Amita Paithankar   (©अमिता पैठणकर "गौरी ")
531 Followers · 338 Following

Joined 9 January 2019


Joined 9 January 2019
11 NOV 2020 AT 7:02

शब्दांचे प्रेमळ शेले
मी कधीची विणते आहे
निःशब्द राहुनी ऐसे
मौन खोलवर रुजते आहे..!

-


27 AUG 2020 AT 16:27

तुझे पान आणिक फुलेही तुझी
तुझ्या या नद्या झाड वेली तुझी
तुझे दिवस आणिक तुझ्या या निशा
तुझी सर्व सत्ता तुझ्या या दिशा...!

-


17 JUL 2020 AT 8:49

आयुष्य समृद्धीसाठी..
काही अनुभव गरजेचे असावेत कदाचित.....!

-


5 JUL 2020 AT 10:15

कुंभारा सारखा गुरू नाही रे जगात
वरी घालितो धपाटा आता आधाराला हात

आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घट जाती घरोघरी,घट जाती राऊळात

कुणी चढून बसतो गाव गौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो राव राज्याच्या मस्तकी
आव्यातली आग नाही पुन्हा आठवत

कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरू राहतो अज्ञात....

ग दि माडगूळकर

सर्वाना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

-


29 JUN 2020 AT 19:54


तुझ्या कडे तुलाच मागणे
वेड्यागत आहे का....?
मग,
तूचं चराचरात असूनही
मला सर्वस्व मानणे
हे ही वेड्यागतच नाही का....!
-----अमिता

-


23 JUN 2020 AT 22:28

चिंब चिंब भिजवून जातो
आषाढ घन
अवती भवती दरवळत फिरते
ओढाळ मन...

-


22 JUN 2020 AT 6:05

क्षण निघून गेल्यावर ते ना उरते मागे काही
पळ झुकता होतो थोडा अन ठसठस मागे राही

ठिगळ जोडुनी अंधाराचे, बसलेला का कोणी
दर्द जरासा सरतो आणिक मुसमुस मागे राही..


©अमिता पैठणकर"गौरी"

-


6 JUN 2020 AT 9:11

लड़ ही तो रहे हो
अपने आज से
अपने ही कल के लिए...
बस...इतना कर लो..!
मुस्कुराकर चल दो
पा लोगे वह सबकुछ
जो पाना चाहते हो ...!

-


4 JUN 2020 AT 16:42

तू क्षणभर म्हणता म्हणता
आयुष्य सारे व्यापले
मी मणभर म्हणता म्हणता
शब्दांनी अर्थ जोखले

-


2 JUN 2020 AT 18:39

हलकेच नभातून खाली
प्रिय थेंब उतरले बाई
टीप टीप रिमझिम ताना
हृदयी रुणझुण होते काही...


-


Fetching Amita Paithankar Quotes