तुझ्या स्पर्शातील त्या भावना सारखी
तुझीच जाणीव ठेवून जातात
कधी तुला पाहावेसे वाटले की
डोळे स्वतःहून मिटले जातात-
पुन्हा शब्दांची भावना दाटून आली
तू हवेची मंद झुळूक
मी सोसाट्याचा वारा
तू पहिली सर पावसाची
मी कोसळणाऱ्या धारा
तू बहर वसंतातला
मी ग्रीष्मातला उकाडा
तू सरळ ध्येयवेडी वाट
मी भरकटलेला रस्ता वाकडा
तू प्रत्येक गोष्ट पारखून,
निरखून महागातली घेणारी
मी अजूनही वाण्याची मागच्या
महिन्याची थकलेली उधारी
-
वडाला सात फेऱ्या मारतांना
एक फेरा माझ्यासाठी मारलास ना
उपवास भलेही त्याच्यासाठी धरला होता
पण सजतांना एकदा तरी मला आठवलंस ना-
कशी मी वेचू फुले तुला देण्यासाठी
मला एखादा सुखाचा क्षण
तुला देता आला नाही
तु तर तुझ्या घरच्यांना
मनवलं होतंस आपल्या लग्नासाठी
मला साधा होकार घेता आला नाही-
मी कधी गुळाची तर
कधी साखरेची वाह वाह केली
तदनंतर तिने मला
तिची उष्टी चहा दिली-
पैसा , गाडी, सोनं -नाणं देऊन
ज्या बापाने कन्यादान केलं
आज त्याच्याच हाताने
त्याने लेकीचं श्राद्ध घातलं-
ती त्याच्या मंगळसूत्रात होती
तो मात्र तिच्या काकणात अडकला होता
ती भेटणार त्याला शेवटची म्हणून
तिरडीवरचा देह सुद्धा त्याने
तिच्या आठवणीने तेवत ठेवला होता-
कविता म्हणजे भावनांची ओंजळ
कविता म्हणजे आठवणीचं काजळ
कविता म्हणजे वर्णण सौंदर्यवतीचं सोज्वळ
कविता म्हणजे लेखकाच्या ठेवणीतला मृगजळ-
मी तुला शब्दांत बांधू शकलो नाही
कारण त्याने तुला मंगळसूत्रात बांधलं होतं
मी तुझ्यावर साधी एक कविता रचू शकलो नाही
कारण त्याच्या जोडव्यांनी तुला जखडलं होतं
हे प्रेम आहे की मैत्री
ह्याचं कोडं तुला आजही सुटलं नव्हतं
तुझं लग्न जमलं हे तुला
एकदाही सांगावसं वाटलं नव्हतं
असो हरकत नाही आता तुझी वाट वेगळी होती
माझ्यासाठी मात्र आता आटलेली मैत्री अन संपलेली नाती
मान्य करणा एकदा मस्करीत का होईना
तुझ्या प्रेमाची कबुली मला दिली होती
-