उसका मुझमे मन नहीं लग रहा
उसको देखकर तो ऐसा नहीं लग रहा...
छोड दिया है मैने शिकार करना
मेरा तीर तराजू भी नहीं लग रहा...
उसका दिल धडकता है मेरे लिये मैं कैसे मान लू ?
वो मिलने आ रहा पर गले नहीं लग रहा...-
दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमॄताचे फूल यावे !
... read more
आखिर में सब कुछ जाने देने का नाम ही जिंदगी है लेकिन सबसे ज्यादा तकलीफ तब होती है, जब आपको अलविदा कहने का मौका नहीं मिलता।
#lifeofpi-
तुझ्या बटांना बंदिस्त करू नको
त्यांना मुक्त, स्वछंदी वाहू दे..
स्वतंत्र लहरू दे..
नाहीतर ते विद्रोह करतील
तुझ्या गोऱ्या गोमट्या गालाविरोधात,
मग तेव्हा तुला हे ठरवणं कठिन जाईल की
नेमकं कुणाच्या बाजूंनी उभं राहयचं ते..
मात्र त्या बटांना सावरताना तुझ्या ओठांवर
येत असलेल्या हसूंना जरा आवर घाल..
त्याने माझ्या श्वासांची घालमेल वाढते आणि
त्यांना शमवन्याची वाट तुझ्या ओठांतुन जाते...
त्याला तुझ्या श्वासांशी एकरूप व्हावं लागेल...
तुला जमेल का हे सगळं...?
नाहीतर तुझ्या बटांनाच तेवढी परवानगी दे
एकमेकांच्या श्वासांशी एकरूप होण्याची...
तुझ्या गालांना स्पर्श करण्याची,
काही स्पर्श फार बोलके असतात...
आपल्या ओठांचं नंतर बघू...
करतील तर करू दे त्यांना विद्रोह...
©अमोल विजयराव-
मुझसे हुई ग़लतियों का इन्साफ भी नहीं कर सका
वो इतना कमजोर निकला, मुझे माफ़ भी नहीं कर सका...
मैं उसको सुबह शाम पूजता रहा देवता की तरह
वो शख्स खुदको कभी इन्सान भी नहीं कर सका...
वो जहाँ चाहता हम उसी सफ में खड़े मिलते
ना उसने अपना बनाया मुझे, खिलाफ भी नहीं कर सका....-
धीरे धीरे से एक दीन वो जहर बन गया
के इतना सारा मिठापण गुलाबों में देख लिया मैने...-
दुःख, दर्द, तन्हाई, आंसू यही सब मेरे हिस्से में आया
इश्क, प्यार, मोहब्बत तो बस कीताबों में देख लिया मैने...-
हमेशा मेरी किमत लगाते हूए
जिसको जवाबों में देख लिया मैने...
आज फिर अमीर हो गया मैं
आज फिर उसको ख्वाबों में देख लिया मैने...
- अमोल विजयराव
-
दोन-तीन peg शरीरात रीचवल्या नंतर मित्र जरा खुलायला लागला. एक एक गोष्ट सांगता सांगता शेवटी गाडी जुन्या पुराण्या love story वर येऊन धडकली. त्याला आता चढलेली आहे हे मला जाणवू लागलं. मी पन पुन्हा एक peg रीचवत त्याच्या आंतरिक दुःखाला प्रतिसाद देत होतो. त्याची प्रेम कहाणी ऐकत होतो. माझ्याही अंगात नशा झिंगायला लागली होती. जशी जशी त्याची गोष्ट पुढे सरकत होती तसा मी पण भूतकाळात शिरत चालला होतो. मी त्याला प्रतिसाद म्हणुन मान हलवत होतो पण मन मात्र तीच्या आठवणीत शिरत होतं...
तिचं बोलणं..तिची मस्करी..तिने स्वतःहून रचलेल्या बाळवट कथा ज्या मी खरं समजत होतो...आमच्यातले भांडणं...पुन्हा एकमेकांशी बोलणं..
आठवणीं कितीही अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला
तरि त्या अडगळीत राहतात कुठं?
त्या येतातच अगदी ताज्यातवाण्या होऊन
जशा काल परवाच्याच गोष्टी असल्यासारख्या..
मी पुन्हा एक peg पिउन तिच्या आठवणीं वर स्वार होण्याचा प्रयत्न केला... पण आता विषय माझ्या हाता बाहेर गेला होता. माझ्या शरीरात चढलेली व्हिस्कीची सारी नशा उतरायला लागली..
तीच्या आठवणींच्या नशेपुढे व्हिस्कीच्या नशेचा काहीच
निभाव लागला नाही. बाटली मात्र रिकामी झाली.
मित्र आतापर्यंत झोपी गेला होता.
मी माञ अजुनही जागाच होतो..
तीच्या नशेत..
तीच्या आठवणींचा एक एक घोट रिचवत..!
---अमोल विजयराव
-
फुलं दरवळतील कशी? कशी गातील गाणे?
अति जलद होते ऋतू.. तुझे निघुनी जाणे...
इथेच झुडपामागे लपून शिकारी असावा
पायात फास पक्षाच्या,दिसते चोचीत दाणे...
श्रीमंत व्हायचो मी तेव्हा खूपदा बालपणी
आज्जी ठेवायची जेव्हां हातात चार आणे...
पता करा जरा त्याने काही पाप केले का?
इतक्यात वाढले त्याचे मंदिरात येणे जाणे...
चुकून येऊ नये ओठी नाव माझे लक्षात ठेव
तू घेशील जेव्हां त्याच्या दारात जसे उखाणे...-
मौसमा समान सारे पार बदलून गेले
प्रेम तुझे ते कुठे रे यार हरपून गेले...
सावलीसाठी जे लावले झाड ते करपले
बहुतेक त्याच्यावरून न्हाऊन ऊन गेले...
जाताक्षणी तू आठवणींने सोबत घेउन जा
तुझ्यासाठीचे पत्रं काही इथेच राहून गेले...
दूर तिथे आकाशी चंद्र मागितला मी
माझ्या इथे या गच्चीवर चांदणे सांडून गेले...
वाटेवरी मी ज्यांची आतुरतेने वाट पाहिली
मग वळणावरून पुढे ते माझ्या लपून गेले...
मोजूनी काय फायदा आता सारखे कॅलेंडर
आठवणींत मे ही गेला अन् कित्येक जून गेले...
- अमोल विजयराव
-