नवीन शब्द नवीन मैफिल
अलौकिक शब्ददुनिया
शब्दांच्या या मंचावर
विराजली लेखणी
सुरुवात आहे एका काव्याची
सुरुवात नव्या कथेची
स्वागत आहे तुम्हा सर्वांचं
या शब्दांच्या शब्दमैफिलीत..!!
Join my telegram channel..
Link in description box
-
NAGARI
Writing is my country..my country is my life...
Mechanical engineer
Volunteer-RO... read more
येणारे कोणतेही संकट माणसाला लढायला,जगायला शिकवत असतात...आज आपल्याकडे जे कॉरोना नावाचं संकट आलंय त्यामुळे आपल्याला लॉकडाऊन होऊन घरातच बसावं लागतय...हे पण एक आपल्यासाठी नवीन आहे ...आपल्या नव्या वर्षाची सुरुवात आहे...या दिवसात तुम्ही स्वतःला वेळ द्या...जीवनातल्या स्वप्नासाठी लढा...हिम्मत आणि स्वतःच्या कर्मावरचा विश्वास हारू नका...हेच ते दिवस आहे जे तुम्हाला संयम,शिस्त,प्रामाणिकपणा,कर्तव्य,जबाबदारी, स्वतःच्या केलेल्या चुकांची समज,समजूतदार बनवणारे...चिंता नका करू...प्रयत्न करा..अन् तुमच्या नव्या वर्षात नव्या युगाची गाथा लिहा...तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा..!!✍️tushar_bhutkar
-
मुसाफ़िर हम जिंदगी के
अकेले पन्ने लिखते गए
कभी सोचा ना था
इतने कमाल के शब्द से
हम लेखनी के दीवाने हुए।
@तुषार_भुतकर-
तकदीर थी मुश्किलें भरी
बुलंद हौसलों के साथ
हार को जीत में बदलने चले
ऐसी शानदार कहानी लिखने चले।@KT-
चालीये दिनी।शब्दकोडे पडुनी।।
सापडेना शब्द।अपुऱ्या विचारांनी।।
विसर पडला दुसऱ्या कानोसानी।
हरवलो मी या जगामधी।।
ठेविले चित्त शांत।भेटलो मी स्वतःमधी।।@तुषार भुतकर-
कथा हि आयुष्याची नेहमी नवीन काहीतरी शिकवते...एक नवा क्षण देते...नवा इतिहास लिहिते...आयुष्यात नवीन क्षण येतो तो मिनिटात नंतर तास नंतर दिवस,महिन्यात बदलून वर्ष बनतो..आज पण आणखी एक वर्ष संपतंय..!
या वर्षी मला मिळालेली सर्वोत्तम क्षण म्हणजे "रॉबिन हूड आर्मी"..!त्यातल्या प्रत्येकासोबत काम करण्याचा अनुभव खूप "भारी" होता...आहे अन पुढे पण असणारच..आपण आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीच नेहमी कौतुक करतो पण रॉबिन हूड आर्मीमध्ये प्रत्येकजण भारीच..नेहमी सहकार्य करायला तत्पर असणारी माणसं शोधायला आयुष्य जात पण इथं सर्व एकमेकांना नेहमी मदतीला हजर..!धन्यवाद रॉबिन हूड आर्मीचे आयुष्याच्या पानाचा रंग बदलवल्याबद्दल..!खरं तर आज या वर्षी "धन्यवाद" हा शब्द सुद्धा शून्य झालाय..!येणाऱ्या वर्षात आणखी काही असंच नवीन शिकायला भेटो हीच ईच्छा..!नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!@तुषार भुतकर💚✌️-
स्वबळावर आयुष्य जगताना संघर्ष खूप कडवा असतो पण त्या संघर्षातून जे यश मिळते त्याची कल्पना कधी कोणी केलेली नसते.इतकं प्रचंड यश आपणला मिळून जाते.फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा अन् मनातून कधी पराभूत होऊ नका..!©KT
-
स्वप्न:-
आपण आयुष्यात स्वप्न बघतो.ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो.अपूर्ण राहीन या भीतीने माघार पण घेतो...पण ज्या स्वप्नासाठी तुम्ही त्याग केलेला असतो;त्याच्यासाठी प्रत्येक संघर्ष पत्करलेला असतो..नंतर तेच स्वप्न तुमच्या आयुष्यात परत येत...कारण ते दूर कधी झालेलं नसत तर तुम्ही दूर केलेलं असत..!कधी पण स्वप्नापासुन पळवाट काढू नका;स्वप्न पूर्ण होण्यासाठीच असत..!©KT-
वाक्य कधी एका वाक्यावर थांबत नाही तर ते नेहमी दुसरं वाक्य बनवत... तसचं आयुष्याचं असत ते कधी एका क्षणावर थांबत नाही;प्रत्येक क्षणाला नवनवीन संधी देत राहत..!©KT-
नव्या विजयाची दिशा मिळाली
भटकलेल्या विचारांचं दहन होऊन
नकारात्मक गोष्टींचा त्याग करून
नवं ध्येय गाठवूया..!!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!
-