एक कोपरा तुझ्या आठवणींनी भरलेला
तुझ्या सहवासाने प्रत्येक क्षण मोहरलेला-
Working as Taluka Krushi Adhikari
In Maharashtra State Depar... read more
उठ मित्रा! असा निराश होऊ नकोस
संकटांना भिऊन संघर्ष सोडू नकोस
प्रत्येकाच्या वाट्याला हा काळ येतो
अनमोल ठरण्या हिरा सुद्धा घाव घेतो
-
असे किती बनाव त्यांनी रचले
तरी माझे मनोधैर्य नाही खचले
जेंव्हा कळले सामील त्यात आपले
तेंव्हा मात्र अश्रुंचे बांध फुटले....-
तहानलेला मी कोरडा वाळवंट,
मनातलं खूप काही राहून गेलंय
डोळ्यात अश्रूंचा महापूर आलेला
अन त्यात वर्तमान वाहून गेलंय....-
आतल्या आर्त हाकांना, आता पूर्वीसारखा प्रतिसाद नको
खटकले मनाला कितीही तरी आपुला आपणाशी वाद नको
मनाविरुद्ध वरवर दिखाव्याचा तो गोड संवाद आता नको
घातले घाव ज्यांनी त्यांच्याशी सलोख्याचा पुन्हा प्रमाद नको
-
एवढ्या प्रवासात मला, एवढेच कळले होते;
पैशांपूढे नाते-गोते अन सारे फोल ठरले होते.
कोणते मुखवटे,कोणते चेहरे हे कळले होते;
ओळखण्यास माणसे,अनुभव एवढे पुरे होते-
कठीण काळात "सोबत"
असणारी माणसं ही
भविष्यातील खरी
संपत्ती असेल.
वेळ प्रत्येकाची येते;
त्यावेळी सोबत नसली
तरी "sympathy"
मात्र नक्की राहील.
-
नवीन वर्षाची सुरुवात,
नवीन काही करण्याची उमेद घेऊन येते.
जुन्या सरत्या वर्षाकडून मिळालेले
अनुभवाचे संचित आयुष्य समृद्ध करत राहते.
चला आता..
जुन्या चुकांमधून शिकून, नव्याने सुरुवात करू
नववर्षाचे आनंदाने, उत्साहाने स्वागत करू
सर्व मित्र, आप्तेष्ट परिवारास नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा💐💐💐
-
लिहावे असे की,
काव्य थेट काळजाला भिडावे;
स्फुरावे असे की,
भाव तुझे; मात्र शब्द माझे असावे.
सरावे असे की,
दिवस ढळता रात्रीने भेटीस यावे;
दुरावे असे की,
तुझ्या भेटीच्या चाहूलीने दु:ख पळावे.-
अनू आणि मनू
धडपडणारी एक मुलगी
'अनू' तीचे नाव
सतत व्यस्त राहवं
एवढेच तीला ठाव
अडाम-तडाम, धुडगूस
घालते 'मनू' तीचे नाव
सर्वांच्या खोड्या काढून
डोक्यावर घेते गाव
'अनू' दिदीच्या बुकबँकवर
'मनू' चोराची पडता धाड
अस्ताव्यस्त करून सारे
सुरू होते फाडाफाड
आईचे धपाटे खाता
'मनू'ची सुरू होते रडारड
'अनू' दिदीने कुशीत घेता
मग लबाड होते गोड
-