आरती नार्वेकर  
751 Followers · 7 Following

read more
Joined 14 December 2020


read more
Joined 14 December 2020

निघाले आज तिकडच्या घरी
किती वर्षे झाली येऊनी येथे
जन्मले हसले खेळले रुळले
बालपण तारुण्य सहज सरले...

नाती-गोती सगेसोयरे मित्रपरिवार
जरी प्रेमळ मिळाला क्षणोक्षणी
आठवण येते तुझी विठ्ठला
चंदेरी बट दिसू लागली कुंतली...

विसरुनी सारा प्रपंच इथला
तुला भेटण्याची आस मनाला
मायबाप युगानुयुगे उभा पंढरपुरी
घेऊनी चिपळ्या मृदंग करी
तुळशी वृंदावन डोईवरी
निघाले आज तिकडच्या घरी...
आरती नार्वेकर...




-



नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत
एका नाळेमधून जुळली आपली प्रीत रे...

ईश्वराच्या आशिर्वादाने झाले मी आई
आलास तू आमच्या घरी होऊन त्याचा दूत रे...

काऊ-चिऊची गोष्ट सांगून भरवते घास रे
चाॅकलेटचा बंगला चांदोबाचे म्हणते मी गीत रे...

दुडूदुडू धावताना बोबडे बोल तुझे साद घाली
निरागस हास्यात तुझ्या विसरते दुःख सारे...

येता-जाता निजलास तरी तुझीच चिंता
पाळण्यात निजण्यास म्हणते अंगाई गीत रे...
आरती नार्वेकर...

-



नाविका रे वारा वाहे रे...
जपून हाक जरा आता नाव रे...
दूर पलीकडे माझं सुंदर गाव रे
उभा तेथे सखा माझा मला ठाव रे...१

दश दिशांना खुणाविती आमिष रे
भुलू नको कशासही विचार कर रे
बघ जरा उधाण आले सागराला
डगमगते जीवन नौका जपून चाल रे...२

किती सांभाळू जीवाला श्वास तुझ्या हाती
क्षितिजाच्या पलीकडे माझं गाव रे
दिस गेले वर्षे सरली भेटीसाठी जीव
व्याकुळला देवा शांत कर सागराला रे...३
आरती नार्वेकर...


-



नयन तुझे जादूगार मदनाची सुंदरी
करतेस घायाळ‌ सोडूनी मदनबाण...

हरिणाक्षी परी कमनीय देह भासे सुंदर
चाल दिलखेचक कुंतल जणू नागिण पाठीवर...

गुलाबी गाल त्यावर नाजुक खळी सुंदर
मधुर हास्य वदनी करते चलबिचल मनी...

बोलती ओठ सुंदर महिरपी गुलाबाची पाकळी
नयन तुझे जादूगार का घालतेस काजळ...

करतो मम हृदयाचे हाल हा तुझा नयनबाण
तीर धारदार बघ हृदयी जातो आरपार...

सुचेना काही तुझ्याविना करमेना जीवनी
नयन तुझे जादूगार जणू प्रितीचा सागर...
आरती नार्वेकर...







-



नकळत सारे घडले
जे घडू नये ते घडले
दिसलास अनोळखी तरी
हृदयी प्रीततार झंकारली..
नजरेतून नजरेला कळले
या हृदयीचे त्या हृदयी
प्रेमपुष्प उमलले...
ओठ पाकळी मिटून गेली
शब्दावाचून कळले सारे
प्रीत अलवार मनी बहरली
गुपित साऱ्यांना कळले...
नकळत सारे घडले...
आरती नार्वेकर...


-



धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
कशी उलगडू मी मम भावनांना
गुंतले मन माझे तुझ्यात सखया
माझी ना मी राहीले मला न कळले...

धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
वेलीवर जाई-जुई बहरुन आली
कळी फुलांना बिलगून हसली
अशीच प्रीत फुलू दे जीवनी...

धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
सुगंधित बेधुंद हा आसमंत झाला
कशी आवरु माझ्या बेधुंद मनाला
तुझ्या स्पर्शाची ओढ लागली तनाला
अधर हे अधीर झाले मिलनाला...
आरती नार्वेकर...




-



धुंदीत गंधित होउनी सजणा
प्रितीत न्हाऊनी जाऊया ना
सारा आसमंत बहरुन गेला
आस तुझी लागली सजणा
धुंदीत गंधित होऊनी सजणा
हर्षित होउनी येशील ना...

बागेत गुलाब जाई जुई फुलली
तुझ्याविना उदास वाटे मना
आठवांनी पापणी ओली झाली
किती समजावू या आसवांना
विरहात दिनरात जाता जाईना
सांज होता शीतल वारं जाळते तना...

ये ना ये ना आता सजणा
धुंदीत गंधित होउनी सजणा...
आरती नार्वेकर...





-




धुंद मधीमती रात रे रात रे
तारकांनी गगनी रांगोळी काढली
चमकत दामिनी आकाशात आली
चंद्र चांदण्याची प्रीत ही बहरली रे...

रिमझिम बरसती पाऊस धारा
रातराणी बहरली राती तरुवरी
सुगंधी वाहतो गार गार वारा
आणतो अंगावरी शहारा
काजव्यांची सुरेल मैफील भरली
गाती प्रणय गीत रे गीत रे...

ये रे प्रीत पाखरा किती आळवू तुला
रात ही निघून जाईल कधी न येई पुनः
ओठी लागू दे मदिरेचा प्याला
जणू स्वर्गच धरती वर आला...
धुंद मधुमती रात रे रात रे...
आरती नार्वेकर...






-



धुंद आज डोळे धुंद ही हवा
अशा धुंद सांजवेळी तू जवळी हवा...

बेधुंद होऊनी अवनी हर्षित झाली
रंगीत फुलांची हिरवी शाल पांघरली...

हसरी रातराणी बहरली गंधित वारे वाहती...
प्रेमळ नजर तुझी नको तीर छेडू मृगनयनी

घायाळ होतो मी समजून घे ना प्रेमाचा इशारा...
सांज ढळत चालली चंद्र ही नभात आला

नको वेळ दवडू अशी एकदा जवळ ये ना
तुझ्या भेटीसाठी जीव आतुरला

गुंतलो तुझ्यात सखे काही न सूचे मजला
धुंद आज डोळे धुंद ही हवा
धुंदीत हा गातो मधुर पारवा...
आरती नार्वेकर...

-



धागा धागा अखंड विणूया
विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया
विविध रंगी मुलायम कोमल
धागेची लडी घेऊनी हाती
सारी नाती प्रेमाने जोडूया
धागा धागा अखंड विणूया...

निर्गुण निराकार निर्माता ईश्वर
अंबर धरती पर्वत नदी सागर
तरुवेलींवर पानाफुलांची नक्षी
भिरभिरत फिरती त्यावर पक्षी
जगदीश तो पहिला विणकर...

प्रात:समयी त्यास स्मरुया
चरणांवरती ठेवूनी माथा
अहंकार षड्रीपुसही दूर सारुया
जाती-धर्माचे तण काढूनी
बंधुत्वाचा ध्वज फडकवूया
धागा धागा अखंड विणूया‌...
आरती नार्वेकर...

-


Fetching आरती नार्वेकर Quotes