Online शाळा
चिन मधून आला कोरोना
शाळा झाल्या बंद
परिक्षा काय आता होईना
विद्यार्थी झाले मोबाईलवर धुंद ,,,
आॅनलाइन शाळा झाल्या आता सुरू
फळा आणि खडू आता लागले रडू
विद्यार्थी विचारतात कधी होईल शाळा चालू
शाळेच्या मैदानात खेळताना कधी पडू ,,,
Digital laptop झाला फळा आणि
Online झाली सुरू शाळा
Google meet वर लावतो हजेरी
Mobaile चा लागला आता लळा ,,,
शिक्षकांच्या छडिचा उरला नाही धाक
आता फक्त Online भरते शळा धन तास
ढिगभर सुट्ट्या आणी परीक्षा झाल्या माफ
2020 मध्ये झाले सर्व विद्यार्थी पास ,,,
कधी वाजेल आमच्या शाळेची घंटा
कधी शिजेल आता दुपारची खिचडी
मित्र आणी मैत्रीनी झाले सगळे दूर
लक्षात तरी राहील का इयत्ता आणि तुकडी-
शाळेच्या पहिल्या दिवशी
एक मुलगी मला दिसली,
नजरेत नजर मिळाली
ती मुलगी मनात बसली.
वर्ग सुरु होताच मला
बघून ती हसली,
मी दिसाव म्हणून मैत्रीनी
जवळ जाऊन बसली.
वही मागण्याचे कारण काढुन
जवळ येऊन ती बसली,
मैत्रीची चिठ्ठी लिहून
वहित ठेऊन मला दिसली.
मी बघताच तिला
नजर चुकवतांना दिसली,
अश्याच भेटीगाठीनी
मैत्री जमली बघा कसली.
एक दिवस ती उशीरा
शाळेत पोहोचली,
जागा मिळाली नाही म्हणून
रुसून मागे बसली.
कस समजाऊ तिला यात
माझी चुकी नाही कसली,
नखरेल ती फार
रागात आली कसली.
साँरी म्हणाव म्हणून
रुसून ती बसली,
आणि मित्र म्हणायचे मला
ही देखनी मुलगी तुला कशी फसली.
काहीही असो राव
अशी मज्जा नाही कसली,
अनोख ते प्रेम अशी
दुनियादारी नाही कसली.
-
एक दिवस शाळेसाठी...
शाळेच्या अविस्मरनिय गोष्टीसाठी...
धो धो त्या सरी पावसाच्या...
सकाळपासुन आभाळातुन, रीचवत होत्या..
शाळेला जाण्याची वेळ, होत आली होती...
म्हणुन नजर कटाक्षाने, पाउस उघडण्याची
वाट बघत होती...
डाव तो पावसाचा, मला मात्र समझला होता...
जरी छत्री नाही घरात, तरी शाळेत जाण्याचा
निर्णय पक्का होता....
मग त्या वाटेने जाणाऱ्या, एका छत्रीने एक वळण...
तर दुसरऱ्या ओसरीने, दुसरे वळण...
अर्ध ओले कपडे घेवुन, वाट गाठली मग शाळेची ...
तोवर वेळ झाली होती, एक तासीका संपन्याची...
सर्वांची आश्चर्याची नजर, माझ्याकडे पाहत होती...
लाजीरवानी नजर माझीही हास्य थोडे देण्याचा
आव आनत होती....
Madhuri P. Warwatkar
-
आज पुन्हा शाळेत जाऊ वाटतंय,
ज्या बेंच वर तिचं नाव लिहिलेलं,
ते बेंच अजून आहे का पाहु वाटतंय.-
शाळेतलं प्रेम..
माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची,
मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची.
फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही
पण माझी नजर तिच्यावर असायची.
मी चोरून बघतो,कदाचित तिला कुणी ही खबर दिली.
एके दिवशी अचानक
माझी नजर तिच्या चेहऱ्यावर असताना
तिने माझ्याकडे पाहिले.
नजरेला नजर मिळाली,जशी अचानक एक वीज चमकली.
नंतर शाळा सुटेपर्यंत मी काही तिच्याकडे पाहिले नाही,
घरी गेल्यावर मात्र दुसऱ्या दिवशी शाळेत येईपर्यंत
ते चित्र काही डोळ्यासमोरून गेले नाही.-
शाळा नेहमी पावसाच्या तोंडावरच उघडायची.शाळेत जुने मित्र तर असायचे पण नव्याने काही यायचे.आजही आठवतो,तो पहिला दिवस..!सगळ्यांची तोंड निहाळीत बसायचो.अरे हा आपला मित्र,अन हा नवीन..!
मग त्याच्याशी स्मित हास्य केले की बनला तो मित्र..!शाळेच्या पहिल्या दिवसाला ओळख व्हायची नव्या पुस्तकांची;नव्या अभ्यासक्रमाची..!अन सुरू व्हायचा तो नवा पर्व,वर्ष अन अभ्यास;संपायचा तो खेळ, जो सुट्टीत आनंदाने साजरा व्हायचा..!आशा असंख्य क्षण जे एका वाक्यात लिहिता येण कठीनेय.शेवटी एकच लिहावेसे वाटते की,'गोडव्यात कितीही तिखट टाकल की त्याचा गोडवा कमी होत नाही';तशीच शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण आहे..!-
शिक्षक असतात देव, शाळा असते देऊळ,
पण माझ्यासाठी होते ते मस्तीचे गोकुळ।
अजूनही आठवे तो दिवस, शाळेचा पहिला दिवस।
आई बाबांना सोडून जाणे आम्हाला झाले होते जड।
पण त्या जगाची बातच होती वेगळी...
सारेच होते नवीन नवीन, सगळेच होते नवीन नवीन।
आनंदाचे वेगळेच विश्व होते,
त्या वास्तूत एक अद्भुत ऊर्जा होती...
तिथे कोणीही परके नव्हते, सगळेच आपलेसे वाटायचे।
आमचे "Father" तर आमचे मित्रच होते जणू,
शिक्षिका तर आमच्या आया होत्या, शिक्षक मोठ्या भावांसारखे...
त्या विविध स्पर्धा, विविध सणांची party, त्या शिक्षकांच्या नकला, त्या सहली, ती मोठी उन्हाळ्याची सुट्टी...
सगळे फक्त आता आठवणींमध्येच शिल्लक आहे...
थोडक्यात, जिथे नैतिकता व मौजमजा एकत्र अनुभवता येतात, ती म्हणजे शाळा...
-
माझी शाळा - जीवनाला गती देणारा वारा
माझी शाळा - जणू 'ज्ञानाचा सागर'च सारा
शाळा असते 'दिवा'
शिक्षक त्याची 'वात'
स्वतः जळतात, पण
ज्ञानाचा प्रकाश देतात
माझी शाळा, माझे शिक्षक - दैवत तिन्ही
करतो मी वंदन त्यांना या शिक्षकदिनी ।।-
शाळा सुटली
पाटी तर केव्हाच फुटली
पण शाळेसोबत जुळलेली
नाळ अजून नाही तुटली
बाकावरून लोंबकळणारे पाय
एकच गणवेष विदाउट टाय,
आठवणींच्या खजिन्यात जपलंय
शाळेचं दप्तर, वह्या-व्यवसाय,
या सा-यांची करावी तुलना कुठली
शाळा सुटली...पाटी फुटली
पण शाळेसोबत जुळलेली
नाळ अजून नाही तुटली-
आयुष्याच्या गुजगोष्टी....
आठवणीत असलेली आपली शाळा, आणि आपलं बालपण यांचं महत्व ते निघून गेल्यानंतर जगाच्या शाळेत जगण्यासाठी संघर्ष करताना उमजलं, हा संघर्ष त्या लहानपणीच्या उत्तीर्ण होण्यासाठी केलेल्या संघर्षाहुन अधिक कष्टी आणि त्रासदायकच.....-