काही थंडावले क्षण अगदी त्या बशीत सांडल्या चहाप्रमाणे असतात. जीवनात ओसंडून आनंद लुटून विसावलेले असतात.काही क्षण मात्र अगदी त्या कपातल्या वाफाळत्या चहा सारखे.आठवले तरी मनाला चटका लावून जाणारे..
असे क्षण आठवले की मनाला जराशी समाधानकारक फुंकर घालावी आणि त्या आठवल्या क्षणांचा अगदी सूर्रर्रर्रकण चहा पिऊन आनंद लुटतो तसा आनंद लुटावा..
बशीत सांडल्या चहाला मात्र कधीच अशी फुंकर मारण्याची आवश्यकता भासत नाही.ते नेहमी गोडव्यात भिजल्या चहा प्रमाणे,आपल्याला आनंद देण्यासाठी मनाच्या गाभाऱ्यात चिरतरुण असतात.-
Tea च्या विना...
सकाळ ही सकाळ वाटत नाही.
Tea च्या विना...
जगणं अवघड झाल्यासारखं वाटतं.-
शाम के नशे मै
खुशबू का लिबास आया है ।।
बडे दिनो बाद चाय मै,
अदरक का स्वाद आया है ।।-
पिवळसर सोनेरी किरणांनी
भेट पहा दिली कशी
आळस झटकला अवयवांनी
हातात चहाची कप-बशी
संपत आला दिवस तरीही
मन उत्साहपूर्ण होई
रोज दुपारनंतरचा चहा
नवा उत्साह मात्र देई
-
अगर तुम कभी अपने गमो का इजहार खुलेआम ना कर सको तो...
तो एकबार मिलना हमे चाय पें...
हम चाय के साथ-साथ आँखे पढने का भी शौक रखते है... 😉♥️-
चहावर होणारं प्रेम समजदार नात्याचं उदाहरण असतं...
वाफाळत्या चवीबरोबर नवनवीन गप्पांचं ते साधन असतं...
नजरेत नजर टाकुन बोलताना मनाला आलेलं आधण असतं...
चहाशीच जुळलेलं ते जीवनभरासाठीचं मनपसंत बंधन असतं...-
मी त्याला एका गोष्टीला कधीच
"नाही" बोलू शकली नाही ........
ती गोष्ट म्हणजे
.
.
.
.
"टपरीवरचा चहा" ।-
तू चाय पत्ती सारखी मी पाण्या सारखा,
चहा झाला कोरा न पिण्या सारखा-
प्रवासातल्या टपरीवर
साथ देणारा चहा,
मैत्रीमध्ये मित्रत्वाचा
हात देणारा चहा.
"टी ब्रेक" "टी पार्टी"
यांचे फायदे वेगळेच आहेत,
चहाचे चाहते इथे
अबाल वृद्ध सगळेच आहेत.
चहा अमृततुल्य का आहे
हे शौकीनालाच समजते,
चहा सुद्धा "रिचार्ज" करतो
हे शिनलेल्याला उमजते...!-
बहुमताच्या जोरावर टिकून जरी असलं
तरी चहा हे शेवटी एक व्यसनच आहे...
¶ गितेश ¶-