गैरसमज
गैरसमज नखाएवढा,
होतो नको एवढा.
मनामध्ये शंकेचा कल्लोळ अन विचारांचा काहूर,
काळजा जवळच्या जिवाभावाला क्षणातचं करतो दूर.
संपवून टाकतो विश्वास, जपलेला जो आयुष्यभर,
विचारही करत नाही, कि तो का जपला मग आजवर.
का हा समज नाही, कि हा गैरसमज गैर आहे.
अन त्याचं होणं, हे समजुतीचंच एक वैर आहे.
ना कोणते प्रमाण आहे, ना ही याला काही बूड आहे,
आपुल्या आपुलकीला, अगतिकतेचा हा तर सूड आहे.
काळजाचा घाव, असा कसा सोसावा,
म्हणूनच तर तुझ्यामाझ्यात, हा कधीच नसावा.
-
गैरसमज
गैरसमज हा शब्द दिसायला
तसा खुप लहान आहे...
पण याची जी ताकत आहे
ना ती खुप महान आहे...
-
गैरसमजातून झालेल्या, वादांच्या स्पष्टीकरणात, संदर्भ, प्रश्न- उत्तराने निर्माण झालेल्या 'अंतराच्या' अंधारात गुरफटून 'आपलं नात' थोडसं घाबरलेलं आहे.
..,
त्याला तुझ्या 'जवळ' घेशील?
-
गैरसमाजाचे पाट वाहायला लागल्यानंतर
नात्याचे बांध फुटायला फारसा वेळ जात नाही
एकदा की बांध फुटला मग त्याला
भावनांचा किनाराही अडवू शकत नाही
-
गैरसमज
नको गैरसमज कारण विरहाचे
जर बंध सुटले या नात्याचे
तर कोण सांत्वन करणार मनाचे
गैरसमज खेळ बनला भावनांचा
माझ्या आणि तुझ्या अबोल्याचा
सुटता सुटत नाहीये गुंता प्रश्नांचा
अंतर नको देऊ या सावलीला
दुखाऊ नको माझ्या काळजाला
अगं पाझर फुटुदे तुझ्याही हृदयाला.....-
वाद नको म्हणत म्हणत
कधी कधी संवादाच संपून जातो....
नाती नेहमीच समजुतीने घेतली तरी
कधी कधी एका गैरसमजापुढे
सर्व शहाणपणही हरते....-
समज आणी गैरसमज या मानवी भावनांच्या दोन विरूद्ध बाजू आहेत .
जिथे गैरसमज आहे तिथे समज नसणारच, आणी
जिथे समज आहे तिथे गैरसमज ला जागाच राहनार नाही....-
Lok chukich samjtat tyachi parva naste..
Aikun ghet nahit tyach vaait vatt..
-