-
।।श्री।।
तू घेतोसच ना .. बिनधास्त घे
टेबलाखालून घे... टेबलावरून घे
पाकिटातून घे अन् मिठाईतूनही घे...
अगदी तुझी झोळी फाटेपर्यंत तू घे...
पण ....काय रे...
रात्री अपरात्री तू छळलेले निरपराध जीव
जेव्हा उपाशीतापाशी तुझीच आठवण काढतील,
अन् जेव्हा तुझा आतला आवाज प्रश्न विचारेल.....
तुझ्या आतल्या आवाजाला तेव्हा तू उत्तर काय देशील ?
की त्याला गप्प करण्यासाठी स्वतःलाच लाच देशील ??
कृष्णार्पण
-
।।श्री।।
प्याला अर्धा भरलेला होता
मात्र तू कधीच पाहिला नाही...
रिकाम्या प्याल्याच्या उणिवेने,
तू कधीच भरभरून जगला नाही !!-
दुःखीतांच्या भावनांचा
एकही हुंकार नाही,
दैव झाले पोरके अन्
देवही आधार नाही...
मग पुसावे मी कुणाला,
जीवना आकार नाही,
पावलांना अंत नाही
वेदनांना गाव नाही !!
सुखदा
-
।।श्री।।
फिसल गया था हाथों से जो
एक प्यारा सा लम्हा था वो।
मखमली सेज़ पर सोया हुआ
मासूम सा बचपन था वो।
सोच कर उसे गमज़दा हो गए थे,
याद आयी थी खुद की तो जरा सा रो दिए थे।
सुरमयी अख़ियों से ओझल हुए ख़्वाब पर,
नन्हें पैरों की उस लंबी सी उड़ान पर,
ए दोस्त, न जाने क्यूँ हम कुछ़ ख़फा हो गए थे।
याद आयी थी उन लम्हों की तो जरा सा रो दिए थे।
©सुखदा-