आयुष्य
आयुष्य असच जगाव लागत
कधी हसाव तर कधी रडाव लागत
पण आयुष्य मात्र असच जगाव लागत,
कधी सुख तरी कधी दुःख अनुभवाव लागत
पण आयुष्य मात्र असच जगावं लागत,
कधी तारीफ तर कधी बोलणी ऐकाव लागत
पण आयुष्य मात्र असच जगाव लागत,
कधी हराव तर कधी रडाव लागत
पण आयुष्य मात्र असच जगाव लागत,
कुणाच प्रेम तर कुणाचा
तिरस्कार सहन कराव लागत,
पण आयुष्य मात्र असच जगाव लागतं....
-
अश्या जगण्याला
जिथे खुप काही कमऊन ही
माणुसकी कमवता येत नाही
भरपूर पैसा असताना ही
प्रेम विकत घेता येत नाही
सर्व काही असताना ही
शांत झोप लागत नाही
-
आयुष्यात स्वतः बद्दल सांगणारे खूप भेटतील;
पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मोजकेच असतील...!!-
मुख सुखी करण्याची भिन्न धमक
भेगाळलेल्या हाती 'तिच्या',
अविरत राबायची तयारी 'तिची'
बरसवण्या सरी सुखाच्या...
स्वयंपाक घरंच हक्काचं स्थान 'तिचं'
चार भिंतीत वसलेलं विलक्षण नगर,
'ती' स्वतःच त्या नगराची सम्राज्ञी
म्हणूनच निर्मळतेला फुटलाय बहर...
नगरी या मोल न कसले
अलंकार ना अहंकाराला,
साधं लुगडं, बांगड्या,कुंकू
आणि 'तिचं' बहुमोल हास्यच सोबतीला...
भाकरी थापून हस्त 'तिचे' अलगद
थापलेल्या भाकरीला तव्याच्या स्वाधीन करतात,
चटक्यांची दहशत पेलवत भाकरी भाजते 'ती'
टोपल्यात भाकरी जाता नयनपाकळ्या 'तिच्या' आनंदी होतात...
भाजी-भाकरीचा तृप्त घास
शिणलेल्या मनास लाभलेलं मौल्यवान धन,
तत्क्षणी पूर्ण होई 'तिची' इच्छा
होती धडपड केवळ "पाहण्यासाठी ते समाधानी मन"...-
आयुष्यात मनमोकळ हसावं
हवं असलेलं सर्व काही करावं
पण कोणाचं मन नाही दुखवाव
स्वार्थासाठी सर्वच जवळ असतात
कधी निःस्वार्थ इतरांसाठी जगून पहावं
सर्वांचं हसू पाहून आपणही आनंदी रहाव-
सख्या माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर
प्रत्येक सुखदुःखात साथ निभावणार आयुष्यभर
साथ जर असेल सोबत तुझी तर
शेवटच्या क्षणापर्यंत जगणार तुझ्याबरोबर-
कशातच समाधान नाही,
हे समजुन दुःख आपण मिरवतो।
सुंदर आणि आकर्षक एक मानुन,
आपण निर्णय चुकीचा घेतो।।
सुंदर असण्यापेक्षा समाज,
सुंदर दिसण्याला जास्त कल देतो।
सुख बघण्याचा दृष्टिकोन न ठेवता,
कालांतरानं दुःखाचे वारे झेलतो।।
सुख हे नेहमी भोगण्यापेक्षा,
समजण्यात अधिक असतं।
ह्याची जाणीव सतत व्हायला,
काहीतरी ध्येय असावं लागतं।।
एखादी गोष्ट मिळावी म्हणून,
दुःख बाळगून तिच्या मागे लागतो।
ज्या क्षणी ती आपल्याला मिळते,
तो खरा सुखाचा क्षण असतो।-
शब्दांच्या धुक्यात
आनंदाच्या मुखवट्यात
दु:खाच्या ओझ्यात
काळोख्या अंधारात
निराशाच्या बाकावर
बसुन मी माझ्या
स्वप्नांना जाताना पाहीलयं
अपयश,न्युनंगड
छिन्न-विछिन्न अस्तित्वाचे तुकडे
सार काही अजुनही तसेच बिलगुन आहेत
मला माझ्या सावलीसारखे
एकमेकांत गुंफलेले
भावनात अडकलेले
आठवणीत भरकटलेले
आयुष्याचा हिशोब चुकलेले
कदाचित हेच आयुष्य आहे...-
पश्र्चात्ताप होणं एक नैसर्गिक गोष्ट आहे जी आयुष्यात वेळ निघून गेल्यावर भोगावी लागते. त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ न देणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्या होऊन गेलेल्या गोष्टींचा मनाला त्रास करून घेण्यापेक्षा त्यातून चांगलं काही तरी शिकून, पुढे चालत राहणंच सोयिस्कर आहे ज्याने करून आपल्याला मानसिक आरोग्य जपण्यासाठी हातभार लागेल. पश्र्चात्ताप होण्याआधीच योग्य त्या वेळी योग्य निर्णय घेण्याचे कष्ट घेतले तर मग एकप्रकारे मनाला समाधान प्राप्त होईल. घेतल्या गेलेल्या निर्णयांचे परिणाम जरी वाईट निघाले तरी आपल्या मनात एक समाधानाची लाट पसरेल. झालेल्या पश्चात्तापाचा आपल्यावर फार मोठा प्रभाव पडू न देता, त्यातून एक उत्तम मार्ग निर्माण काढत आपली आगेकूच चालू ठेवली पाहिजे.
-
आयुष्य हे क्षणभंगूर
आनंदाचे क्षण चार
जगायचे वा-यावर
बेफिकीर होऊन स्वार
करून चिंता उद्याची
आज नाही रडायचं
तोडून बांध दुखाःचा
पावसागत पडायचं
पक्ष्यासारखं उडायचं
मुक्त होऊन जगायचं
दगडासारखं घडायचं
टाकेल तिथे रोवायचं
आभाळागत पसरायचं
सुखदुखः हे विसरायचं
सा-यांना घेता सामावून
ता-यांसारखं चमकायचं
आयुष्य हे...............
-