मितभाषी शब्दांची तू वाणी,
माझ्या हृदयाची तू कहाणी.
प्रेम सागरात, अमृत..पाणी,
होशील का? राजाची राणी.-
वेड्या कधी भेटशील रे
जे स्वप्न रोज बघते मी
कधी ते पूर्ण करशील रे
सांग ना कधी भेटशील रे-
रस्ता बघ तो दुरवर
नजर नजरेला भिडत होती
समोर आकाश अन
नयन हितगुज करत होती..
अमर्याद तो सागर
लहरी लाटा आदळत होत्या
असहाय नजरा अजुनही
त्यांच्यावरती खिळल्या होत्या..
अनाडी मन असे
गंधासारखे दरवळत होते
स्पष्ट बोलके गोंडस शब्द
मधुर कानी पडत होते..
बघा तो पौर्णिमेचा चंद्र
डोक्यावरी उभा होता
सुर्य गेला तो मावळला
पण अजुनही प्रकाश फक्त सुर्याचा होता..-
मेरे हर कहानी के
किस्से मे एक दर्द
का हिस्सा हैं।
खुशियां मिले ना
मिले गमों से मेरा
पुराना रिश्ता हैं।-
लिहीलेले शब्द काहिसे
मनी ओथंबले भाव सारे
आकृतीत उतरले नक्षीकाम बघ
लिहीलेले नुसते आठवणीतले आव सारे..
आकाशातील खुणा मातीच्या
नजरेतील चुका सारया
कहाणीतले खेळभांडे सारे
पुन्हा लिहीले गोडवे राजाराणीचे..
पावलोपावलिच्या भविष्यवाणी
आयुष्याच्या फक्त फसव्या कहानी
शेवटी आयुष्य हे मोहातले सारे
पुन्हा मिटुनि होई जिवन शब्दांच्या कवितेतुनी..
#तेजस-
कहानी को अपनी अब नया
मोड देना बाकी है
तेरी यादों को अब वहीं
छोड देना बाकी है
तुझ तक जो ले जाए उन
रास्तों को भूलना बाकी है
चल कुछ नये रास्तों पर अब
कामयाबी को चूमना बाकी है-
तूझ्या आठवांची माळ मनी आहे
अजूनी प्रीत हीरवी आहे
कधी भेटशील सांग जरा
मन झाले अधीर माझे...-
ती
उभी होती तिथे. स्वतःशीच हसत , फोनच्या खिडकीत डोकावत. मधेच जरा काॅन्शीयस होऊन आजूबाजूला नजर टाकत.वाट पाहात होती कदाचित तिच्या त्याची.....
(कोणास ठाऊक कसं मी ही नकळत त्याला शोधू लागले.
मी सूध्दा कधी काळी वाट पाहिलीयं त्याची. अशीच. बस स्टॉपवर. काॅलेज अन् लोकांची नजर चूकवून. बावळटासारखी. तो ही यायचा उशीरा. असाच. तिच्या त्याच्यासारखा.)
तिचा तो कोण असेल ? येईल ना? ती सूध्दा कंटाळलीय आता. अन् मी पण. कदाचित तो अडकला असेल कूठेतरी, बाईक पंचर झाली की काय? की बस अर्ध्यावर बंद पडली, कळायला मार्ग नाय. विसरला तर नसेल ना तीला देलेल्या वचनला. की अडकलाय आणखी कशात (कूणात)
अगदी माझ्या त्याच्या सारखा....
-
पहाटेच्या दव थेंबाची एकच कहाणी आहे,
धुक्यातुन जन्म एका दुसऱ्यात विरणे आहे !-