल नामात दंगनारी,
वारी.. सगळी दुःख पचवून चालणारी,
वारी.. प्रत्येकाच्या आत्म्याची विठ्ठलाच्या आत्म्याशी सांगड घालणारी...
वारी.. चिंतेने व्याकुळलेल्या मनाला विठ्ठला पर्यंत नेणारी,
वारी.. इंद्रसरीतून वाट काढत अभंगात चिंब भिजणारी,
वारी.. भरलेल्या डोळ्यातल्या आसवांना पंढरी ची वाट दाखवणारी...-
एक होकार तिला पुरेसा असतो,
जेव्हा ती प्रेमाचं पाऊल टाकते...
एक कौतुकाचा शब्द पुरेसा असतो,
जेव्हा ती काही करून दाखवते...
नको तिला गडगंज, नको तिला सोनंनाणं,
आयुष्यभराची साथ तिला पुरेशी असते...
दोन शब्द मानाचे, अन नजर विश्वासाची,
नाते कायमचे, अन भरभरून प्रेम तिला पुरेस असत...
नको तिला लक्झरी आयुष्य,
चार भिंतीलाही ती आपला बंगला म्हणते...
नको तिला चार वेळेचे खाद्य, दोन घास पुरेसे असते,
आपल्या गोल भाकरितही ती चंद्र शोधत असते...-
असे का बरे केले राधा,
बासरी माझी घेतलीसच ना,
रुसवा माझा निघून जातो,
तुझ्या पाव्यानेच... आठवत ना?
तू सारखाच रुसातोस,
मी करू तरी काय मोहना,
तू राधा अन् मी कान्हा,
झालो होतो एकदा... आठवत ना?
रासरंग खेळूनी,
सख्या साऱ्या भुलल्याना,
सारे झाले होते राधा,
अन् तू होतास साऱ्यांचा कान्हा... आठवत ना?-
चाफा झाला अबोल,
अबोली काही बोलेना,
मोगरा नुसता गांधळला,
त्याने मनाची हुरहूर काही थांबेना...
कोवळा हसरा माझा गुलाब,
म्हणाला प्रेम कर व्यक्त,
काटे जरी माझ्यासवे असले,
तरी तू गुलाबी गुलाब घे फक्त...-
कधी कधी वाटते की,
निघावे एकट्यानेच प्रवासाला...
नको कोणी प्रवासी,
नको कोणी सोबतीला,
एकांत अनुभवावा अन्,
विचारावी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मनाला...
नको ती विचारांची थैली,
नको कसलीच चिंता साथीला,
मोकळ्या मनाने फिरावे अन्,
शोधावे आत दडलेल्या स्वतः ला...
कधी कधी वाटते की,
निघावे एकट्यानेच प्रवासाला...-
कोणी म्हणे गोविंद, कोणी म्हणे गोपाळ,
देवकीचा पुत्र झाला नंद-यशोदेचा बाळ,
सावळा हा नंदकिशोर, तिन्ही जगाचा स्वामी,
जन्म त्याचा झाला, म्हणे सारे आली कृष्ण जन्माष्टमी..-
पहिला पाऊस,
पहिला आनंद,
नव्या चाहुलीचा,
पहिलाच छंद...
पहिला पाऊस,
पहिला सुगंध,
जुन्या नात्याचा,
पहिलाच बंध...
पहिला पाऊस,
पहिला ओलावा,
नव्या प्रेमाचा,
पहिलाच गारवा...-
भेटीस तुझ्या पांडुरंगा,
वारी निघाली थाटात,
पाऊले नाचती दंगुन,
तुझ्या नामाच्या गजरात...-
मनात असतो कायम चालू,
विचारांचा गोंधळ,
त्यात मोहून जाते नेहमी ही,
रंगांची वर्दळ...
मग कोऱ्या कागदावर,
ब्रश मनमोकळा नाचू लागतो,
मनात कोरलेल ते चित्र,
खऱ्यात उतरवायला लागतो...
फुलून येते मनमोहक,
रंगांची गुंफण अशी,
की मनातले विचार येतात,
नव्याने जन्माला जशी...-