सुबह सुबह पुरानी कविताओं ने मेरा हाल पूछा
वो भी बता रहे थे, एक काग़ज़ इसमे भी फटा हुआ हैं।
-
उर्दू के किताबों से चुरा लूं कुछ शब्द ,
जो मेरे पास हैं वो तेरे लिये काफ़ी नहीं ।
तारीफों के गुलाबों मैं तु एक ख़ूबसूरत कली हैं ।
जब भी देखे तुझे तू हर बार मुस्कुराती हैं।
ये सिलसिला, ये तेरी पहेचान, तेरी ये खूबियाँ यूहीं
बरकरार रहे।
तुम्हारा वक्त, तुम्हारा जन्मदिन हर साल खुशियां लाता रहे।
-
घरात आईला बर नसेल ना, तर वेळापत्रक बदलतं.
पहाटे उठणारी ती अंथरुणात बसून राहते.
मग नेहमी उशीरा उठणारे आपण तेव्हा मात्र झोपेचे सोंगही घेऊ शकत नाही. मग आपल्याकडून कुकर ची एक शिट्टी जास्तच होते. मीठ आणि साखरेतला फरक कळतो.,आणि मसाल्यांच्या डब्यांची शोध मोहीम सुरू होते. जसा हाताला फेविकॉल चिकटतो तसा पहिल्यांदा मळलेल्या पिठाची पण परिस्थिती तशी होते.
चपाती किंवा भाकरी जे काही असेल., ते आपण भाजली याच कौतुक जरी असलं तरी त्याच सुख नसतं.
तिचा उतरलेला चेहरा, आवाजात बदल, तीला होणारा त्रास ते पाहून आपल्या हाताला लागलेला चटका सुद्धा थंडच वाटतो. जेवणाची वेळ बदलते, झोपण्याची वेळ बदलते. पण त्यात औषधांची वेळ तीच राहते.
बरं, यात ती थोडी जरी हसली तर ते सुख कायमचं विकत घ्यावसं वाटतं. ती आजारी असेल तर सगळ घर आतून, बाहेरून आजारी पडतं.
घरात सगळ्यांसाठी google, Alexa, magnet,
map, शेफ, तीच असते. पण तेव्हा मात्र घरातल्या मकरातला देवच आजारी आहे असं वाटतं.
-
दुःख हर्ता येतोय.. संकटांनी पुढच्या वर्षी यावे.
पुढच्या वर्षीही 'विघ्नहर्ता' येईल. तोचं सुख कर्ता आहे.-
Finally... हा! म्हणजे न थांबणारा पहिला पाऊस आला तर. तू ही न थांबताच बोलतेस म्हणा. नुसती बडबड.
मला आठवतंय तू म्हणाली होतीस, पहिला पाऊस आला की माझ्यासाठी काहीतरी लिही. ते चहा भजीच समीकरण तुला लागू होत नाही. खिडकीत बसुन बाहेरच्या छत्र्यांमध्ये लपलेले चेहरे तुलाही पहायचे नसतील. तुला आवडणारा हा महिना, हा ऋतू आणि आज आलेला हा पहिला पाऊस अगदी तुझ्या सवयी प्रमाणे आहे.
" इबादत करो तो यकीन भी सुकून हो जाए
तुमसे मिलने की चाहत ये बारिश भी रखता था "
तुला जेवढी घाई होती ना तेवढीच घाई या पावसाला सुद्धा होती.
एकमेकांना भेटणं, बहरणं, छत्री असून सुद्धा भिजणं,
बराच वेळ तिथेच उभं राहून त्याच्याकडे तक्रार करणं, आणि 'तो' आलाय, खूप सार्या आठवणी, आनंद घेऊन याने भिजलेल्या कपड्यांकडे न पाहता शांत आणि तृप्त झालेल्या आपल्या मनाला तसचं कायम तरुण ठेवणं. हे तुझं वैशिष्ट्य.
अजून परतीच्या पावसाला बराच वेळ आहे. आत्ता आत्ता आज सुरू झालेल्या पावसात स्वतः ला 'भिजवून' घे.
काजव्यांची मैफिल तुझ्या भेटीस नक्की येईल.
-
'लिखने' की 'आदत' अब 'पुरानी' हो गयी हैं।
खैर ......, तेरे लिए लिखना हर बार 'नया' लगता हैं।-
मी कधीच हा विचार नाही करत की, 'तू' माझ्यासाठी काय केलं.
माझा नेहमी हाच विचार असतो की, मी 'आपल्या' 'दोघांसाठी' काय करावं.-
पहले तो उसने 'जी भरके' दिल से 'खेला' ।
और बाद मे कहा, उसे उस बात का 'खेद' हैं।-
अस रेखीव, राखीव, आखीव, तोलून, मोजून, मापून, ठरवून नाहीच होत तुझ्यासाठी लिहिणं...
एकदा पाहिलं तुला तेव्हा....., त्या दिवशी,.... आणि मग......, आणि मग अचानक, सहज अगदी सहज, खरं, साहजिक असलेलं तुझ्यासाठी लिहीत गेलो.
ठरवून, मुद्दाम, फार फार खोट मी भविष्याबद्दल लिहू शकतो. ज्या बद्दल मला कल्पना नाही. ना मी ते पाहिलं, ना अनुभवलं., ते काही ही असू शकतं, अगदी काहीही. पण तुझ्याबद्दल, तुझ्यासाठी लिहिलेलं प्रत्येक वाक्य, शब्द हा 'तुझ्यासाठीच' 'होता' आणि तुझ्यासाठीच 'असेल'. त, त, प, प, हे माझंही होत तुझ्यासमोर. पण हो, नाही, कदाचित यात अडकून कधीच नाही...!!!-