★ सूर ही बेसूर झालेत ★
सूर ही बेसूर झालेत
शब्द ही धूसर झालेत,
तुझ्या माझ्या भांडणात
सरगम उगाच दूर झालेत।
का कुणास ठाऊक
तु आताही मला ऐकू येतोय,
एकदा येऊन सांग ना,
तू गाणी माझ्या साठीच गातोय?
दूर झालोय असे की,
आरोह ही आता अवरोह झालेत,
परत तू गावे,
मी ऐकतच रहावे....
तुझ्या नसन्याने आता
तुझे गाणे ही क्रूर झालेत ।-
हवी तू मजला
माझ्याच हृदयात..
ठोका ही चुकतो
तुझ्या स्मित हास्यात..
येणा अशी तू
परत माझ्या काव्यात
तुला पाहतो मी
हरवल्या थेंबात ..
-
कधी बघितलंय दिवसा चंद्र,
रात्री सूर्य ,
अंधारात प्रकाश ,
पिवळे आकाश !!??
नाही ना!!....
मग प्रेमात द्वेष का शोधता ।।
-
बेखबर है आज; तू भी कही,
मेरी खबर पुछता है,
बिन तेरे एक पल नहीं बितता
और तू दिन भर का हाल पुछता है।
-
जाता जाता तो बोलून गेला,
"आज काहीतरी लिह ना,
तुझ्या वर नाही तर माझ्या साठीच कविता कर ना..
शब्द हवे असतील माझे उधार देतो,
भावना मात्र त्यात तू
तुझ्याच मांड ना.."
.
हे ऐकून मी ही विचारात पडली..
कशी काय आज कवीनेच कवीला
'कविता' करायला लावली !!-
तुझ्याविषयी काय बोलू,
तू तर माझा मित्र म्हणून ओळखला जातो..
तुझ्या माझ्या मैत्रीचे किस्से,
मीच कधी कधी आश्चर्याने ऐकतो..
कारण तुला माझा मित्र म्हणायला,
माझेच ओठ थांबतात..
इतका कसा रे तू स्वार्थी,
की मैत्रीचे नाते खोटे ठरतात ।।-
आपण ज्यात बघतो त्याला 'आरसा' म्हणतो नि जो पायाला रुततो त्याला 'काच' म्हणतो ..
त्याप्रमाणे,
आपण आरश्यात स्वतःला जसे बघतो
तसंच दुसऱ्यांना ही बघितलं तर ते
सुंदर दिसतील..
नाहीतर काच बनून रुतून जायला वेळ लागणार नाही ।-
माझ्यावर कविता करणारा नाही मिळाला
तरी चालेल
पण,
माझ्या कविता आवडीने वाचणारा हवा ।-
प्रेम असेल तर,
तिच्या हातची जळलेली पोळी
नि करपलेली भाजी पण आवडेल ।
नसेल तर ,
ती सुगरण असून पण
काही उपयोग नाही ।-
(मुलगी बघायला आलेले पाहुणे)~
मुलाची आई:- तुला कसा मुलगा हवा आहे ?
मुलगी:- 1)मला फिरायला फार आवडतं ,
फिरवणारा पाहिजे ।
2)मला चव छान कळते,
चारून देणारा पाहिजे।
3)मला हसायला आवडतं,
हसवणारा पाहिजे ।
4)मला movies बघायला आवडतं,
सिनेमाला नेणारा पाहिजे ।
5)मला pose छान देता येतात,
फोटो काढून देणारा पाहिजे ।
6) मला ऐकायला फार आवडतं,
सोबत गाणारा पाहिजे ।
7) मला surprise फार आवडतं,
देणारा पाहिजे ।
8) मला shopping करायला आवडतं,
सोबत नेणारा पाहिजे ।-