आनंदकंद. .
सारेच बोलल्याने ,साकार होत नाही
ह्रुदयात माणसांच्या ,व्यापार होत नाही ..!
त्रिज्या परीघ रेषा ,असतात वेगळाल्या..
साराच एक येथे ,आकार होत नाही .!
असतेच ओढ न्यारी , आतूर माणसाची. .
त्यांच्याविना मनाचा शुंगार होत नाही ..!
आहेत आठवाचा ,साराच खेळ जपूनी
राखून ठेवले क्षण ,भंगार होत नाही..!
आतून पेटवा रे ,ज्वाला पराक्रमाची
नुसतेच बोलल्याने ,एल्गार होत नाही..!
💞अपर्णा नैताम ©®
-
औषधाचे काम करते भास त्यांचे
मानते आभार आता श्वास त्यांचे..!
बंधने सारीच होती .. .भोवताली
पण मनाला मोहवे मधुमास त्यांचे..!
केवढा आकार आला जीवनाला
ठेवले राखून नाते खास. .त्यांचे..!
मोगरा तो रातराणी अन् अबोली
पण फिके त्यांच्यापुढे सहवास त्यांचे..!
तो जिवाला भावला आहे जसाही
पहिले नाही मनाने क्लास त्यांचे..!
💞अपर्णा नैताम ©®-
सुखाच्या स्पंदनाच ओठांवर सुरेल गाणं
चंदनाच्या सुगंधासारखं मी तुझं होतं जाणं...!
-
किती निराळा आहे...
तुझ्या नि माझ्या नात्याचा रंग
जसा पाण्याविना जगणार
नदी काठचा निवडूंग...!-
जरा वेगळे नियम करू या...
जरा शहाणा संयम करू या...
जरा स्वतःला देऊ या महत्व.
बाकी सगळे दुय्यम करू या...
जन सेवा हीच ईश्वर सेवा
सवय ही अंगी कायम करू या...
अपर्णा ©®
जन्मता होत नसते कुणी शहाणे
नव शिकण्याची सवय करू या...
पुरे झाले आवरणे अन सावरणे मनाचे..
आता जे मनाला हवंय करू या...
-
तू दिलेल्या जखमांनीच केले
इतके सुंदर माझ्या शब्दांना..
नजरेत तुझाच विचार.असतो
मी ,आरसा बघत नाही सजतांना..
वेदनांनाही आता मी कवटाळून जगतो...
फार संकोच करत नाही हसतांना
तुझाच चेहरा सतत घोळतो मनात अन
नजर बोलून घेते मौन ओठी असतांना
चंद्र ताऱ्यांचे कसले रे आमिष वेड्या
अवघ आभाळ भेटत तुझ्या मिठीत लाजतांना..!-
कवडसा उन्हात बरा वाटतो
खोट्या जगात तू खरा वाटतो...
किती दरवळते पावसात माती
जसा गंध सुगंधी फुलात साठतो...
दुःखापेक्षाही सुखावते सुखाचे रडगाणे..
जसा हुंदका येऊन श्वासाशी दाटतो...
प्रयत्नाशिवाय यश नाही कुठेच..
प्रयत्नच यशाचे शिखर गाठतो-
कसं जगायचं म्हणतांना
आपण किती जातो गोंधळून
इथे पाऊस पडतो हवा तसा
आणि सहज जातो भिजवून...-
असे थांबले कोण ह्रुदयात माझ्या.
एक वाटले कोण शून्यात माझ्या
मला विसरणे फार अवघड सारे..
इतके कोण मिसळले सावलीत माझ्या
पडताळले मी शब्द सारे निरखून
तुझा शेर येईना लगावलीत माझ्या
पोहचली ना अंतरीची हाक कुणाची कानी ...
विठ्ठला तुझीच भक्ती तल्लीन गाभा ऱ्याात माझ्या..
तुझे प्रेम राहील सदा ,ह्रदयात रुतूनी
हेच आहे रे बसलेले ध्यानात माझ्या-
प्रश्न सहज सुटतात
अन विचारांची सलगी होते.....
तरी युध्द पेटण्याचे कारण
इवलीशी ठिणगी होते..-