एक लहर हूँ मैं...
ना नसीब हैं जिसके कोई किनारा...!
सवाल हूँ एक अजीब सा,
ना जवाब जिसका किसीको मिला...!
बंदी हूँ अपने ही खयालों की,
आजादी की तो कुछ वजह ही नहीं...!
उलझन हूँ कुछ इस तरह की,
कोई कभी सुलझा ही नहीं पाऐगा...!
ऐ मुसाफिर तू अपने राह में,
इस पहेली की रुकावट का मोहताज ना बन..!
तू अपनी राह चलता जा...मंजिल तेरी कुछ और है...!-
जो सगळयांचा असतो,
तो कोणाचाच नसतो...!
जो सगळयांचा विचार करतो,
त्याचा विचार
कुणीच करत नाही...!
जो टोकाचा भावनिक असतो,
त्याच्या चहूदिशांना भावनाशून्य
गर्दी असते...!
-
सारं आकाश आपलंच तरी उडण्याचं भय का?
धावायचंच ठरवलंय तर मग पाय हे अडथळायत का?
रस्ते ठरवलेलेच तरी वळणं ही चुकतात का?-
व्यक्ती जवळ असताना किंमत देता येत नसेल तर
त्या गमावल्यावर हळहळ वाटण्याचं सोंग घेऊ नये...-
हरवलेल्या वस्तू शोधता येतील,
नाहीच मिळाल्या तर पुन्हा नव्याने घेता येतील...
पण स्वत: लाच हरवून बसल्यावर शोधायचं कुठं??
-
कधी कधी आपलं नक्की काय चुकतंय तेच कळत नाही...
आपण नेहमीच एवढे बरोबर असतो का रे विठ्ठला....?-
आनंद कितीही मोठा असला तरी तो क्षणिकच...
म्हणूनच शोधलं पाहिजे ते चिरकाल टिकणारं समाधान...-
एकत्र राहून एकमेकांचं अस्तित्व स्विकारता आलं अन वेगळंपण जपता आलं की आयुष्य नुसतं असं जगलं नाही तर साजरं केलं जातं...!
-
गुंतायचंच नसतं मला कधी,
पण भावनांचे धागे गुरफटतात आपोआप...
मग एकतर विणलं जातं नातं,
किंवा होते नुसतीच गुंतागुंत...!
विणण्यासाठी कष्ट लागतात अपार,
पण उसवण्यासाठी एक धागा होतो फार...!
-