मला वाटतेय भीती कशाची
नको वाढवू कंप ह्रदयाशी ।
सुरक्षेणे जगेल मी कशी
का अबोल मी अशी ।
माणुसकी असेल कुणाची
कसे समजवायचे मनाशी ।
खंबीर होणार मी कशी
का अबोल मी अशी ।
मदतीचा हात येतो हाताशी
पण हे मन हेलावत स्वतःशी ।
हा जगण्याचा ध्यास मनाशी
का अबोल मी अशी ।-
गोड गोड बोल तुझे,
तिखे ते हाव भाव.
शब्दातून उमलतात,
तुझ्या मनीचे ठाव.
साधी सरळ सोज्वळ,
अशी तुझी राहणी.
निसर्गात गुंतून करते,
फुलं, पाकळ्यांची तू पाहणी.
मुक्त, स्वच्छंद, फुलपाखरू तु,
राना वनात फिरते.
रस्त्याने जाता जाता,
खाऊ लहान मुलांना प्रेमानं देते.
माथ्या वरील टीका तुझा,
जणू चंद्रच तो गोल गोल.
नजर ती एकदम तीक्ष्ण,
बघताच होता शब्द माझे अबोल.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा,
तुला...परी..-
अबोल निशीगंध हा ,
तू माळल्यावर बोलका होतो ...
त्याचा सुगंध जणु ,
तुझ्या देहाला प्राप्त होतो ...
तो कोमजलेला निशी अजुन
मी तसाच पाहतो ...
तुझ्या आठवणींचा सुगंध
आजही अजुन तसाच दरवळतो ...
प्रणाली मोरे (कोल्हापुर)-
गहीवरल्या मनात साचलेल्या वेदना
बोलक्या डोळ्यात कळतात ।
अबोल शब्दात दडलेल्या भावना
पापनी अश्रू शब्द बोलतात ।-
बोलके डोळे तूझे
अबोल्यातही बोलून गेले;
रूसण्यामागची ओढ तूझी,
हलकेच मला सांगून गेले.
इशार्यात तू कठोरपणा,
दाखवला किती जरी,
मनातले प्रेम खरे,
तुझे डोळे सांगून गेले...
कु. अक्षरा संतोष ढगे.-
"अबोल" हो आहे मी तसा
काय माहित असा मी कसा
जरी अबोल असलो तरी
माझे शब्द फार बोलतात
उगाचचं चारोळी व कविता
करायला ते धडपडतात
शब्दांना पण लागतो थोडा कंट्रोल
ते पण मग बसतातं गप्प अबोल-
काल पर्यंत हवा होता,
मला तुझा अबोला...
पण आज असह्य करतोय,
मुका संवाद, तुझा मला...
तुला काय वाटतं,
मी खुश आहे, तुझ्यापासून दूर राहून...
किती तगमग होते,
निष्पाप तुझ्या मनात, स्वतःला पाहून...
होईल सवय आज ना उद्या,
तुला ही आणि मलाही...
परिस्थितीसाठी स्वीकारायचं,
वास्तवाला दोघांनीही...
कधीतरी बोलत जा ना,
मनाला तुझ्या समजावून...
मी ही वाट बघते,
हृदयाचं माझ्या,कवाडं उघडून...
-Poonam...✍️-
कितीही अबाेल असू देत मी
माझ्या मनातील भीती
तू अगदी अचूकतेने हेरली......
नाही नजर लागू दिली तू नात्याला
परत एकदा मला तुझ्यावरच्या
विश्वासाची जाणीव झाली........-
अबोल, राहायच हे मनाच आत ठरल आहे ....
चुक असु कोणाचीही, आता ना प्रश्न ना हव उत्तर ....
अबोल पणातच नात अबाधित मला राखायच आहे ....
का गुंत्ता करायचा शब्दांचा ,मनाचा त्या पेक्षा अबोल
पणच जपायच आहे ....
-
असंख्य ताऱ्यांच्या सोबती
हा गार वारा वाही बघ कसा,
एक नवं नवरीप्रमाणे चंद्र हा खुलला बघ कसा ।
एक अबोल चंद्र🌙
-