kiran prakash kambale   (किरण प्रकाश कांबळे🙂)
93 Followers · 25 Following

read more
Joined 26 September 2019


read more
Joined 26 September 2019
4 NOV 2020 AT 22:19

आयुष्याच्या गुजगोष्टी....

आठवणीत असलेली आपली शाळा, आणि आपलं बालपण यांचं महत्व ते निघून गेल्यानंतर जगाच्या शाळेत जगण्यासाठी संघर्ष करताना उमजलं, हा संघर्ष त्या लहानपणीच्या उत्तीर्ण होण्यासाठी केलेल्या संघर्षाहुन अधिक कष्टी आणि त्रासदायकच.....

-


14 NOV 2021 AT 9:04

कुठे असते ती असं कोणी विचारलच जर,
आपसूक माझी लेखणी बोलून जाते
"त्याच्या कवितेत"

-


29 OCT 2021 AT 22:19

सहज स्वतःशिच....
🙃🙃
शून्यात एकटक बघत उगाच वेळ घालवायचा...
वाहत्या पाण्याजवळ जाऊन लहान मुलासारखं सातभाकऱ्या खेळायच्या...
एखाद्या झाडावर बसलेला भारद्वाज आपल्याशीच बोलतोय असं मनाला समजावून तासन-तास त्याला ऐकत बसायचं...
उगाच रचत जायच्या कविता बसल्या बसल्या कोणत्याही विषयावर,
हवं तर भासमान असणाऱ्या क्षितिजपाठी धावायचं एकट्यानेच....
काहीही करायचं पण विश्वासाचा खेळ अगदी दुरून ही पाहायचा सुद्धा नाही विनायकराव....
अपेक्षाभंग होतो,काचेला आणि विश्वासाला तडा जातोच म्हणे कधीतरी कितीही दृढता असली तरीही......🙄🙄

-


16 OCT 2021 AT 18:33

तुझ्यानंतर......🙂

आरसा कधीच खोटं बोलत नाही,
लपवल्याने रडवेला,चेहरा लपत नाही;
अलबेल असेल दिसत वरून सारं परंतु,
तुझ्या नसण्याचं दुःख मात्र संपता संपत नाही...!
बाजेवर घराबाहेरच्या आजकाल रोजची रात्र सरते,
चांदण्या मोजायला मग तितकासा वेळ पुरत नाही;
आठवणी रोज येतात भेटायला न चुकता मात्र,
भूतकाळात गेल्यावर पापण्यांची ओल आटत नाही..!

-


10 OCT 2021 AT 8:21

तिचं पत्र.....
आजही कविता माझ्यावरच लिहतोस का??
मी गेल्यावर सुद्धा अजूनही मलाच आठवतोस का??
आहेत का लक्षात अजूनही ते क्षण??
त्या तारखा आठवून आजही होतं का रे सैरभैर??
गेला होतास का कधी त्या वाटेवर,
जिथं शेवटचं भेटलो होतो??
सैल झालेल्या मिठीचे आपण दोघेही साक्षीदार होतो...
भकास वाटत होती तेव्हा ती जागा,
आज म्हणे गजबज तिथे फार असते...!
शेवट घडून आलेल्या तिथे म्हणे आज कित्येक सुरुवातींची नांदी असते...!
तुला वाचताना आज खरे तर मी मला गवसत होते,
खुप दिवसांनी आज माझी मलाच भेटत होते...!!
पुन्हा एकदा भूतकाळात आज रमल्यावर वाटलं,
तुझ्यासोबत आयुष्य जगता आलं असतं,
तर जगाचा निरोप सुद्धा समाधानाने घेतला असता....!!

-


1 OCT 2021 AT 22:48

कुण्या काळजाचं दुःख,
अनावर झालं कोण जाणे;
बेभान बरसतोय पाऊस,
सावरायला धावला असावा कदाचित..!!

-


27 SEP 2021 AT 20:55

शाकारले माझे अस्ताव्यस्त आयुष्य,
वेचल्या आठवणीही तेव्हा सरसकट मी;
माझ्याच रंगात रंगलो जेव्हा,
शोध घेतला माझा नि मलाच गवसलो मी...!!

-


25 SEP 2021 AT 14:37

मी रचावं शब्दात माझ्या,
नेहमी जे तुला सांगायचं असतं,
पण मग गुंतागुंत जी मलाच सुटत नाही,
ती नेमकी तुला येईल का सोडवता,
मग वाटतं नकोच लिहायला काही,
ठेवावं डांबून मनातलं,मनातल्या मनातच,
पण वाटतं नाहीच लिहलं काही तर,
संवेदना मरून जाईल का माझ्यातली??
किंवा,
कुण्या एके दिवशी उद्रेक होऊन भावनांचा,
मी कोसळून तर जाणार नाही ना,
मग कधी-कधी वाटतं,
माझे शब्द तुला कळले असते,
तर बरं झालं असतं..🙂

-


24 SEP 2021 AT 20:08

व्यथा🙂

जगणे सोबत दोघांनी जणू,
नियतीला ही अमान्य हे;
विरहात जगणे भागच आता,
एवढे पक्के कळले आहे ।
येईल एव्हाना मृत्यू आता,
त्याचीच वाट बघतो आहे;
चिरनिद्रेच्या स्वाधीन होण्या आधी मी,
आठवणींनी मात्र फार छळले आहे...!!

-


19 SEP 2021 AT 21:48

कल्पनेतलं वगैरे.....😊

होता आलं तुला,तर माझं मन होतेस का??
आढेवेढे घेत का होईना,माझ्यासारख जगतेस का??
होईन मी तुझ्यासारखा,तू ही माझ्यासारखी होतेस का??
जगता येईल एकमेकांसारखं,
होताच आलं तुला,तर माझं मन होतेस का??

-


Fetching kiran prakash kambale Quotes