रिश्ते,रस्सी के गांठ से होते है,
जो बिना 2 हाथों के खुल ही नही सकते।
-
सुनो ,
मै अपने नाम के संग ,
तुम्हारा सर नाम लगाना चाहूँ ,
जब जाओं तुम office ,
तो मै तुम्हारी टाई का ,
वो गांठ लगाना चाहूँ ।
💛💛-
डोरो टुट्या गांठ उं जुड़ै कांच टुट्या दरार उं जुड़ै,
पण एक दाण टुटै जे विसास कदै जुड़ायै कोने जुड़ै।।-
।।श्री।।
प्रेम तुझे जगण्याचे कारण
स्पर्श तुझा ऊर्जेचा भास आहे
नाही तोड ज्याची असा तो
कोहिनूर हिरा तू खास आहे!
वादळाशी लढणारा दीप तू
मी तेवणारी तुझी वात आहे
वादळीवारा अन् संकटांवर
आपुल्या प्रेमाची मात आहे !
सुखदुःखाच्या ऊनपावसातही
क्षणोक्षणी सख्या माझी साथ आहे
हात तुझा निरंतर हाती आणिक
जन्माची बांधली ही गाठ आहे !
कृष्णार्पण❤️
-
माया बापानं सांगितलं मले काम,
म्या फिरवली त्यायच्याकडे पाठ..
बाप माला लय हुशार ,
बांधली न माया लग्नाची गाठ..
बाप म्हणे माला, बाबू पयशीन कुठी,
आता कशी अटकवली ताली खुंटी..
म्या म्हटलं बाबा तुम्हालेच जमलं राज्या,
लहान लेकरू लग्नाच्या बेडीत अडकवल राज्या..
(आमच्या वऱ्हाडी भाषेत लिहिलं आहे )-
आई-वडिलांच्या स्वर्गात बांधलेली...
वडिलांच्या खांद्यावरून नवर्याच्या खांद्यावर चढलेली
काहींची मनाने तर काहींची तडजोडीने जोडलेली....
आईच्या आनंद दुःख मिश्रित आश्रुंनी भिजलेली...
तर वडिलांच्या मुकअश्रूत दडून बसलेली...
सप्तपदीच्या प्रत्येक वचनात बांधलेली....
सात जन्मांचं माहित नाही पण,,
एकाच जन्मात आई-वडिलांना सात जन्म दाखवणारी..
नवरीच्या अबोल शब्दांना टिपणारी..
तेच शब्द नवऱ्याच्या डोळ्यात वाचणारी
गाठ उपरण्याची.... जोड दोन खानदानांची..
बांधणी अनोळखी नात्यांची...-
रिश्ते, रस्सी के गाँठ से होते हैं
जो दोनों हाथों से खुलता है
फिर भी उस में सिकुडन रह जाता है।-
जन्मोजन्मीच्या नात्याच्या
गाठी बांधल्या जातात स्वर्गात...
त्यांचे मोल न जाणता आजही
माणसे भांडतात घरा-घरात...-
दोरीला पडल्या जरी कितीही
गाठी तरी ती सोडवता येते...
पण नात्याला पडलेली गाठ
गुंतागुंतीची न कधीही सुटते...-
गाठ बांधली तुझी
माझी जन्मोजन्मीची...
जुळली आपसूक नाती
मग मनामनांची...
सोडून आलो सख्या
मी नाती माहेराची...
जोडलो नव्या नावाने
मी ओळख सासरची...
तुझ्या सुखातच माझी
परिभाषा सुखाची...
तुझ्या दुःखातच माझी
साथ पदोपदीची...
तुझ्यामुळेच ओळख
झाली नव्याने प्रेमाची...
तुझ्यामुळेच चाहुल
लागली आई होण्याची...
गाठ बांधली तुझी
माझी जन्मोजन्मीची...
रुसलो,भांडलो कितीही तरी
प्रेमाने पुन्हा जवळ येण्याची...-