.....
-
Akshay Kadam
(अक्षय कदम)
287 Followers · 215 Following
मराठी कवी✍️
कभी कभी हिंदी मे भी लिखता हुं..☺️
Writer, poet, guitarist, singer, learning keyb... read more
कभी कभी हिंदी मे भी लिखता हुं..☺️
Writer, poet, guitarist, singer, learning keyb... read more
Joined 4 January 2018
4 APR 2021 AT 20:44
हिंडतो मी तसा रोजच तिकडे
कानोसा कुणाचा तरी घेतो
फिरता फिरता हरवतो मी
अन् शोधत काही औरच बसतो
मला आवडतो दिवस
कुणास रात्र आवडते
दिवसा काठावर बसतो
रात्रीस मी यथेच्छ डुबतो
श्वास इथे थांबल्यावर
तिथे गंधाळतो उसासा
रात्र सुगंधी होते
जेव्हा तुझा मोगरा होतो
मला तर वाटते तुझ्याच हातून
सांडत असावे ते चांदणे
चंद्रापेक्षाही चांदण्यात आता
तुझ्यासवे मी जास्त रमतो-