Every goodbye 🫂 holds a silent hope
That hope inspires to live....-
आयुष्याचा शेवट हा सर्व काही मिळवणे नाही तर सर्व काही सोडून जाणे म्हणजे "मृत्यू"आहे,येथे सर्व काही क्षणिक आहे.
एका वयानंतर वेळ आपल्याकडून आपल्या आवडत्या व्यक्ती हिरावून घेते आणि उरतात भूतकाळाती त्यांच्यासोबत जगलेल्या काही आनंदी आठवणीं आणि त्यांचाच आधार घेऊन उर्वरीत आयुष्य जगाव लागत.येथे साध्य करण्यासाठी इतकंच आहे की सरत्या वयात एका सायंकाळी सूर्याकडे पाहून आत्मविश्वासाने फक्तं इतकं सांगता यावं की "मी करून दाखवलं" ते सगळं जे माझ्या वाट्याला आलं आणि मी त्यात माझं सर्वस्व दिलं मगं ते एक चांगल मुलगा,भाऊ,प्रियकर,नवरा,बाप आणि ते सर्व काही ज्यात मी माझं सर्वस्व दिलं.
तेंव्हा समजावं मी आयुष्यात सर्वकाही मिळवलं आणि समाधानी व्हावं.
-
जन्मोत्सव सोहळा स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा,राजा छत्रपती संभाजी महारायांचा...
-
चंद्रासारखी शितल तू,मी सागरा सारखा खारट प्रिये .
भागीरथी सारखी चंचळ तु,मी अलकनंदा सारखा शांत प्रिये .
इतिहासा सारखी रंजकतू,मी भूगोला इतकाच किचकट प्रिये.
वरदाना सारखी अभयी तू,मी श्राप सारखा बंदिस्त प्रिये .
चंद्राइतकीच दूर तू,मी समुद्रा सारखा खोल प्रिये.
तरीही मी सोडणार नाही हट्ट तुझा मी ही रणांगणातीली वीर प्रिये....-
आयुष्याच्या जीवनपटलावर वावरताना अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे,आणि आपलं पात्र ओळखून त्याप्रमाणे अभिनय करणे हे सर्वत्तम कलाकाराचे वैशिष्ट आहे.....
-
हा मातृदिन त्याप्रत्येक आईसाठी आहे जिने पदराआड आश्रु लपवून हसतमुखाने या मातृभूमीसाठी आपल्या मुलाचे बलिदान दिले.
-
अशीही एक संध्याकाळ असावी सोबत नदीचा काठ असावा तुझ्या हातात माझा हाथ असावा,मनात माझ्या प्रश्नाच थैमान माजावा पण चेहरा माझा प्रसन्न राहावा ,मग तू काहीतरी बोलाव आणि मी काहीही न कळता माझं त्यावर मतं नोंदवाव आणि इथूनच तुझ्या आवडीत माझी आवड दिसावी तुझ्या होकारात माझ्या होकाराचे सूर गुंतवावे आणि कायम त्या खळखळाट करत वाहणाऱ्या नदीसारखा तुझा आणि माझा ऋणानुबंध वाहत रहावा...
-
कोल्हापूर संस्थानाचे पहिले छत्रपती , राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐
-