तुझ्या साधेपणाचे सौंदर्य
आज चंद्रालाही बघ आले
पाहण्यास ते रूप मनोहर
नभागण सारे गोळा झाले-
साधेपणा सर्वात सुंदर दागिना असतो,तो दाखवायचा नसतो पण वागण्यातून मिरवायचा असतो...
-
नाकात नथ असो वा कानात झुमके,असो तो साजश्रृंगार
पण सखे मनाचा साधेपणाच तुला अधिक सुंदर बनवतो..-
आपल्या स्वभावातला चांगुलपणा आपल्यालाच भोवतो
त्या निमित्ताने मात्र या जगाचा माणसांचा खरा चेहरा दिसतो
आपण सर्वांना आपल्यासारखेच सरळ साधे समजत असतो
अनुभव आल्यानंतरच कळतं आपण किती भ्रमात असतो
माणसाच्या स्वभावाला औषध नसतं म्हणतात
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात
कुणासाठी ही धावून जाण्याची सवय काही सुटत नाही
कटू अनुभव आले तरी चांगुलपणा काही संपत नाही
मूळ संस्कारांचं बाळकडू इतकं भिनलेल असतं
कुणी कसंही वागल तरी साधेपण मुरलेलं असतं
मला इथे नाही तिथे उत्तर द्यायचंय कायम ध्यानात असतं
म्हणूनच अगदी अखेरच्या श्वासापर्यंत सरळमार्गी जगणं असतं
- ©®Dr.Rupali ( ✍️ श्रीरुप )
-
सौंदर्य म्हणजे फक्त सुंदर चेहरा नाही, तर
सौंदर्य म्हणजे साधेपणा, संवेदना, संस्कार
-
साधेपणा
माणूस त्याचा आयुष्यात किती पण
पत प्रतिष्ठेने, कार्याने, लौकिकतेने,
बुद्धीने, नावाने, ऐश्वर्याने, समृद्धीने
जरी मोठा झाला तरी त्याने
स्वतः मधला “साधेपणा” कायम
जपावा तरच तो खरा माणूस...!
-
नटन थटन कधी जमलंच नाही मला
साधेपणावरचा विश्वास तेवढा अटळ आहे..— % &-
मी म्हटलं त्याला
निटनेटक म्हणजे रे काय असतं ,
तो म्हणला ..
तुझ्या साधेपणात मला जे दिसतंं..! !-