नव कोर पान...
त्या निळ्या काळभोर आभाळावर
कापसाचे ढग दाटले होते...
त्या प्रश्नांचा काहूर माजलेल्या मनावर
उत्तरांचे रंग सांडले होते...
त्या माणसातल्या माणुसकीवर
गर्वाचे गंज चढले होते...
त्या नव्या कोऱ्या पानावर
शब्द कुणाचे मांडले होते....
त्या शब्दातल्या अलंकारामध्ये
नाव कुणाचे दडले होते...
-
अश्रू मनाचे
मन बोलता मनास रडू आले ग ओठात
कसे लपवावे तिने तिचे अश्रू ग गालात...
अश्रू लपवून डोळ्यात खोटं हासते ग गालात
रडे ढसाढसा गुपचूप शिरून स्वतःच्याच ग कुशीत...
कोणास तिने सांगावी तिच्या मनाची ग घुसमट
नको खोट्या त्या प्रेमाची आता तिला नसे रे ओढ...
तिने सावरले स्वतःला मनास स्वतःच्याच बिलगून
नसे रस आता तिला त्या एकपात्री प्रपंचात...
-
कवितेचं पान
भावनेच्या स्पंदनांना
आवज देते ही कविता...
डोळ्यातल्या आसवांना
वाट दाखवी ही कविता...
बोलणे जरी थांबले
तरी ओळीतून कवितेच्या
भाव ह्या अबोल मनास
पोहोचवते ही कविता...
भावनेच्या आसवात भिजुनी
फाटले जरी पान कवितेचे
तरी फाटक्या ओळीतूनही
मनास नेहमीच भावते ही कविता...-
असेही एकदा घडेल
असेही एकदा घडेल मेघ मनी बरसेल
मन माझे मेघरुपी सप्तरंगांनी हे हर्षेल...
असेही एकदा घडेल कानी गुंज कुणाची पडेल
साखरझोप संपुनी पहाटे भान वास्तवाचे होईल...
असेही एकदा घडेल जग निंदा ही करेल
सार बाजूला निंदेला दिस सोन्याचा उगवेल...
असेही एकदा घडेल आई स्वप्नात माझ्या दिसेल
मिठी मारुनीया मी तिला कुशीत तिच्या निजेल...
असेही एकदा घडेल आसवे माय बापाची लेकरा दिसेल
रीन आसवांची त्यांचा त्यांना सांभाळून रे फेडेल...-
लक्ष्मी ही घराची
घेउनिया डोई | लाजच पदर ||
करीन आदर | सर्वांचीये ||१||
मुक्त करुनिया | बंधनेही सारी ||
मनात जे करी | आवडीने||२||
अडकू नकोस | गुंफल्या जाळ्यात ||
स्वप्नांच्या मळ्यात | धावूनिये ||३||
रूपे ही अनेक | नावे ही वेगळी ||
माया ही आगळी | जानुनिघे ||४||
आई बहीणींचा | करूया आदर ||
नको अनादर| लाजुनिघे ||४||
नको भृणहत्या | लक्ष्मीही घराची ||
शोभा ही दाराची | सौभाग्याहे ||५||
सिद्ध करण्यासी | स्वतःचिये गुण ||
बोलतीजे मन || करुनिघे ||६||
स्त्री शक्ती अपार | कळे ना कुणास ||
दैत्या मारण्यास | जन्मलीये ||७||
जग निर्मितेचे | दान पदरात ||
जिच्या हे हातात | बाईगती ||८||-
रात सरली अंधाराची कि
नव आशेचा दिवस उगवतो
खाच खळगी येता वाटेत
नव्या दिशेचा मार्ग हा दिसतो...
विसरून जाऊ सारे दु;ख
गेले सरूनी मागील वर्ष
नव वर्षाचे स्वागत करुनी
नव प्रेरणांना देऊया हर्ष...
नव वर्ष हे घेउन येती
मनात रुजलेली नवी चेतना
उघड्या डोळ्यातील स्वप्नांच्या
साकार करूया नव्या प्रेरणा...-
नको विसरू मायबापाला
करुनिया हाताचा पाळणा लेकारांसी जपताहेत
चिमुकल्या गोड गालाचे ते हसू बघताहेत...
मोठी होतात पाखरे कशी बघताबघता
त्यांच्या पंखांना देण्या बळ दिसरात राबताहेत...
घर सोडूनी शिकविण्यासी लेकरा दूर लोटताहेत
कधी येईल लेकरू आई बाप वाट बघताहेत...
घेता झेप आकाशाची नवी यश गाठताहेत
आईबापाचा कष्टाचे ते आज चीज करताहेत...
दूर देशी जाऊनी तू विसरलासी त्यांंच्या शिकवणीला
गेला जरी दूर तरी नको विसरू आईबापाच्या मायेला...
आई बापाच्या मायेची सर येई ना कुणाला
पोट मारुनिया स्वतःचे घास भरविती लेकरांला...
कसे समजवायचे त्यांनी त्यांच्या उतरत्या वयाला
आस लागे लेक येण्याची नको विसरू मायबापाला...
दूर देशी गेला सोडूनी म्हाताऱ्या ह्या आईबापाला
तुझाविना आता त्यांनी हाक द्यावी रे कोणाला...?
तुझाविना आता त्यांनी हाक द्यावी रे कोणाला...?
-
खरेपणा
अर्थ कसा स्वार्थाचा माणसांनी तो लावावा
खोट्या अभिमानाचा काय पुरावा असावा...
अभिमान खोटा कि खरा फरक कसा तो जाणावा
खऱ्या अभिमानाचा चेहरा कशावरून ओळखावा...
नको त्या खोट्या मोठेपणाचा करूस तू कांगावा
असेल खरा तर नको कुणास करू तू सांगावा...
खरेपणाची सर न येई खोट्यास कधीही
मेलो तरी अजरामर राहे खऱ्याची दुनियाही...
-
मनातून निघालेल्या सुप्त भावना
ओठांतून शब्दरूपी व्यक्त होऊन
रसिक वाचकांच्या मनावर
कायम अधिराज्य गाजवतात
त्याला म्हणतात खरी कविता...-
ना डोळ्यातून वाहिले ना शब्दातून सांडले
आसवे ही मनाची मनातून आज बोलले
बोलले की काय आज खुपले ह्या मनाला
काय सांगू मी ही काय सलले ह्या मनाला
सल ही मनाची मज सांगताही येईना
घुस्मट ही मनाची मज बोलताही येईना
पुसले मी अासवे नयनातली माझ्या
पण मनातून बरसणार्या पावसाच्या सरी
बघ आज मजला रोखताही येईना
-