हळद तुझ्या नावाची,कुंकू तुझ्या नावाचं,
मंगळसूत्र तुझ्या नावाचं,मेहंदीत ही तुझंच नावं
जोडावे, बिचवे सारं काही तुझ्याच नावाचं
आता तर माझं नावं ही तुझ्याच आडनावाचं
तुझ्या कडे काय आहे ? तू माझाच आहेस,
हे दाखवायला सांग ना ...?
-
हळद तुझ्या प्रेमाची सख्या
लग्नाच्या मांडवात अशी लागली...!
की त्या हळदीच्या रंगात सख्या
दोन प्रेमाची हृदये किती रंगली...!!-
एक असं औषध जे .....
जखम झाल्यावर लावतात ,
किंवा ती होण्या आधी ही😜😜😜-
नंदलाला रे नंदलाला
जाण जरा रुक्मिणीला..
पहिला मान असे हळदीला
ठावुक आहे का सांग तुला..!!
कुंकु बनुन मिरवते जरी
तुझ्या जगात सत्यभामा..
न बोलली कधी तुला हळद
सवारते तीच तुझ्या धामा..!!
अक्षता जशी सखी राधा
उधळीत फिरशी तिजसवे..
तू जाणलेस का कधीतरी
हळदीस तुझ्या काय हवे..!!
सुमन जशी वेडी मीरा
चरणात पडून नित्य राहते..
शिंपडून उदक नयनांचे
हळद तीज सामावून घेते..!!
अशीच कहाणी हळदीची
आहे का हो तुमच्या घरी..
तुमचाही करंडा करतो का हो
त्या लिलाधराशी अशी बरोबरी..!!-
तुझ्या नावाची हळद
लाविली रे सर्वांगाला
अधीरले मन माझे
भेटण्यास कुंकवाला
यावा सुखाचा बहर
तुझ्या माझ्या संसाराला
एकरुप होवू दोघं
साक्ष ठेवूनी देवाला-
आपल्या प्रेमाचा रंग उतरल्यावर माझ्या विश्वासाचा खुन करुन ही जी 'हळद' लावलीस ना कुणाच्या तरी नावाची तुझ्या हातांना तिचा रंग मला पिवळा दिसतच नाहीये लाल दिसतोय लाल.
-
शरीरावरच्या जखमा येतात भरून थोडीशी हळद लावून,काहीसं दुर्लक्ष करून...
मनावरच्या जखमांसाठी कुठून आणावी हळद...??
मुळात जखमा कुणी दिल्या हेही महत्वाचं...
परकीयांनी दिलेल्या जखमा येतीलही अशाच भरून,
दुर्लक्ष करून...
सख्ख्यांनी दिलेल्या जखमा दाखवताच येत नाहीत हळद मिळण्याची शक्यता दूरच...!!-
हळद लागली आज गाली
लेक आता परक्याची झाली
अंगणातली तुळस आता
दूर चालली संसार थाटाया
माहेराच सोन आता
अल्लड पायानी उंबरा ओलांडती
डोळ्यात पाणी आले तरीही
मागे वळून पाहू नको आई सांगती
चैतन्याच फुल आता
पाहण्याची आस लावती
डोळे भरून पाहूदे आता
बाबा माझे मला सांगतो
परत कधी पाहायला भेटेल
याचीच सगळे आस लावती
पैंजणाचा आवाज आता
वाटेवरतीच हरवून जाईल
अंगणातले सौख्य आता
अश्रूं मध्येच बाहेर येईल-
आपल्याला लागणारी "हळद" काल कुण्या दुसऱ्याच्या अंगाला लागली हो...!!
😐😶😕😕🙄🙄😢😢😢😢😢
पण आपण पण आपण आहे,
आता कुंकू मात्र तिच्या बहिणीलाच लावायचं...
🤣🤣😂😂🤗🤗🤗💪💪💪💪💪-
हळद ही लागली अंगाला
मेहंदी ही रंगली हाताला
नटून थटून नवरा,नवरी
बसली शुभमंगल कार्याला
मंगळाष्टकाच्या मंत्रोच्चारात
पडती अक्षदा सह डोईवर
शुभघडीचा उचित क्षण येता
हास्य उमटती सर्वांच्या गालावर
वाजंत्रीणीच्या सुमधुर तालावर
जेव्हा वऱ्हाडी मंडळी नाचती
आनंदाचा सोहळा पाहून जनसारा
मनोमन खुश होऊन जाती
येता समय पाठवणीचा वधूचा
माता,पित्याचं हृदय प्रेमाने भरते..
शुभआशिर्वाद देऊन मुली,जवाईला
प्रियजनांची अखेरची भेट ती घेते..-